आयुष्यात जेवढं दुःख ,
भारत क्रिकेट मॅच हरतांना होत नाही..
आपली crush दुसऱ्या मुलासोबत engaged आहे, हे माहीत पडल्यावर होत नाही..
त्याहून जास्त दुःख..
किच मधला जर्मनच्या डब्यातील शेवटचा मेथीचा लाडू खातांना होतं..
@mieknathshinde सायब...तुमच्यात एक अलौकिक कार्यक्षमता आहे...
तुमची जागा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नसून..
भारताच्या पंतप्रधानपदी आहे...
तुम्ही पंतप्रधान बनावे म्हणून मी माझ्या संपूर्ण कुटुंब आणि मित्रपरीवारासहित आमरण उपोषणला तयार आहे🥹
साहेब खुर्चीतुन उठले. दोन पावले चालले.
हेडलाईन - योद्धा मैदानात उतरायला सज्ज.
अचानक लक्षात आले की आपण चष्मा विसरलो. मागे वळले.
हेडलाईन - साहेबांनी चाल बदलली.
थोडं पुढे आल्यावर लक्षात आले की गाडीत डिझेल नाही. ते आपल्या मित्राच्या गाडीतून निघाले.
हेडलाईन - वस्तादाचा नवा डाव.
सकाळी जेवण थोडं जास्त झाल्याने साहेबांना वाताचा त्रास सुरु झाला. त्यांनी गाडी थांबवून थोडा वेळ पायपीट केली.
हेडलाईन - साहेबांनी वाऱ्याची दिशा बदलली.
घाई गडबडीत त्यांचे पेन खिशातून पडले. लंबोदर असल्याने त्यांना वाकता येईना. यजमानांनी वाकून पेन उचलून दिले.
हेडलाईन - साहेबांनी महाशक्तीला वाकवले.
वय आणि वाणी दोन्हीची वानवा असल्याने साहेबांना संभाषण साधणे अवघड होत होते. त्यांच्या बोलण्याचा विपर्यास होऊ लागला म्हणून त्यांनी काढता पाय घेतला.
हेडलाईन - साहेबांचे विचार समजायला तुम्हाला 100 जन्म घ्यावे लागतील.
महाराष्ट्रातील निवडणूक अगदी एका महिन्यावर येऊन ठेपली आहे पण तरीही मला अजून महाविकास आघाडीमध्ये कुठले पक्ष आहेत आणि महायुतीमध्ये कुठले पक्ष आहेत हे कळत नाहीये...😵
कोण आहेत ती लोकं..
जी Oppo, Vivo आणि Xiaomi चे ₹15000 किमतीच्या वरचे मोबाइल विकत घेतात...
हे ₹15000च्या वरचे मोबाईल विकत घेणे म्हणजे..
Bajaj ने 220CCची Platina तयार करून, हेवी टायर लावून, सायलेंसरचा फटफट आवाज करणारी गाडी ₹1.50 - ₹2 लाख रुपयाला विकत घेण्यासारखं झालं
😖
मी दिवसातून ८-१० लिटर पाणी पिऊनसुद्धा फक्त ३-४ वेळा मुतायला जातो..
आणि
माझी ४ महिन्यांची मुलगी दर तीन तासाला छटाकभर दूध पिऊन दिवसभरात १५-१६ वेळा का सू करते कुणास ठावूक
😭
ज्याप्रमाणे सोनाक्षी सिन्हाचं लग्न झालं
आणि तिच्या त्या लग्नाचा भारतातील कुठल्याही तरुण पोराला झाटभरही फरक पडला नाही...
तसचं I am the सोनाक्षी सिन्हा of my group
मी ऑस्कर, भारतरत्न, नोबल पुरस्कारही जिंकला तरीही माझ्या एकाही मित्राला काहीही फरक पडणार नाही
🥲
हे मोदी समर्थका.. ऐक !
१० वर्षं तुझं ऐकत आलो. आज तू ऐक.
#काॅपे
तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनतीलही...
पण "ये जीत भी कोई जीत है" असं तुला वाटतंय याची खात्री आहे.
पण तुला ठाऊक नसलेली एक गोष्ट ही, की आजच्या या परिस्थितीला तू जबाबदार आहेस - थेट जबाबदर !
१
त्या कुटुंबाला वाळीत टाकलं जातं..
टीप: वरील लिहिलेल्या ओळींचा देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील भाजपाची लोकसभा निडणुकीतील कामगिरी याच्याशी काहीही संबंध नाही🙏
तरीपण
#NDA_सरकार_है_तैयार
भारतातील काही गावांतील एक प्रथा आहे..
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने काही चुकीचं काम केलं असेल, किंवा त्या व्यक्तीने त्या गावातील नियमांच्या विरुद्ध पाऊल उचललं असेल किंवा ती व्यक्ती गावाप्रती विघ्नसंतोषी असेल तर त्या एकट्या व्यक्तीची शिक्षा संपूर्ण परिवारास भोगावी लागते..