चेंबूरमध्ये लोकांनी यांना झाड काढून टाका असं निवेदन दिलं होतं. तरीदेखील यांनी झाड काढलं नाही. निवेदन वाचून देखील काम करत नसतील तर यांच्या बुद्धीला गंज चढला आहे का? सातवा वेतन आयोग घेणारे, जनतेच्या करातून पगार घेणारे काम का करत नाहीत? - सुधीर मुनगंटीवार, आमदार, भाजप
#SudhirMungantiwar #chembur #mumbai #maharashtra
सचिन अहिरांना आम्ही काय कमी केलं? अहिरांच्या भावाला बीएमसी दिली, मुलीला प्रभाग समिती दिली, त्यांना बेस्टचं अध्यक्षपद दिलं. रोज भेटत होतो, आता काय अहिरांसारख्यांची रोज काय आरती करायची? - आदित्य ठाकरे, आमदार, शिवसेना ठाकरे गट
#AadityaThackeray#Shivsena#SachinAhir#shivsena #ShivsenaUBT
(Aaditya Thackeray, Shivsena, Sachin Ahir, Shivsena, Shivsena UBT, Maharashtra)
योग ही आनंदी जीवन, निरोगी शरीर आणि शांत मनाची गुरुकिल्ली आहे. आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त संतुलित जीवनासाठी एक पाऊल पुढे येऊया.
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा!
#आंतरराष्ट्रीय_योग_दिन_२०२६
रावसाहेब दानवे म्हणतात संजय राऊत काय भाषा वापरतात. पण जे रावसाहेब दानवे प्रामाणिक शेतकऱ्यांना 'साले चोर, लफंगे, दरोडेखोर' म्हणतात, ती कोणती भाषा? आम्ही गद्दारांना शिव्या घातल्या तर तुम्हाला गद्दारांविषयी इतकं प्रेम का? - संजय राऊत, खासदार (ठाकरे गट)
#SanjayRaut#RaosahebDanve #MaharashtraPolitics #MarathiNews
राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोर आणि बनावट उत्पादनांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात एफडीएने धाड टाकून स्तनांचा आकार वाढवणे, पार्श्वभाग सुडौल करणे आणि चरबी कमी करण्याचे भ्रामक दावे करणारी सौंदर्यप्रसाधने जप्त केली. या उत्पादनांवर बॅच नंबर, परवाना क्रमांक आणि उत्पादकाची माहिती नव्हती. याशिवाय उपचार व सौंदर्यवर्धनाचे दावे करणारी तेले देखील जप्त करण्यात आली. दरम्यान, कांदिवलीतील एका बेकायदा उत्पादन युनिटवर छापा टाकून औषधे, सौंदर्यप्रसाधने, कच्चा माल आणि यंत्रांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
.
.
.
#FDARaid #TukaramMundhe #MumbaiNews #FakeCosmetics #HealthSafety