चार स्तंभ. एकच खांब?
भारताची राज्यघटना केवळ कायद्यांची पोथी नाही.
ती या विशाल, वैविध्यपूर्ण देशाच्या सामूहिक आकांक्षांचा करार आहे.
स्वातंत्र्याचा. समतेचा. न्यायाचा. बंधुतेचा.
लोकशाहीची इमारत चार स्तंभांवर उभी असल्याचे आपण म्हणतो;
विधिमंडळ, क���र्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे.
ही चारही संस्थाने आपापल्या जागी स्वतंत्र.
एकमेकांपासून पुरेशा अंतरावर.
एकमेकांवर लक्ष ठेवणारी.
एकमेकांना जाब विचारणारी.
इमारतीला बळ मिळते ते स्तंभांच्या संख्येनेच नव्हे.
त्यांच्या योग्य अंतरानेही.
चार स्तंभ एकमेकांत मिसळले, तर ती स्थिरता राहत नाही.
एकच खांब उरतो.
आणि लोकशाहीची इमारत थरथरू लागते.
मग त्या खांबाला कोण जाब विचारणार?
तो स्व��ःलाच?
स्वतःच्या सावलीला?
विधिमंडळाचे काम कायदे करणे.
कार्यपालिकेचे काम ते राबवणे.
न्यायपालिकेचे काम संविधानाच्या कसोटीवर त्यांची तपासणी करणे.
आणि माध्यमांचे काम सत्तेला प्रश्न विचारणे.
पण प्रश्न विचारणारा प्रश्न टाळू लागला, तर?
तपासणी करणारा तपासणीपासून दूर राहिला, तर?
सत्तेवर लक्ष ठेवणारा सत्तेच्या जवळ बसला, तर?
मग लोकशाहीचे नाव शिल्लक राहते.
तिचा स्वभाव मात्र बदलतो.
सभागृहात बहुमताचा आवाज घुमतो.
प्रश्नांची जागा घोषणांनी घेतली, तरी लोकशाहीचा उत्सव सुरूच राहतो.
प्रशासन निर्णयांची अंमलबजावणी करते.
पण स्वतंत्रपणे बोलण्याची जागा आक्रसली, तरी फाइलवर सर्व काही सुरळीत दिसते.
न्यायालये आहेत.
माध्यमे आहेत.
मथळे आहेत.
मग काळजी कसली, असा दिखाऊ प्रश्न विचारला जातो.
काळजी आहे.
कारण केवळ संस्था अस्तित्वात असणे पुरेसे नसते.
त्या स्वतंत्रपणे काम करतात का, हे महत्त्वाचे असते.
संस्थांचे अंतर कमी होत असल्याची चिन्हे दिसत असतील, तर
तो नागरिकांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे.
संस्थांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे.
आणि राज्यघटनेने दिलेल्या आश्वासनांचा प्रश्न आहे.
लोकशाही एका दिवसात कोसळत नाही.
ती आधी आतून रिकामी होते.
संस्था राहतात.
नावे राहतात.
निवडणुका राहतात.
पण स्वायत्ततेचा गाभा झिजत जातो.
नागरिकांनी सावध राहिले पाहिजे.
समाजाने प्रश्न विचारले पाहिजेत.
माध्यमांनी सत्तेपासून अंतर राखले पाहिजे.
न्यायपालिकेने संविधानाशी निष्ठा ठेवली पाहिजे.
कार्यपालिकेने कायद्यापुढे उत्तरदायी राहिले पाहिजे.
विधिमंडळाने बहुमताला अमर्याद अधिकार समजू नये.
कारण लोकशाहीची इमारत ढासळली,
नागरिकांचे अधिकार दबतात.
स्वातंत्र्य दबते.
आणि राज्यघटनेने दिलेली सामूहिक स्वप्नेही.
म्हणून,
स्तंभांमधील अंतर जपा.
नाहीतर एक दिवस इमारत उभी दिसेल,
आणि आत लोकशाही असेल का?
संविधान दिनाच्या शुभेच्छा
-महेश झगडे
@Flipkart I placed order on you for bed Nilkamal make. You delivered it but not marked as delivered and canceled order. Refunded me. As item was delivered,I paid to Nilkamal. But installation is pending. Your assembly arm didn’t contact me and claiming I didn’t take call.
@flipkartsupport I placed order on you for bed Nilkamal make. You delivered it but not marked as delivered and canceled order. Refunded me. As item was delivered,I paid to Nilkamal. But installation is pending. Your assembly arm didn’t contact me and claiming I didn’t take call.
@flipkartsupport my order for Nilkamal SLEEP Grande Engineered Wood King Bed, has been delivered. But installation is pending. Pl arrange for installation.
I have transferred the amount payable to Nilkamal through payment link.
Order is complete except installation. Urgent pl.
@ekartlogistics I have been allotted a technician for installation of bed since last week. But nobody reported.
I am loosing my patience now.
If not done, I will be constrained to return the item delivered and claim for refund to Nilkamal.
Treat this urgent. PIN given today 321.