🐂🌾 पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾🐂
“बळीराजाच्या साथीदारांना मानाचा मुजरा,
कष्ट, मेहनत आणि समृद्धीचा सण पोळा!
आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि भरभराट नांदो.
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!” 🌾🙏🐂
पोळा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करा!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून
आमच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या,
प्रत्येक यशामागे प्रेरणा बनून उभ्या राहणाऱ्या
सर्व आदरणीय शिक्षकांना मनःपूर्वक नमन! 🙏
“शिक्षक हे केवळ शिकवत नाहीत,
तर आयुष्य घडवतात.” ✨
💐 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
🦚“नंदाच्या घरी आनंद झाला,
जय कन्हैयालाल की!” 💙✨
भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने आपल्या जीवनात
सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो.
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🙏🦚💫
॥ जय श्रीकृष्ण ॥ 💙
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या हार्दिक शुभेच्छा!
पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या प्रेम, शांतता, दया आणि मानवतेचा संदेश आपल्या जीवनात सदैव प्रेरणा देत राहो.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो.🤲💚
आज दैनिक पुढारी आणि पुढारी न्यूज तर्फे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल
"नाशिक आयकाॅन २०२६" हा पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री मा ना श्री प्रकाश जी आबिटकर यांच्या हस्ते प्राप्त झाला.
#पुढारी#pudharinews#pudharionline
अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (दि.१९ ) नाशिक दौऱ्यावर येत असताना त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार असल्याची घोषणा रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🔱
पवित्र श्रावण महिन्याच्या आगमनाने
भगवान महादेवांची कृपादृष्टी सदैव आपल्या व आपल्या परिवारावर राहो,
आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य नांदो.
हर हर महादेव! 🔱
ॐ नमः शिवाय! 🙏🌺
लोकमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
न्याय, समता, प्रजाहित आणि लोककल्याणाचा आदर्श निर्माण करणाऱ्या
लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यस्मृतीस कोटी कोटी नमन!
त्यांचे विचार, कार्य आणि समाजहिताची प्रेरणा सदैव आपल्याला मार्गदर्शन करत राहो.
विनम्र अभिवादन
🌿 जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿
आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि हक्क यांचा सन्मान करूया.
निसर्गाशी नाते जपणाऱ्या आणि देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांना
जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🌳
जय आदिवासी! ✊🏹
श्रमिक, कष्टकरी, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या हक्कासाठी आपल्या लेखणीने व शाहिरीने लढा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान आहेत.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
आज पवित्र गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र दर्शनाचा लाभ घेतला.त्यानंतर आमचे मार्गदर्शक आणि गुरुवर्य सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची भेट घेण्याचा सन्मान लाभला. त्यांचे पाय धुऊन कृतज्ञता आणि गुरुसेवेची भावना व्यक्त करण्याचे भाग्य आम्हाला लाभले.
🌼 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन!
त्यांचे विचार, संस्कार आणि आदर्श आपल्या जीवनात सदैव प्रेरणा देत राहोत, हीच प्रार्थना.
जय शिवराय! 🚩
जय भीम! 💙
गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
महाराष्ट्र शासनाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेविरोधात रिपब्लिकन सेनेने राज्यभर जनजागृती आणि निषेधाचा निर्धार केला आहे.
संविधानाने दिलेल्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सभा, संवाद आणि जनजागृती अभियान आयोजित
🇮🇳 कारगिल विजय दिवस 🇮🇳
कारगिलच्या रणांगणात आपल्या प्राणांची आहुती देऊन भारतमातेचे रक्षण करणाऱ्या सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन.
"शौर्य, त्याग आणि देशभक्तीचा सर्वोच्च आदर्श म्हणजे कारगिल विजय!"
त्यांच्या बलिदानामुळेच आपण आज सुरक्षित आहोत.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
या पवित्र दिवशी श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या कृपेने
आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान,
समृद्धी आणि अखंड आनंद नांदो.
वारकऱ्यांच्या भक्तीप्रमाणे
आपल्या मनातही श्रद्धा, प्रेम आणि सेवाभाव वाढत राहो.
विठुरायाच्या चरणी सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत.
महाराष्ट्र शासनाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेविरोधात रिपब्लिकन सेनेने राज्यभर जनजागृती आणि निषेधाचा निर्धार केला आहे.
सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा लढा संविधानिक मार्गाने आणि लोकशाही पद्धतीने पुढे नेण्यात येईल.
लोकशाहीत मतभेदांना स्थान आहे, अपमानाला नाही!
आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांविषयी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.
प्रत्येकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जबाबदारीने करावा.
सोनम वांगचुक हेशांततापूर्ण आंदोलन आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पर्यावरण अभ्यासक आणि लडाखच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे सोनम वांगचुक यांना ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या वृत्तानंतर देशभरात विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.
जय भीम...! जय संविधान...!
महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आरक्षण उपवर्गीकरणविरोधी विराट मोर्चे
चला!! लाखोंच्या संख्येने सहभागी होऊया! हे मोर्चे समाजाच्या अस्तित्वाचा लढा आहेत.