महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहात ���त्नागिरी येथील क्रीडा संकुलाचे अर्धवट पडलेले काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी केली.
रत्नागिरी क्रीडा संकुलाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सुमारे १५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून, हा निधी तातडीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
सभागृहात माननीय सभापती महोदयांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधले आणि रत्नागिरी क्रीडा संकुलाचे निधीअभावी रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाला आवश्यक निर्देश देण्याची विनंती केली.
[Pravin Darekar, Maharashtra Legislative Council, Maharashtra Council Session, Ratnagiri Sports Complex, Ratnagiri Krida Sankul, Sports Infrastructure Maharashtra]
#PravinDarekar #BJPMumbai #RatnagiriSportsComplex #SportsInfrastructure
Four pedestrian bridges over railway tracks in south and central Mumbai, will undergo structural audits by IIT Bombay, with the BMC set to seek approval from the civic standing committee to pay the IIT-Bombay institute in advance for the exercise. BMC has proposed appointing IIT Bombay directly, without inviting competitive tenders, citing the institute’s technical expertise and the specialised nature of the work.
https://t.co/DxbfPDFYF1
A nice little change today. Instead of the usual plastic water bottle, I was served water in this small reusable glass bottle. Such a simple switch. Hope more offices do this.
Having travelled on Mumbai’s local trains for years, I know they are the city’s fastest lifeline but also among its most crowded public spaces. A stabbing inside a moving compartment is deeply disturbing, shattering the sense of normalcy commuters carry despite daily congestion. It also raises a stark question about what drives such extreme violence in an already high-pressure urban commute.
https://t.co/7MFm1Gm6MX
महाराष्ट्र माहिती अधिकार नियम 2026 : बदल की पारदर्शकतेवर प्रश्न?
माहिती अधिकार अधिक सक्षम होणार की अधिक गुंतागुंतीचा?
माहितीचा अधिकार हा लोकशाहीतील नागरिकांचा एक महत्त्वाचा हक्क मानला जातो. शासनाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र शासनाने माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 लागू केला. या कायद्यामुळे नागरिकांना शासनाकडे माहिती मागण्याचा वैधान��क अधिकार प्राप्त झाला.
राज्य शासनांना त्यांच्या प्रशासकीय कार्यपद्धतीनुसार नियम तयार करण्याचा अधिकार असला तरी त्या नियमांचा मूळ कायद्याच्या उद्देशाशी सुसंगत असणे अपेक्षित असते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने 12 जून 2026 रोजी माहिती अधिकार नियमांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आणि त्यावरून राज्यभर चर्चा सुरू झाली.
नवीन नियमांमध्ये शुल्कवाढ, माहिती मागण्याचे प्रयोजन ���मूद करणे, नागरिकत्वाचा पुरावा, काही प्रक्रियात्मक निर्बंध अशा अनेक बाबींचा समावेश करण्यात आला. शासनाच्या मते यामागे प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित करणे हा उद्देश असू शकतो; मात्र अनेक माहिती कार्यकर्ते आणि नागरिकांनी या बदलांबाबत गंभीर आक्षेप नोंदविले.
मुख्य प्रश्न बदलांचा नसून ते कसे आणि कोणत्या प्रक्रियेतून करण्यात आले याचा आहे. सार्वजनिक हिताशी संबंधित नियम बदलताना सामान्यतः संब��धित घटकांची मते मागविणे, मसुदा सार्वजनिक करणे आणि व्यापक चर्चा करणे ही सुशासनाची अपेक्षित पद्धत मानली जाते. त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला की या बदलांपूर्वी पुरेसा लोकसहभाग झाला होता का?
यापूर्वी 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात माहिती अर्जासाठी 150 शब्दांची मर्यादा प्रस्तावित करण्यात आली होती. त्यावेळी माहिती कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला आणि ���ंबंधित विषय न्यायालयीन प्रक्रियेत गेला. अशा परिस्थितीत अनेक वर्षांनंतर पुन्हा अर्ज प्रक्रियेला अतिरिक्त अटी जोडण्याचा प्रयत्न का करण्यात आला, अशी चर्चा सुरू झाली.
नवीन नियमांमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेली बाब म्हणजे माहिती मागण्याचे प्रयोजन नमूद करण्याची अट. माहिती अधिकाराच्या मूलभूत तत्त्वांनुसार नागरिकाने माहिती का मागितली हे विचारले जाणार नाही, अशी भूमिका अनेकदा मांडली गेल�� आहे. त्यामुळे ही अट समाविष्ट झाल्यानंतर नागरिक व सामाजिक संघटनांनी प्रश्न उपस्थित केले.
विशेष म्हणजे, 19 जून 2026 रोजी शासनाने माहितीचे प्रयोजन नमूद करण्याची अट मागे घेतली. अवघ्या सात दिवसांत झालेल्या या निर्णयबदलामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. जर अट आवश्यक होती तर ती मागे का घेण्यात आली? आणि जर ती आवश्यक नव्हती, तर ती समाविष्ट करण्याची गरज काय होती?
दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या विषयावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शासनस्तरावर हालचाली वाढल्याचे दिसून आले. मात्र या चर्चेत आणखी एक मूलभूत मुद्दा अनेकदा दुर्लक्षित राहतो. माहिती अधिकार कायद्याच्या कलम 4(1)(ब) नुसार सार्वजनिक प्राधिकरणांनी अनेक प्रकारची माहिती स्वयंस्फूर्तीने प्रसिद्ध करणे अपेक्षित आहे. जर ही तरतूद प्रभावीपणे अंमलात आली असती तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात स्वतंत्र माहिती अर्ज करण्याची गरजच कमी झाली असती.
म्हणूनच प्रश्न केवळ नवीन नियमांचा नाही. प्रश्न असा आहे की शासनाने आधी अस्तित्वातील जबाबदाऱ्या कितपत पूर्ण केल्या आहेत? तसेच महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाने वेळोवेळी केलेल्या शिफारशींपैकी किती शासनाने स्वीकारल्या आणि किती प्रत्यक्षात अंमलात आणल्या याचे स्वतंत्र मूल्यमापन होणे आवश्यक आहे.
माहिती अधिकार व्यवस्थेचे खरे बळ हे अर्जांवरील निर्बंधांमध्ये नसून पारदर्���क प्रशासन, सक्षम अभिलेख व्यवस्थापन आणि स्वयंस्फूर्त माहिती प्रकटनात आहे. आज गरज आहे ती माहिती मिळवणे कठीण करण्याची नव्हे, तर शासन अधिक खुले आणि उत्तरदायी बनवण्याची.
अनिल गलगली
माहिती अधिकार कार्यकर्ते
Honeycombing is a construction defect where voids or cavities are left exposing coarse aggregates.
Among the other findings, the vigilance department pointed that no action had been taken despite failures in compressive strength tests of M-40 concrete in May 2019 and M-50 concrete in November 2020. The inspection also questioned why penalties of only Rs 500 had been imposed for safety violations, failed cube tests and absence of barricades despite the General Conditions of Contract prescribing a minimum penalty of Rs 5,000 per lapse. It further observed that no penalties had been imposed for cracks, honeycombing and rough concrete surfaces and further stated that contractors and supervising municipal engineers had failed to ensure effective quality control and monitoring.
As questions mount over the quality of the newly inaugurated Mrinaltai Gore Extension Flyover, an internal civic vigilance inspection report of January 14, 2021 & also it’s compliance report of June 1,2021 which I accessed has revealed that inspection officials had flagged multiple quality control lapses, structural defects and record-keeping irregularities during the construction of the project back then.
The vigilance report paints a picture of poor supervision and inadequate quality assurance at various stages of execution, with observations ranging from surface cracks and honeycombing in piers to failed concrete strength tests and missing quality records.
पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात कुटुंबियांसह उपस्थित राहून श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
विघ्नह���्त्या बाप्पाच्या चरणी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अखंड आनंद नांदो, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.
[Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple, Pune temple visit, Ganpati blessings, spiritual visit]
#PravinDarekar #DagdushethGanpati #Pune
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळाची बैठक माझ्या अध्यक्षतेखाली व सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या उपस्थितीत पुणे येथील मुख्य कार्यालयात नुकतीच पार पडली.
या बैठकीत राज्य सहकारी संघाच्या मुख्य इमारतीसह जिल्हा स्तरावरील प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठ�� शासनाकडून आर्थिक मदत मिळावी त्याचबरोबर सहकार क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर सहकार आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. राज्यातील सहकारी चळवळीला अधिक बळकटी देण्यासाठी आणि संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबींचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे,सचिव रामदास मोरे,संचालक संजीव कुसाळकर,शिवाजीराव नलावडे,अशोकराव जगताप,नंदकुमार काटकर,नगरसेवक प्रकाश दरेकर,हिरामण सातकर,गुलाबराव मगर,विष्ण��� घुमरे,नितीन बनकर,अनिल गजरे,मुकुंदराव पोवार, सुनील ताटे,धनंजय शेडगे,अरुण पानसरे,विलास महाजन,डॉ.संजय पाटील,प्रमोद पिंपरे,संचालिका जयश्री पांचाळ,दीपश्री नलावडे, अपर निबंधक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ,बोर्ड अधिकारी सदाशिव बोडके आदी उपस्थित होते.
[Pravin Darekar, BJP Mumbai, Maharashtra State Cooperative Union, Cooperative Development, Pune]
#PravinDarekar #BJPMumbai #Pune
Mumbai Mayor @TawdeRitu , who inaugurated the flyover on Saturday told me, that there would be zero tolerance for any substandard work and said that she would conduct an inspection of the site on Monday afternoon.
"If, during my visit, substandard work is found, I will be demanding an immediate technical audit and inquiry by a reputed independent institution such as IIT Bombay. Should the audit establish deficiencies in the quality of work, I will seek the immediate blacklisting of the contractor, withholding of all pending payments, and action against the officials responsible for supervising the project. Accountability must be fixed without delay," the Mayor said.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे केंद्रीय मंत्री व उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार मा. श्री. @PiyushGoyal जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झालो.
आदरणीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांनी दिलेल्या या प्रेरणादायी संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासोबतच मातृप्रेम आणि कृतज्ञतेचा अनोखा संदेश समाजा��र्यंत पोहोचत आहे. वृक्षारोपण हा केवळ पर्यावरण संरक्षणाचा उपक्रम नसून भावी पिढ्यांसाठी हरित, स्वच्छ आणि शाश्वत भविष्य घडविण्याचा सामूहिक संकल्प आहे.
[Pravin Darekar, Ek Ped Maa Ke Naam, Tree Plantation, World Environment Day, Borivali, Narendra Modi, PM Modi, BJP4Maharashtra ]
#PravinDarekar #EkPedMaaKeNaam
#WorldEnvironmentDay
मागाठाणे विधानसभा, प्रभाग क्रमांक ५ मधील शुक्ला कंपाउंड येथील रहिवाशांच्या घरांवर झालेली तोडक कारवाई आणि बिल्डरकडून न्याय मिळण्यासाठी चाललेला संघर्ष अखेर यशस्वी झाला आहे.
@misanjayghadi
गिरगांवच्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे जनक, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि संघ परिवारातील अनेक कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक, श्री पराग वेदक जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. श्रीरामजन्म���ूमी मुक्ती आंदोलनातील महाआरतीचे जनक आणि मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य म्हणून त्यांनी केलेले कार्य न विसरता येणारे आहे. परागजींच्या जाण्याने गिरगांवातील भाजप आणि संघ परिवाराची खूप मोठी हानी झाली आहे. अशा महान व्यक्तिमत्वास भावपूर्ण श्रद्धांजली.
भारतीय संगीतविश्वातील एक मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी स्वर कायमचा शांत झाला. सहा दशकांहून अधिक काळ आपल्या अद्वितीय गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुमनजींच्या अजरामर सुरावटी ही संगीतविश्वाच��� अमूल्य ठेव आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!