महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचा पाठिंबा, विश्वासाच्या बळावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. माझ्या या पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल असा विश्वास देतो.
मौजे हणमंतवाडी गावातील सरलष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे हावडेन थॉमसन इंडिया प्रा लि व दिपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या CSR निधीतून मुलीसाठी सर्व सुविधायुक्त मल्टियुनिट टॉयलेटचे उट्घाटन करण्या�� आले.
पुरोगामी विचारांचा पुरस्कार करत शाहू महाराजांनी जातीभेद व अस्पृश्यता निवारणासाठी लढा दिला आणि सामाजिक परिवर्तन घडवले. शिक्षणाचे महत्त्व जाणून बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली करत त्यांना मुख्य प्रवाहात आणले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य निर्मितीच�� ज्योत प्रज्वलित केली.
लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श घालून देणाऱ्या मातृत्वाच्या शक्तीला कर्तृत्वाच्या तेजाने अधिक उजळवणाऱ्या स्वराज्याच्या प्रेरणास्रोत राजमाता जिजाऊ यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन!
सरपंच परिषद महाराष्��्र राज्य पंचायत समिती कराड यांच्या वतीने कराड येथे स्व यशवंतराव चव्हाण आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा २०२३ व सरपंच उपसरपंच सदस्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
इंग्रज सत्तेविरोधात सशस्त्र क्रांतीचा उठाव करून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी यांनी अखेरपर्यंत लढा दिला.
आपल्या क्रांतिकारी विचारांनी त्यांनी आदिवासी जनांमध्ये सामाजिक परिवर्तन घडवून आणले. आदिवासींच्या उत्कर्षासाठी झटणारे लोकनायक भगवान बिरसा मुंडा यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
हणमंतवाडी गावाची सुकन्या मनिषा कांतीलाल कदम यांची MPSC परीक्षेतून वनपरिक्षेत्र अधिकारी Range Forest Officer या पदावर निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...💐
प्रजेच्या स्वप्नातील सुराज्य प्रत्यक्षात साकारणारे, जनकल्याणाला प्राधान्य देत लोकाभिमुख राज्यकारभाराचा आदर्श घालून देणारे प्रजाहितदक्ष राजे, कुशल प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शत शत नमन. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजोपयोगी कार्य करून रस्ते, विहिरी, तलाव, नदीघाट, धर्मशाळा यांसारख्या सुविधा निर्माण केल्या. या विपुल जनकार्याद्वारे कुशल प्रशासनाचा आदर्श राज्यकर्त्यांसमोर निर्माण केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!