तुळजापूरची तुळजाभवानी नेपाळला गेली त्याची कथा:
नेपालच्या काठमांडू येथे तलेजू भवानी मंदिर आहे, जे महाराष्ट्रातील तुळजापूरपासून सुमारे २,००० किलोमीटर दूर आहे. दोन्ही ठिकाणी देवी तुळजा भवानीची पूजा केली जाते. शतकानुशतकांपूर्वीच्या स्थलांतर, धर्म आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीची ही कथा वाचा.
#इतिहास #महाराष्ट्र #नेपाल #मराठी #नेपाळी #तुळजाभवानी #हिंदूधर्म #मध्ययुगीनइतिहास #भारतीयइतिहास #तुळजाभवानी #तलेजूभवानी #जयभवानी
महाराष्ट्रातील अनेकांसाठी देवी तुळजा भवानी ही कुलदेवता आहे. तिचे मंदिर महाराष्ट्रातील धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद जिल्हा) येथील तुळजापूर येथे आहे. तुळजापूरचे मूळ नाव ‘ठाणे चिंचपूर’ किंवा ‘चिंचपूर’ असावे. देवीचे नाव ‘त्वरिता’ किंवा ‘तुरजा’ यापासून आले असावे. स्कंद पुराणात ‘त्वरिता’ ही देवीचा महिषासुरमर्दिनीची अवतार म्हणून उल्लेख आहे.
देवी ‘तुळजा’ ची पूजा बहामनी काळापूर्वीची असू शकते, ज्याचा पुरावा धाराशिवातील काटी येथील मारुती मंदिरातील शिलालेखात ‘श्री तुळजे मातेशि’ असा उल्लेख आहे. त्यापूर्वी देवगिरीच्या यादवांच्या राज्यकाळातही देवी तुळजाची पूजा झाली असावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे मंदिर प्रसिद्ध झाले आणि आदिलशाही सेनापती अफझल खानाने त्याचा विध्वंस केला.
नेपाळमध्ये तुळजा भवानी किंवा तलेजू भवानी (त्या देशात तिला तलेजू भवानी म्हणतात) यांचे तीन प्रमुख मंदिरे आहेत – काठमांडू, पाटण (काठमांडूपासून ७ किमी) आणि भक्तपुर. ती नेपाळातील नेवार लोकांची कुलदेवता आहे. असे सांगितले जाते की, मिथिलेच्या कर्नाट किंवा कर्नाटकी राजवंशाचे राजे हरिसिंहदेव किंवा हरी सिंह देव यांनी १४व्या शतकात काठमांडूमध्ये तलेजू भवानी मंदिर बांधले. ते नान्यदेव यांच्या राजवंशाचे होते. स्थानिक लोककथेनुसार हे राजे महाराष्ट्रातील कोकणातून आले असावेत आणि सोलापूर येथील चंद्रभागा नदीकाठी (तुळजापूरच्या जवळ) वसले होते. तिथून पुढे त्यांनी मिथिला/ नेपाळमध्ये स्थलांतर केले असावे
दुसरी कथा अशी आहे की, हरिसिंहदेव यांनी देवी भवानीचे यंत्र भक्तपुरात (नेपाळ) स्थापित केले, जे नान्यदेव दक्षिणेकडून घेऊन आले होते. देवीने स्वप्नात नान्यदेवाला हे यंत्र दिले असे म्हणतात. म्हणून, महाराष्ट्रातून आलेल्या राजांनी तुळजा भवानीची पूजा केली असावी आणि ही परंपरा ते नेपाळपर्यंत घेऊन गेले असावेत.
स्रोत:
महाराष्ट्र संस्कृती: घडण आणि विकास
• ह. श्री. शेणोलीकर प्र. न. देशपांडे
नेपाळला गेलेली देवी
• अक्षय चव्हाण
(https://t.co/vNipeASW5P…)
या वकिलाला प्रसिद्धी द्या.
अरे हट, नोटीस पाठव नाही तर काही ही कर. घटनात्मक अधिकारात (३४५) राज्याने निर्णय घेतला आहे. जनसंपर्क असलेल्या ठिकाणी स्थानिक राज्य भाषेचा आग्रह राज्य करु शकते. तुम्हाला भाषिक म्हणून रोखले जात नसून, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारला हा निर्णय घेणे आवश्यक होते. इथे तुमचा (३४३) अंतर्गत केलेले नियम लागू होत नाहीत. ना वैयक्तिक हक्काचे उल्लंघन. राज्याच्या सीमा भाषावार झालेल्या आहेत. मराठी लोकांनी (३४७) ला विरोध करणे आवश्यक आहे. तसेच आर्टिकल १९ मधील अधिकार सिमीत केले तर भविष्यातील संघर्ष टाळता येईल. @CMOMaharashtra@PratapSarnaik
भारताला एका भाषेची गरज नाही. स्थलांतर थांबवा.
मराठी भाषा, मराठी सांस्कृती, मराठी इतिहास, गड किल्ले, रूढी परंपरा धोक्यात येणार आहेत. महाराष्ट्र भूमीची शकले होऊ नये असे वाटत असेल तर श्रेयवादातून बाहेर येऊन सर्व पक्षीय नेत्यांची स्वायत्त महाराष्ट्र आघाडी तयार करा... अन्यथा महाराष्ट्र खड्यात जाईल.
जय महाराष्ट्र मी मराठी
सुदानात्प्राप्यते भोगः सुदानात्प्राप्यते यशः
सुदानात् जायते कीर्तिः सुदानात् प्राप्यते सुखम् ||
अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र, शुभ आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा सण मानला जातो. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो. "अक्षय" या शब्दाचा अर्थ कधीही न संपणारे, नाश न होणारे असा होतो. त्यामुळे या दिवशी केलेले पुण्यकर्म, दान, जप-तप आणि पूजा यांचे फळ अक्षय म्हणजेच कायम टिकणारे असते. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे कोणतेही शुभकार्य करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते.
अक्षय तृतीयेचे महत्त्व केवळ धार्मिक नसून तात्त्विक दृष्ट्याही अत्यंत गूढ आणि अर्थपूर्ण आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक कर्माचे फळ नष्ट होत नाही तर ते संचयित होत राहते. या पार्श्वभूमीवर अक्षय तृतीया हा दिवस चांगल्या कर्मांचा संचय वाढवण्याचा मानला जातो. या दिवशी वातावरणात सात्त्विकता अधिक असल्याचे मानले जाते त्यामुळे जप, ध्यान आणि साधना अधिक फलदायी ठरते. हा सण माणसाला केवळ भौतिक समृद्धी नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीकडेही प्रेरित करतो.
पौराणिक दृष्टिकोनातून पाहिले तर अक्षय तृतीया अनेक महत्त्वाच्या घटनांशी जोडलेली आहे. या दिवशी भगवान विष्णू यांचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म झाला, त्यामुळे हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही साजरा केला जातो. तसेच महर्षी वेदव्यासांनी महाभारताचे लेखन या दिवशी सुरू केले आणि भगवान गणेशांनी ते लिहिले. महाभारतातील अक्षय पात्र ही कथा देखील या दिवसाशी निगडित आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना असे पात्र दिले की ज्यातून अन्न कधीही संपत नव्हते. याशिवाय गंगा नदीचे पृथ्वीवर अवतरण आणि श्रीकृष्ण-सुदामा यांच्या मैत्रीच्या कथा देखील या दिवशी सांगितल्या जातात. ज्यातून दान, श्रद्धा आणि निःस्वार्थ भाव यांचे महत्त्व अधोरेखित होते.
अक्षय तृतीयेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दानधर्म. या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य देणारे मानले जाते. अन्नदान, पाण्याचे मडके (उदककुंभ), वस्त्रदान, धान्यदान किंवा गरजू लोकांना मदत करणे हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. दान करताना अहंकार न ठेवता करुणा आणि सेवाभाव ठेवणे आवश्यक आहे कारण खऱ्या अर्थाने तेच दान फलदायी ठरते.
सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहिले तर अक्षय तृतीया हा सण समाजातील एकात्मता आणि सहकार्य वाढवणारा आहे. शेतकरी या दिवशी शेतीच्या नव्या कामांची सुरुवात करतात. महिलांमध्ये हळदी-कुंकू समारंभ आयोजित केले जातात ज्यामुळे सामाजिक बंध अधिक दृढ होतात. व्यापारी वर्ग या दिवशी नवीन हिशोब पुस्तके सुरू करतात ज्यामुळे आर्थिक वर्षाची सुरुवात शुभ मानली जाते. तात्त्विक दृष्टिकोनातून अक्षय तृतीया आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. संपत्ती ही केवळ धनाने मोजली जात नाही तर चांगले कर्म, दान, सद्गुण आणि सकारात्मक विचार यांमधून खरी समृद्धी प्राप्त होते.
अक्षय तृतीया हा सण आध्यात्मिक उन्नती, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम आहे. हा दिवस आपल्याला चांगल्या सवयी अंगीकारण्याची प्रेरणा देतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. सर्वांना अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा 🙏 🙏
#अक्षय_तृतीया #AkshayaTritiya
NCERT ने मराठा इतिहासकारांचा सल्ला न घेता, तक्रार करणाऱ्या राजपूत व त्यांच्या तथाकथित राजघराण्यांच्या दबावाला बळी पडून NCERT ने १८व्या शतकातील मराठा साम्राज्याचा अटक ते कटकपर्यंतचा नकाशा काढून टाकला आहे.
या लोकांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली व RTI दाखल केली आणि राजकीय दबाव टाकला.
ही बाब मी
@YuvrajSambhaji@Mudhojiraje@Chh_Udayanraje
यांच्या निदर्शनास आणू इच्छितो.यावर आवाज उठवा आणि मराठा -महाराष्ट्रच्या इतिहासावर होत असलेला अन्याय थांबवा.
#SaveMarathaHistory
The removal of the Maratha Empire’s map from NCERT textbooks is an attempt to erase Maratha history. I urge all Marathi leaders, scholars, and Maratha royal families to unite and take a firm stand. This is a collective fight for our #SaveMarathaHistory your support is essential.