नये और मज़बूत भारत के निर्माता, स्वतंत्रता सेनानी, भारतरत्न एवं देश के प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू जी की पुण्यतिथि पर
- बाबू उलीगप्पा बालम्मा बत्तेली
चंद्रिकी सचिव, मुंबई प्रदेश NCP SP
जय जय जय जयंत! जय हो! 🙏🏻💐🇮🇳
५९ वर्षीय @Wangchuk66 सोनम वांगचुक यांचा आज उपोषणाचा १९ वा दिवस आहे. देशातील युवकांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या, प्रश्नपत्रिका फुटण्याच्या बाबीची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्रीमहोदयांनी राजीनामा द्यावा, एवढी माफक मागणी श्री. वांगचुक यांची आहे. मात्र, आत्ताच्या मंत्रिमंडळाला कोणत्याही गोष्टीची नैतिक अथवा वास्तविक देखील जबाबदारी घ्यायची नाहीये.
श्री. सोनम वांगचुक यांचे जीवन अमूल्य आहे. त्यांच्यासारख्या व्यक्ती या देशाची संपत्ती आहेत. या निर्ढावलेल्या सरकारसाठी वांगचुक यांनी जीव धोक्यात घालू नये. आपले आमरण उपोषण मागे घ्यावे.
Today marks the 19th day of the hunger strike by 59 year-old Sonam Wangchuk.
His modest demand is that the concerned minister accept moral responsibility and resign over the repeated incidents of examination paper leaks, which have jeopardized the future of countless young people across the country.
Unfortunately, the present government appears unwilling to accept either moral or actual accountability for such serious failures.
The life of Sonam Wangchuk is invaluable. Individuals like him are a national asset. He should not be forced to risk his life for a government that refuses to respond with responsibility. I sincerely appeal to him to withdraw his indefinite hunger strike and preserve his health and life.
#SonamWangchuk #hungerstrike #democracy #educationsystem
मराठी साहित्य, लोककला आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला आपल्या लेखणीने व शाहिरीने नवी दिशा देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन🙏🏼
वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द देत समता, न्याय आणि स्वाभिमानाचा संदेश देणारे त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
जलव्यवस्थापन, प्रशासनातील पारदर्शकता आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या कार्याचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी दिलेले त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबू बत्तेली यांचे वडील उलिगप्पा बुगप्पा बत्तेली यांचे नुकतेच निधन झाले. महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी चांदिवली, काजूपाडा येथील प्रभात नगर निवासस्थानी येऊन स्व. उलिगप्पा चंद्रिका यांच्या पत्नी व कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.
@Jayant_R_Patil@Agnishila1@NCPspeaks@ncpmumbaispeaks
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. आता शासन या ८० लाख लाभार्थ्यांना बोगस म्हणत आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो की शासनाने २० महिने या बोगस लाभार्थ्यांना (शासनाच्या म्हणण्यानुसार) का पोसले?
या योजनेचा फायदा चुकीच्या लोकांनी घेऊ नये यासाठी शासनाने योजना राबवतानाच्या एक सक्षम यंत्रणा उभी का केली नाही? सरसकट पैसे मतांच्या आशेने का देण्यात आले? त्यामुळे एक वेगळीच शंकेची पाल चुकचुकते आहे.
मागील २० महिन्यात १५०० च्या हिशोबाने या ८० लाख लाभार्थ्यांना शासनाने २४००० कोटी रुपये वाटले आहेत. जर बोगस लाभार्थ्यांना (शासनाच्या म्हणण्यानुसार) इतके पैसे दिले असतील तर हा फार चलाखीने केलेला भ्रष्टाचार नाही का?
याला जबाबदार कोण? शासनाने जबाबदारी निश्चित करावी.
#लाडकी_बहीण
राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस आज आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. त्यांची एक महत्वाची मागणी वेतनवाढीची तर आहेच; पण त्याशिवाय इतर मागण्या या व्यवस्थेतील गंभीर त्रुटी दाखविणाऱ्या आहेत.
गेल्या ६ महिन्यांपासून केंद्राचा वेतनातील हिस्सा मिळालेला नाही. अनेक अंगणवाडी केंद्रांचे भाडे थकीत आहे त्यामुळे सेविकांना जागा मालकांकडे विनवण्या देखील कराव्या लागत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे मागील दोन वर्षात तब्बल ₹१८०० कोटींचे केंद्राकडील देणे प्रलंबित आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे गडचिरोली, नंदुरबार, पालघर यांसारख्या आदिवासी जिल्ह्यांतील सेविकांवर पोषण ट्रॅकरवरील कुपोषणाची आकडेवारी कमी दाखविण्याचा दबाव आणल्याचे आरोप होत आहेत. सरकार चुका करणार आणि त्या लपविण्यासाठी दबाव देखील आणणार...हा कोणता न्याय?
एकीकडे महागाईचा भडका उडाला आहे, तर दुसरीकडे बालपोषण आणि आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या अंगणवाडी सेविकांना त्यांचे हक्काचे पैसेही मिळत नाहीत. राज्य व केंद्र सरकारने तातडीने याची दखल घेऊन प्रलंबित निधी वितरित करावा आणि आंदोलनकर्त्या भगिनींना न्याय द्यावा.
https://t.co/vuFNymEKN7
रामचंद्र कह गये सिया से,
ऐसा कलयुग आएगा...
पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होत असून महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
याच सर्वसामान्यांच्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वाशी येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या राज्यात आंदोलन करण्याचा अधिकार देखील राहिला नाही का? असा प्रश्न यामुळे पडतो
सर्वसामान्यांना दिलासा द्या, महागाईवर नियंत्रण आणा आणि इंधन दरवाढ मागे घ्या, इतकी माफक अपेक्षा आमची आहे.
@supriya_sule@shindespeaks@Awhadspeaks@RRPSpeaks@Rohini_khadse
#महागाईविरोधी_मोर्चा #PetrolDieselPriceHike #GasPriceHike #MumbaiMorcha
स्वराज्याचा सूर्य उगवला! 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा आजचा सुवर्णदिन. स्वाभिमान, न्याय आणि जनकल्याणाच्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणारा हा ऐतिहासिक क्षण.
शिवरायांच्या विचारांना आणि स्वराज्याच्या मूल्यांना मानाचा मुजरा! 🙏
#राज्याभिषेकदिन #छत्रपतीशिवाजीमहाराज #हिंदवीस्वराज्य
@AnilDeshmukhNCP@PawarSpeaks महाराष्ट्राची आन, बान आणि शान असलेले आदरणीय श्री. जयंत राजाराम बापू कुसुम पाटील साहेब यांचे दूरदृष्टीपूर्ण, प्रेमळ आणि खंबीर नेतृत्व आम्हा सर्वांना सदैव प्रेरणा देत राहो.
चला, सर्वांनी एकजुटीने, निष्ठेने आणि जनतेच्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
@Jayant_R_Patil आदरणीय साहेब यांचं आदरस्तंभ नेहमी प्रत्येक पाऊल ला पाऊल साथ देणारे आमच्या सौं शैलेजा ताई साहेब आपण्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपण्यास निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच आई जगदंब चरणी प्रार्थना करीत आहोत... जय जय जय जयंत जय हो Ncp Sp 💐💐💐💐💐🥳🥳
प्रिय शैलजा,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ❤️
जीवनाच्या प्रत्येक चढ-उतारात तू दिलेली साथ आणि माझ्यावर ठेवलेला विश्वास हेच माझे खरे बळ आहे. सामाजिक जीवनात मला जे काही करता आले, त्यामागे तुझा निःस्वार्थ पाठिंबा आणि समजूतदारपणा आहे.
तुला निरोगी, आनंदी आणि समृद्ध आयुष्य लाभो.