🚩यापुढे एक शिवसैनिक म्हणून रत्नागिरीत येणार. रत्नागिरीमध्ये आता विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेबांचा आशिर्वाद आणि सोबत मशाल घेऊन मी येतोय. यावेळी मशालीच्या लख्ख प्रकाशात रत्नागिरीत देवीचा गोंधळ घालू.
#BalMane4ShivsenaUBT#शिवसेना#TigerAbhiJindaHain
रत्नागिरीच्या पुनर्निर्माणासाठी...भविष्यासाठी!
आज हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जाणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री मा.ना.श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.
🔸मागील २ वर्ष राबवलेल्या बूथ सशक्तीकरण अभियानाची आता अंतिम परीक्षा होणार असून 'बूथ जितेगा, चुनाव जितेगा' हा मंत्र आपण प्रयत्नपूर्वक सत्यात उतरवला पाहिजे. असे कार्यकर्त्यांना सांगितले.
#BoothJitegaChunavJitega#Booth_Jitega_Chunav_Jitega
(03/04)
मराठी 🎭रंगभूमीवरील पहिल्या स्त्री नाटककार, साहित्य अभ्यासक हिराबाई पेडणेकर यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन.🙏🏻
#हिराबाई_पेडणेकर#Hirabaipednekar
स्वतःच मुंबई उद्योगपतींच्या घश्यात घालायचे उद्योग करायचे, उद्योजकांकडे तीन-तीन दिवस मुक्काम ठोकून लग्न-बारश्याचे जेवण हाणायचे; बाहेर मुंबई विकायचा डाव म्हणून बोंबा मारायच्या!
या निर्लज्जपणासाठी अंगावर मांस नसलं तरी कातडी मात्र गेंड्याची असावी लागते!
#dharaviredevelopment
राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) स्थापना दिनाच्या सर्व शूर जवानांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या देशसेवेमुळेच आम्ही सुरक्षित आहोत त्यामुळे आपल्या निडर कार्यप्रति आम्ही कृतज्ञ आहोत.
#NSGrisingday#NSG
मा.राष्ट्रपती,महान शास्त्रज्ञ,मिसाईल मॅन,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सोशल मिडीयाच्या आजच्या जमान्यात पुन्हा एकदा वाचन संस्कृती रुजवण्यासाठी कटिबद्ध होऊया.
#apjabdulkalamjayanti
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।
नवरात्र व शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. नवदुर्गांच्या उत्सवातील पहिल्या दिवसाची पूजा आई शैलपुत्रीची. तिची कृपादृष्टी आम्हा सर्व लेकरांवर सदैव राहो हीच प्रार्थना!
जगदंब उदयोस्तु!
प्रखर राष्ट्रवादी, उत्कृष्ट संघटक, अंत्योदयासह एकात्म मानवतावादाचे प्रणेते, आमचे आदर्श स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#दीनदयाल_उपाध्याय जी
शासकीय तंत्रनिकेतन भरतीचा मार्ग मोकळा. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेअंती सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन. यावेळी तंत्रशिक्षण संचालक श्री. मोहितकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
@ChDadaPatil
भारताचे राष्ट्रयोगी पंतप्रधान मा. ना. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा... आपणांस उदंड निरामय दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या माध्यमातून भारतमातेची सेवा अविरत घडो हीच आई महालक्ष्मी अंबाबाईचरणी प्रार्थना!
#NarendraModi#NarendraModiBirthday