वाल्मीकच्या प्रकरणात तुम्ही सगळ्यांनी पाहिले असेल कसे जात म्हणून सगळे लोक पाठीशी उभे राहतात. आरोपी साठी मोर्चे काढले जातात,उपोषण केली जातात. जातीसाठी माती खाणं म्हणजे हेच, हा समाज फार एकीने अशा गोष्टी करतो. वंजारी अधिकारी,ब्राह्मण अधिकारी त्यांच्या समाजातील मुलांना फार मदत करतात अगदी पायावर उभा करायला सुद्धा, एखादा मुलगा सरकारी कार्यालयात फार फिरत असेल तर त्याची विचारपूस करून त्याला जवळ घेऊन पैशाची कामे देण्याचे, त्याच्या अर्थाजन करायची व्यवस्था लावायचे कामे या जातीची अधिकारी लोक करतात, त्या उलट मराठा समाजाचं आणि मराठा अधिकाऱ्यांचे वागणं आहे. मराठा राजकारणामुळे मराठा समाजाची वाताहात झालेली आहे, मराठ्यांचं राजकीय महत्त्व संपलेले आहे. त्यात मराठा अधिकारी फारसं कोणाला समाज म्हणून मदत करत नाहीत, अनेकांना जात नाव काढणे आणि जातीसाठी काही करणं म्हणजे आपण जातीवादी असल्यागत वाटतं. त्यामुळे ते समाजातील कोणाच्याही करंगळीवर मुतत नाहीत, मराठा अधिकाऱ्यांच्या काही संघटना आहेत त्यात फक्त प्रमोशन आणि त्यांच्या नोकरी विषयक अडचणी त्याच्या पलीकडे विचार केला जात नाही.. हे जुने जाणते मराठा अधिकारी नव्या जॉईन झालेल्या मराठा अधिकाऱ्यांना सुद्धा मदत करत नाहीत तर समाजातील समाजासाठी लढणाऱ्या तरुणांच्या पाठीशी कसे राहणार. माझ्या आजवरच्या जीवनात काम करत असताना मला बहुजन दलित आदिवासी अधिकाऱ्यांनीच मदत केलेली आहे अपवादात्मक काही मराठा असतील. मराठा अधिकाऱ्यांचा समाजाप्रती असणारा हा दृष्टिकोन फार काही चांगला नाही, राजकारणात ही मराठ्यांच काही उरलं नाही पण प्रशासनातही पुढे जाऊन फार काही उरणार नाही. आधीच या समाजाची कुठली आयएएस-आयपीएस लॉबी नाही, जे काय आहे ते राज्य केडर मधले लोक आहेत. प्रशासनातला दुजाभाव तेही पाहतात पण तो दूर करण्यासाठी काही करत नाहीत. ही खंत वाटते..
- भैया पाटील /Bhaiya Patil
१९९५ कायद्यानुसार दिव्यांगाना ५% राखीव कायदा आहे, सहकार खात्यात याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही.
दिव्यांगाना गाळे बाजार समितीतर्फे वाटपात ५% आरक्षण, शेतकर्यांना आर्थिक मदत, नौकरीत आरक्षण ई. संबंधित मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
“बाबासाहेबांचं संविधान आणि छत्रपतींचा स्वाभिमान या देशात जिवंत राहायला हवा, यासाठी आजची ही लढाई आहे. ही निवडणूक नसून लढाई म्हणून आम्ही स्वीकारू.” बच्चू कडू साहेबांची ही भूमिका सर्वसामान्य जनतेची भावना बोलून दाखवणारी आहे.
देशभरात निवडणूक ही आता निवडणूक राहिलेली नाही तर जनतेची लढाई झालेली आहे आणि जेंव्हा जनताच निवडणूक हातात घेते तेंव्हा काय निकाल येतो ते कसबा पोटनिवडणुकीत आपण बघितलंय. तसाच निकाल ४ जूनलाही येईल यात काही शंका नाही.
मधला काही काळ बच्चू कडू साहेब भरकटले असले तरी उशिरा का होईना त्यांनी जागं होऊन जनतेची बाजू घेतली याबद्दल त्यांचे आभार. आता केवळ ‘सागर’ किंवा ‘वर्षा’वर बैठक होऊन तडजोडी करून त्यांनी झोपेचे सोंग घेऊ नये ही अपेक्षा! ते स्वाभिमानी आणि लढाऊ असल्याने देशाच्या संविधांनासाठी आणि छत्रपतींच्या स्वाभिमानासाठी तरी ते इतरांप्रमाणे उपसलेली तलवारी म्यान करणार नाहीत, असा विश्वास वाटतो!
प्रहार नवी मुंबई आयोजीत अभंग सोहळा उपस्थिती दर्शवली. संताचे अभंग नविन युगाची कास धरुन "अभंग रिपोस्ट" या बँडने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रहार नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष प्रविण खेडकर, चंद्रकांत उतेकर व टिमने अतिशय चांगला उपक्रम राबविला..
जरांगे पाटलासारखे प्रामाणिक नेतृत्व फार कमी आहे. त्यांची समाजाला गरज आहे. आज पासुन जरांगे पाटलांनी पाणी त्याग करु नये या विनंतीसाठी सिंदखेड राजा येथे रक्तदान करुन अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांची भेट घेतली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात दादा पाटील यांच्या कडुन रक्षाबंधनची अनोखी भेट,
जाई ताई खामकर मागील अनेक वर्षापासून राज्यातील अंध मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी निवासी महाविद्यालय चालवितात. अनुदानासाठी मागील अनेक वर्षापासून जाई ताई व आम्ही प्रयत्न करत होतो. (१/२)
चर्मकार बांधवांना विवीध शासकीय योजनेचा लाभ देणे व चर्मकार बांधवांना व्यवसायाकरीता ५०,००० ते ५,००,००० पर्यत कर्ज उपलब्ध करून देण्याकरीता, कुरळपूर्णा येथे चर्मकार बांधवाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ५० लाभार्थ्यांना जागेवर कर्ज उपलब्ध करून देण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्ष व अमरावती सायकल असोसिएशन द्वारा आयोजित
"शहिदो के सन्मानमे सायकल रॅली"
स्थळ :- नेहरू मैदान, अमरावती ते यावली शहीद
वेळ - सकाळी १० वाजता
दि. १५ ऑगस्ट २०२३
संपर्क :-
संदीप रोंघे 8379921963, संजय गोमकाळे 9860042025
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन Paytm First या ऑनलाइन जुगाराची जाहीरात लवकरात लवकर मागे घ्यावी. तसेच अश्या ऑनलाइन जुगाराचा स्पष्ट विरोध करावा. अन्यथा कायदेशीर परिणामांना सामोरे जावे...
@sachin_rt
महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान शुभारंभ...
दि. ७ जुन २०२३
हॉल क्र. ५, नेस्को एक्झिबिशन & ट्रेड सेंटर, गोरेगाव पूर्व, मुंबई..