नमस्कार!
येत्या १ मे २०२६ रोजी महाराष्ट्राच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त आई एकविरेच्या आशीर्वादाने आज माझ्या आवाजातलं "महाराष्ट्र राज्यगीत" ह्या माझ्या महाराष्ट्राच्या चरणी समर्पित करत आहे. सोबत शिवम व साहील मिरचंदानी निर्मित आणि भाविन कटेलिया दिग्दर्शित अद्ययावत तंत्रज्ञानाने बनवलेला म्��णजेच ए आय जनरेटेड व्हिडिओ देखील सादर करीत आहे.
१९ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने मा. श्री. राजा बढे लिखित, मा. श्री. श्रीनिवास खळे संगीत-दिग्दर्शित आणि मा. श्री. शाहीर साबळे ह्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेले ‘जय जय महाराष्ट्र‘ हे गीत महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून घोषित केले. खरे तर त्यावेळेस माझे परममित्र श्री. कमलेश भडकमकर यांनी महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध गायक-ग���िकांच्या आवाजात हे गाणे ध्वनीमुद्रित केले आणि ते महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावरती प्रकाशित देखील झाले. त्यात गाण्याची सुवर्णसंधी मला मिळाली हे माझे अहोभाग्यच समजतो.
परंतु, भारताचे राष्ट्रगीत ‘जण गण मन‘ हे ज्या प्रकारे वेगवेगळ्या गायकांनी, संगीतकारांनी, कलाकारांनी आपआपल्या संवेदनशीलते नुसार वि��िध प्रकारे ध्वनिमुद्रित करून प्रकाशित केले, तसे काही ह्या महाराष्ट्र गीताचे झालेले मी पाहिले नाही, म्हणूनच माझा हा नम्र प्रयत्न.
माझ्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला मला पाश्चिमात्य ‘रॉक‘ संगीताची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर माझे बहुतांश संगीत हे मी त्याच, म्हणजे ‘रॉक‘ पद्धतीने लोकांसमोर आणले. त्यामुळे हे गीत माझ्या पद्धतीने गाताना त्यात ‘रॉक‘ संगीताचा अंतर्भाव ऐकू येऊ शकतो. प��ंतु, तो माझा राज्यगीता बरोबर ‘प्रयोग करण्याचा प्रयत्न‘ नसून माझ्या अभिव्यक्ती मागील स्वाभाविकता आहे, हे कृपया लक्षात घ्या. मुळात हे गीत मी गायक म्हणून नव्हे तर महाराष्ट्राचा नागरिक म्हणून गायले आहे. जो माझा अधिकार तर आहेच, परंतु त्या बरोबरच माझा आनंद आणि अभिमान देखील आहे.
हे करत असताना महाराष्ट्र सरकारने त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या राज्य गीताचे मी अनुकरण केले आहे. म्हण���नच मूळ गाण्यातील ‘रेवा वरदा कृष्ण कोयना‘ हा अंतर��� मी गायलेला नाही. त्यामुळे, जेथे राजशिष्टाचाराप्रमाणे राज्य गीत वाजवण्याची वेळ येईल तेव्हा माझ्या आवाजातील हे राज्य गीत वाजवले जाऊ शकते.
ह्यानंतर हे गीत महाराष्ट्राच्या प्रत्येक संगीतकाराने, गायकाने आणि वादकाने आपापल्या पद्धतीने ध्वनिमुद्रित करून अधिकाधिक वेळा लोकांसमोर पुन्हा पुन्हा आणावे अशी माझी इच्छा आणि गायक गायिकांना अवाहन आहे. गुरुवर्य मा. श्री. शाहीर साबळे ह्यांच्या इतक्या गोड आवाजात गाणे मला शक्य झाले नाही आणि होणारही नाही. त्याचप्रमाणे अनेकांना हे गीत सुरा- तालात गाणेही कदाचित शक्य होणार नाही. परंतु, म्हणून त्यांनी थांबू नये. आता हे आपले ‘राज्यगीत‘ आहे हे न विसरता, छाती फुगवून, मान उंचावून जगाला ऐकू जाईल अशा अभिमानाने प्रत्येकाने हे गीत गावे.
"खोल दिल बोल दिल के तालों से के.. जय जय महाराष्ट्र माझा" हे गीत ज्यावेळेस मी बनवले त्यावेळेस "जय जय महाराष्ट्र म��झा" हे राज्यगीत नव्हते. परंतु, आता ते आहे. त्यामुळे ह्यापुढे ह्या गीता बरोबर अशा पद्धतीचे प्रयोग करणे योग्य नाही.
राष्ट्रगीत वाजते तेव्हा जिथे अ��ाल तिथे स्तब्ध पणे हात सरळ ठेवून उभे राहणे हे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, राज्यगीत वाजते तेव्हा नक्की कुठल्या प्रकारचा शिष्टाचार पाळावा ह्या संदर्भात कुठलीही मार्गदर्शक तत्वे उपलब्ध दिसत नाहीत. परंतु, आपल्या मातीचे, आपल्या संस्कृतीचे, आपल्या राज्याचे गुणगान गाताना देशभक्तीची- राज्यभक्तीची जी भावना मनामध्ये निर्माण होते, ती कुठल्याही शिष्टाचाराच्या प्रभावाखाली दाबून ठेवणे मला ��टत नाही. आपल्या हिंदू धर्मात देखील भक्ती ही नुसत्या प्रार्थनेपेक्षा गाऊन व गाण्याहून अधीक नाचून केलेली ईश्वरापर्यंत पोहोचते, असे म्हटले आहे. तर मग ईश्वर भक्तीचे हे निकष हे देशभक्तीला का लागू होऊ नयेत? त्यामुळे मी गायलेले राज्यगीत ऐकताना श्रोत्याने स्तब्ध राहण्याऐवजी भावनोत्कटतेने उभे राहिलेले, हात उंचावलेले, डोळे पाणावलेले आणि कधी कधी पायाने ताल धरलेले देखील पाहण्यास मला खूप आवडेल. मात्र, ह्यातील कुठल्याही गोष���टीचा अतिरेक होऊन राज्यगीताचा अवमान झालेला मात्र मला कदापी आवडणार नाही.
जय महाराष्ट्र!
तुमचा
अवधूत गुप्ते
https://t.co/wklOculV9m
रात्रंदिवस अभ्यासात रक्त आटवणाऱ्या ��िद्यार्थ्यांच्या विषयावर आवाज उठवला, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं तर त्याला काही सत्ताधारी नौटंकी म्हणतायेत… पण अशा लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघावा.. यातून त्यांची बौद्धीक पातळी वाढण्यास थोडी मदत झाली तर चांगलंच आहे..!
#MPSC #पेपरफुटी
@diprjk Congratulations on organising the appropriate film festival in the most appropriate place in India – Jammu and Kashmir!
Since it boasts some of the most beautiful locations in the world, J&K has fallen off the wish list of filmmakers over the last four decades due to its political situation. This initiative will attract filmmakers not only from India but also from around the globe to return and shoot in J&K.
However, you printed the advertisement very late. Even if I or a filmmaker from Mumbai wanted to join the festival, it’s too late for me. You should have printed this ad at least a month ago, which you would certainly do next year. Regardless, congratulations again!
@ShelarAshish@mahasanskruti
खूप छान, आपण काही नाही तरी अशा गोष्टीतून सपोर्ट करू शकतो. @Vidyanand_Bapat यांना एकाच विनंती, आपण DJ ला बंदी यावरच फोकस करावे,इतर विषयावर बोलून आपण विरोधकांना बोलण्यासाठी स्पेस करून देऊ नये. @AvadhootGupte
जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत पीठ आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्या��य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेतल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभामध्ये ज्येष्ठ संत साहित्यिक श्री सदानंद मोरे, खासदार मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांचा सहवास लाभला. ‘संतपीठ‘ हा शैक्षणिक क्षेत्रातील केवळ महाराष्ट्रानेच नव्हे, तर संपूर्ण जगाने आदर्श ठेवावा असा प्रयोग आहे. हे सं��्कृती रक्षणाच्या चळवळीतील एक पुढचे पाऊल आहे. मला अशा आदर्श उपक्रमाचा आणि नेत्रदीपक सोहळ्याचा भाग बनवून घेतल्याबद्दल आमचे ज्येष्ठ स्नेही श्री भाऊसाहेब भोईर ह्यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे! @PawarSpeaks @MPShrirangBarne @NCPspeaks
I always dreamed of buying a ‘ROLEX’ watch on my 50th birthday but after watching this web series, I’ve changed my mind and now want to buy the most expensive ‘TITAN’! @MXPlayer#MadeInIndiaTitanStory#TheTitanStory
मित्रांनो,
बरेच दिवसांनी आई ऐकविरेच्या आशिर्वादाने मी स्वतः लिहिलेलं आणि संगीत दिलेलं गाणं तुमच्यासमोर घेऊन येत आहे.
सोबत माझा लाडका गायक पद्मनाभ ह्याला फिचर करत आहे. तसेच आमच्या Boys-1 मधली रितिका श्रोत्री ही देखील त्याच्या जोडीला आहे.
गाणं नक्की ऐका, पहा आणि ह्या गाण्या���ून पुढे येणाऱ्या ह्या नवीन कलाकारांना तुमचे आशीर्वाद आणि प्रेम द्या!
https://t.co/T7RfxZiEhq via @YouTube
प्रिय मित्र अजित,
आज तुझा संपूर्णपणे तुझ्या गाण्यांचा कार्यक्रम पहिल्यांदाच होत आहे. तुझ्या कारकिर्दीची ३० वर्षे देखील पूर्ण होत आहेत. तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझे म���ःपूर्वक अभिनंदन!!
आजही मला साधारणपणे १९९५-९६ साली रुपारेल कॉलेज कडून तू गाण्याच्या स्पर्धेत आलेला आठवतोस. जेव्हा मी मिठीबाई कॉलेज तर्फे यायचो. मी आणि माझ्यासारखे अनेक गायक काहीतरी ‘दे धमाल‘ गाऊन जायचे आणि त्यानंतर तू यायचास. तुझ्या निरागस सुरांनी आणि तलत मेहमूद सारख्या जादुई कंपभऱ्या आवाजाने सर्व वातावरण भारुन टाकायचास.. आणि बहुतांश वेळा बक्षीस सुद्धा घेऊन जायचास!
त्यानंतर आमच्यासारख्या क्षुद्र जीवांच्या असुयेच्या जखमांवर तू "नाही रे.. चुकूनच मिळालंय. खरे तर तुम्हीच डिझर्विंग होता." असे काहीसे म्हणत जी फुंकर घालायचास ती आजही जाणवते.
तू खरेच नशीबवान आहेस. तुला खळे काकांसारख्या महान संगीतकाराचा सहवास आणि दीक्षा मिळाली. ती आजही तुझ्या चालींमधून ऐकू येते आणि त्यांचा त्यांचे अस्तित्व तुझ्या चालींमध्य�� आजही जाणवते.
तुझे बालपण आणि तारुण्य हा एक खडतर प्रवास राहिला आहे. आज सेनाभवनाच्या चौकामध्ये उभा राहून कोहिनूर टॉवर कडे मान उंचावून पाहताना, तुझ्या डोळ्यांमध्ये वडिलांची गेलेली नोकरी आणि त्यानंतर कुटुंबाने पाहिलेला खडतर प्रवास स्पष्ट दिसतो. तुझे नास्तिकतेकडे झुकलेले विचार हे त्या उद्विग्नतेमुळे आहेत, की त्यानंतर तू स्वतःला प्रचंड वाचनाने जे समृद्ध केले आहेस, त्या बुद्धिजीवीपणामुळे आहेत हे मला अजून उमगलेले नाही. परंतु, तोच नास्तिक ‘तू‘ जेव्हा गीतरामायण गातोस, तेव्हा बाबूजी आणि गदिमांनी पाहिलेला राम तू आम्हाला अक्षरशः समोर उभा दाखवतोस! म्हणूनच अयोध्येच्या रामाचे दर्शन घेताना मला तू सोबत हवाच होतास आणि माझ्यासारख्या मित्रांचा प्रेमळ आग्रह तू कधीच टाळत नाहीस.
तुला मित्र आणि माणूस म्हणून ओळखण्यामध्ये आणि तुझ्य��� अधिक जवळ येण्यामध्ये ‘सूर नवा ध्यास नवा‘ कार्यक्रमाचा फार मोठा वाटा आहे. स्वराज्याची स्थापना करायची म्हणजे आपले प्रमाचे, हक्काचे मावळे सोबत हवेत! ते किती शस्त्रनिपुण आहेत हे महत्त्वाचे नाही. ह्या छत्रपतिंच्या शिकवणी नुसार मी साउंड इंजिनियर म्हणून मंदार वाडकर, मार्गदर्शक म्हणून संपदा बांदोडकर आणि ह्या सर्वांचा म्होरक्या म्हणजेच दिग्दर्शक म्हणून तुला पाचारण केले खरे. परंतु, पहिल्याच शेड्युलमध्ये तू अत्यंत समर्थपणे दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळलीस. अवघड परिस्थितीत आपल्या संघाच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहणे, वेळोवेळी त्यांना प्रोत्साहित करणे, प्रसंगी कठोर परंतु निर्णायक भूमिका घेणे, असे विविध गुण तुझ्या ठाई असलेले तू दाखवलेस. म्हणूनच पुढे सांगितिक नसलेल्या ‘खुपते तिथे गुप्ते‘ ह्या कार्यक्रमाच्या दिग्दर्शनासाठी देखील मी तुलाच पाचारण केले आणि ती जबाबदारी देखील तू अतिशय सक्षमपणे निभावलीस.
एकंदरीतच.. केवळ उत्कृष्ट गायक, संगीतकार, दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर भक्ती आणि अर्जुनची काळजी घेणारा कुटुंबवत्सल अजित, ‘यारोंका का यार‘ असा आदर्श मित्र अजित, सामाजिक भान जपणारा आदर्श नागरिक अजित अशा सर्व भूमिकांमध्ये तू कायमच ‘वरचा सां‘ पटकावला आहेस. तसाच ह्या पुढे देखील पटकावत राहशील अशी खात्री आहे.
ह्या पुढील आयुष्यात देखील आई एकविरा तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करो आणि सरस्वती माता तुझ्यावर सृजनाचा असाच वर्षाव करत राहो.. ह्याच शुभेच्छा!!
तुझा
अवधूत
‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा मुहूर्त संपन्न!
‘स्ट्रगलर साला’नंतर दिग्दर्शक Viju Mane घेऊन येत आहेत एक भन्नाट, फ्रेश आणि फुल-ऑन एंटरटेनमेंटने भरलेला चित्रपट! 🌴✨
मैत्री, मस्ती, गोव्याची ट्रिप आणि त्या कधीच पूर्ण न होणाऱ्या प्लॅन्सची मजेशीर कहाणी… 😄
गेल्या उंच आकाशी
होळीच्या झळा..
आणि आला आला माझा
लाडका उन्हाळा!
चला स्वेटर कानटोप्या
गुंडाळून माळ्यावर टाका..
कुर्ते पायजमे पंच्यासाठी
करा आता जागा!!
वाफेचे मशीन, मॉयस्चराझर, व्हॅसलीन
लागणार नाहीत आता..
कॅप्स आणि ग्लेअर्सचा बॉक्स
कुठं बरं ठेवला होता?
व्हायरल, खोकला, थ्रोट इन्फे���्शन..
आता कुठलाच ताप नाही..
एक उन्हाळी सर्दी येऊन जाईल..
दुसरा कसलाच त्रास नाही!
दार्जिलिंगच्या टी गार्डन मधून
आता येईल माझा ‘फर्स्ट फ्लश‘..
मग, येईल फळांचा राजा हापूस..
सोबत द्राक्ष डाळिंबाचा क्रश!!
ओले काजू अगोदरच
पोहोचले आहेत रत्नागिरी हून..
काळ्या वाटाण्या सोबत डुंबताहेत,
पटकन घेऊ वेचून!
आता फ्लाईट पकडून, गाडी काढून..
कसंही वाडीला पोहोचायचं!
वडाखालच्या हॉटेलात
कोपऱ्यातलं टेबल पकडायचं!
माशाच्या तळलेल्या दोन तुकड्या..
सोबत हिरवी मिरची आणि लिंबू..
ताज्या ताज्या ‘हुर्राक‘ची चव
आताच जिभेला लागलीये झोंबू!
घामाने पाठीला चिकटलेला शर्ट
बिनधास्त काढून खुर्चीवर वाळवायचा..
मग उघड्या अंगाने हुर्राक रिचवत
कसा पटकन उकाडा पळव���यचा!
संध्याकाळी झोपाळ्यावर
मस्त! झोका खास..
बिनधास्त बसा शॉर्टस् वर
आता नाहीत डास!
निरव शांततेत झावळ्यांची सळसळ
ऐकत जायचं भूतकाळात..
परिक्षे नंतरच्या सुट्टीचा ‘वास‘
पडद्यातल्या ओल्या ‘वाळ्या‘त!
अन् मग चैत्र पालवी घेऊन
येईल जसा पाडवा..
बत्ताश्यांच्या माळेत..
नववर्षाचा गोडवा!
बघता बघता
‘मे‘ ची सुट्टी संपेल..
बघता बघता येईल
उन्हाळा जायची वेळ..
त्याच्या विरहाच्या विचाराने
येईल काळीज भरून..
भरल्या डोळ्यांनी वर पाहीन
ढग येत असतील दुरुन..
अतृप्त मनाला तप्त सोडूनी
जाईल माझा उन्हाळा..
अन् फुंकर घालत सडा शिंपण्या
येईल मग पावसाळा..
❤️❤️❤️❤️
#avgsays
We are happy to have been a small part of famous artist @AvadhootGupte's celebratory 'me time' on his birthday. Carrying an EV bike he gifted himself, Avadhoot Gupte rode the biker friendly Maha Mumbai Metro that has cycle bays and other infrastructure that supports cycling enthusiasts. For those riding EV vehicles, our stations also have battery swapping points to facilitate a smooth, sustainable ride, even after you get off the metro.
महाराष्ट्राचा लाडका गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक छोटासा भाग होताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. स्वतःला भेट म्ह���ून दिलेल्या ईव्ही बाईकसह, अवधूत गुप्ते यांनी 'महा मुंबई मेट्रो'चा प्रवास केला. आमची मेट्रो सायकल प्रेमींसाठी अत्यंत सोयीस्कर असून, त्यात प्रवाशांना प्रत्येक कोचमध्ये सायकल ठेवण्यासाठी खास राखीव जागा (cycle bays) उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि इतर पूरक पायाभूत ��ुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या ईव्ही चालकांसाठी आमच्या काही स्थानकांवर डिस्चार्ज झालेल्या वाहनांच्या बॅटरीला चार्ज करण्यासाठी बॅटरी स्वॅपिंग पॉइंट्स देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे मेट्रोमधून उतरल्यानंतरही तुमचा पुढचा प्रवास विनासायास आणि शाश्वत होईल.
Video courtesy: Avadhoot Gupte's Instagram handle
#MahaMumbaiMetro #MMRDA #GreenCommute #CycleBays #MumbaiMetro #PublicTransportation #AvadhootGupte #Cycling #GreenMumbai #MumbaiInMinutes
@CMOMaharashtra @mieknathshinde @DrSanMukherjee @IAS_Rubal @MMRDAOfficial @MahaDGIPR
@cycling
@narendramodi Wow! What a beautiful moment! After watching FAUDA with a few friends, we decided to visit Israel. I still can’t get over the beautiful nostalgia of that trip, especially the mesmerising Jerusalem and the Dead Sea.