दिनांक 25 जून 2026 रोजीच्या गट-क पदासाठीच्या जाहिरातीत परीक्षा ऑनलाईन असल्याचं समजलं. पण 2025 पूर्वी ऑनलाइन भरती परीक्षांमध्ये झालेला गो��धळ, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळेच विविध पदांच्या परीक्षा #MPSC कडे वर्ग करण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत आज पुन्हा MPSC नेच ऑनलाइन परीक्षांचा निर्णय घेणं म्हणजे विद्यार्थ्यांची थट्टा करण्यासारखं आहे. ऑनलाइन परीक्षांमुळं दूरची परीक्षा केंद्रं, आर्थिक व मानसिक ताण, Normalization संदर्भातील प्रश्न तसेच प्रक्रियेत फेरफार होण्याबाबत निर्माण होणारा अविश्वास क���यम राहतो. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करून गट-क व इतर सर्व भरती परीक्षा पूर्ववत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळं MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता त्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत असू..!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
गेली 10 वर्षांपासून आम्ही सतत मागणी केली कीं सर्व स्पर्धा परीक्षा mpsc कडे देण्यात याव्यात. ऑनलाईन परीक्षेमुळे खासगी कंपन्याकडून होणारे गैरप्रकार थांबतील.mpsc कडून ऑफलाईन व पारदर्शक रित्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणून आम्ही mpsc वर विश्वास दाखवला. त्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने केली. अंगावर गुन्हे देखील दाखल झाले. पण आज mpsc नेच परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घे��ला. म्हणजे यात पुन्हा खासग्या कंपन्या येणार. आणि पुन्हा तोच भोंगळ कारभार कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. अधिवेशनात ह्या विरोधात नक्की आवाज उठवणार. सर्व परीक्षा ह्या ऑफलाईनच व्हायला हव्यात.
@CMOMaharashtra @DrSEShinde @mieknathshinde @mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज महाराष्ट्र गट-क सेवा ��ंयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीनुसार, सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित (ऑनलाईन) पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये घेण्यात येणार असून गुणांचे समानीकरण करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वी विविध निवड मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या संगणक आधारित परीक्षा व समानीकरण प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांचे अनुभव फारसे समाधानकारक नसल्याने, ही परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने आणि एकाच सत्रात घेण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची व्यापक भावना आहे.
विद्यार्थ्यांची ही भावना मी काही वेळापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, उद्या दि. 26 जून रोजी सकाळी 11:00 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच, पुणे येथे सारथी कार्यक्रमानिमित्त मा. मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत. त्या वेळी मी मा. मुख्यमंत्री महोदय यांचेशी देखील या विषयावर चर्चा करणार आहे. यावेळी आपल्या विविध मागण्या व समस्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी मी स्वतः उपलब्ध असेन.
#MPSC #MPSCStudents #स्पर्धा_परीक्षा #महाराष्ट्र
१० महिने उलटूनही भरती प्रक्रियेबाबत काहीच हालचाल नाही, अभ्यासक्रम नाही, परीक्षा वेळापत्रक नाही, प्रत्यक्ष भेट दिल्यावर पण नुसते उ���वा उडवी चे उत्तरे दिले जात आहेत. नक्की कुणाच्या दाबावर भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे? @TMCaTweetAway @Awhadspeaks @mieknathshinde @CMOMaharashtra
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांवर अन्याय? नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात तीव्र संताप
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ मे २०२६ रोजी जाहीर केलेल्या नवीन सेवा प्रवेश नियमांविरोधात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. Commerce Specific असलेल्या गट ‘अ’, गट ‘ब’ तसेच गट ‘क’ संवर्गातील Audit, Accounting, Taxation आणि Finance संब��धित पदांसाठी इतर शाखांतील उमेदवारांनाही पात्र करण्यात येत असल्याने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी याला अन्यायकारक निर्णय म्हटले आहे.
Accounting, Auditing, Taxation, Finance, Costing आणि Financial Management यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांकडेच असते. https://t.co/zkxRhjLMrS., https://t.co/nJ4vBZA2xM., CA, CMA, CS यांसारखे अभ्यासक्रम पूर्ण करून हजारो विद्यार्थी अनेक वर्षे या क्षेत्रातील शासकीय सेवेसाठी तयारी करत असतात. दरवर्षी ज���ळपास ४० ते ५० हजार विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना सामोरे जात असताना इतर शाखांतील उमेदवारांना समान पात्रता देणे म्हणजे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
विद्यार्थ्यांनी शासनाकडे ‘लेखा व लेखापरीक्षण’ हा स्वतंत्र संवर्ग तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच Commerce Specific पदांसाठी पूर्वीप्रमाणेच ‘वाणिज्य शाखेतील पदवी’ हीच शैक्��णिक पात्रता कायम ठेवावी, स्वतंत्र Cut-Off लागू करावा आणि गट ‘क’ मधील Audit, Accounting, Taxation, Finance संबंधित पदांसाठी स्वतंत्र संवर्ग निर्माण करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनीच का अन्याय सहन करायचा?” असा सवाल उपस्थित करत विद्यार्थ्यांनी शासनाने या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
@CMOMaharashtra
@MahaChiefSec
#CommerceStudents
#PrabuddhBharat
भरती परीक्षेच्या निकालानंतर किमान चार दिवसात नियुक्तीपत्र द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२ वर्ष झाली भरती पूर्ण ह��त नाही, DV होऊन ६ महिने झाले, तरी joining चा पत्ता नाही cidco recruitment 2023 dec @CIDCO_Ltd @Dev_Fadnavis @MahaDGIPR @mieknathshinde @CMOMaharashtra
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पुर्व परीक्षा २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीस जवळपास सात महिने उशीर झाला. यामुळे अनेक उमेदवार वयाच्या अटीत ब���त नसल्याने अपात्र ठरले आहेत. गेल्यावर्षी जाहिरात उशीरा आल्यामुळे शासनाने वयात सवलत दिल्याचे जाहिर केले होते. हे लक्षात घेता सदर परीक्षेसाठी वयात सवलत द्यावी किंवा वय मर्यादा कालावधी १ जानेवारी २०२५ हा गृहीत धरावा अशी परीक्षार्थींनी मागणी केली आहे. या मागणीसाठी हे विद्यार्थी आंदोलन देखील करीत आहेत. विद्यार्थ्यांनी केलेली मागणी रास्त असून मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन वयोमर्यादेसंदर्भात निर्णय जाहिर करावा जेणेकरून अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा देता येईल, अशी आमची मागणी आहे.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
आदरणीय देव भाऊ पोरं दारोदारी भटकून न्याय मागून आता थकले आहेत आता पोर रस्त्यावर उतरत आहे.
कृपया आपण आता तरी न्याय द्यावा ही नम्र विनंती या मुलांना एक संधी द्यावी...!!!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
आज #PSI वयोमर्यादा वाढीसाठी विद्यार्थ्यांना पुण्यातील रस्त्यावर उतरण्याची वेळ महायुती सरकारच्या निष्क्रियतेमुळेच आली आहे. लाखो तरुणांचे भवितव्य धोक्यात घालणाऱ्या या सरकारच्या अन्यायकारक भूमिकेविरोधात सुरू असलेल्या संवैधानिक आंदोलनात काँग्रेस पक्ष सक्रियपणे सहभागी होईल.
विद्यार्थ्यांच्या न्याय���य मागण्यांसाठी काँग्रेस शेवटपर्यंत खंबीरपणे त्यांच्या सोबत उभी राहील.
पुणे पोलिसांनी शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नये, ही स्पष्ट व ठाम विनंती.
तरुणांच्या हक्कांसाठी, संधींसाठी आणि न्यायासाठी हा लढा अखेरपर्यंत लढला जाईल. ✊
@INCHarshsapkal @mpsc_office
@DGPMaharashtra @PuneCityPolice
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR #StudentsForJustice #YouthRights
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे देवा भाऊ
#PSI वयवाढ २०२५
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@AbhiPawarBJP
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ साठी एकूण ६७४ पदांची जाहिरात प्रस��द्ध झाली असून, त्यापैकी ३९२ पदे पोलीस उपनिरीक्षकांची आहेत.
साधारणतः ही जाहिरात डिसेंबर जानेवारी महिन्यात जाहीर होते व परीक्षा मार्च महिन्यात घेतली जाते. मात्र यावर्षी ही जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली असून, परीक्षा २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.
या परीक्षेसाठी १ नोव्हेंबर २०२५ ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र या तारखेच्या अटीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने मेहनत घेऊन या परीक्षेची तयारी करणारे हजारो विद्यार्थी वय���मर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत.
ही बाब अत्यंत दुर्दैवी व अन्यायकारक आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून संबंधित विद्यार्थी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत, मात्र अद्याप याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर माझी शासनाकडे विनंती आहे की, या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ या परीक्षेसाठी दिला आहे. केवळ तांत्रिक कारणामुळे त्यांच्या हा���ातून संधी हिरावून घेणे योग्य ठरणार नाही.
तरी न्याय्य भूमिका घेत सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
संयुक्त पूर्व परीक्षा २५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्याससाठी ७ महिने उशिर झाला आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RRPSpeaks@supriya_sule
https://t.co/PsuOALrce7
मा @mpsc_office आयोग
MPSC गट ब पूर्व परीक्षा 2025 जी 21 डिसेंबर रोजी होणार की नाही त्याबद्दत संभ्रम दूर करावा
नगरपरिषद,नगरपंचायत निवडणुक मतमोजणी आणि गट ब पूर्व एकाच दिवशी आल्याने
मा. आयोग परिपत्रक काढून लवकरात लवकर सभ्रंम दूर करावा विनंती
@CMOMaharashtra@Dhananjay4INC
📢 वाणिज्य पदवीधारकांचा प्रचंड आवाज — आता एकत्र येऊया!
Commerce ला दुसऱ्या दर्जाचा कोर्स समजणं —
❌ आता अजिबात चालणार नाही!
आपण शिकतो — Accounts • Finance • Auditing • Taxation
मग लेखा–ऑडिट–अकाउंट्स जागांवर
“Any Graduate” का?
ही थट्टा आता सहन नाही!
आपण अर्थव्यवस्थेचं इंजिन आहोत.
आपल्या हक्काच्या जागांसाठी
आता Commerce ची एकजूट दाखवायची वेळ आली आहे!
🔥 आता सहन नाही — आता फक्त हक्क, तडफ आणि Commerce चा दम! 🔥
📍 स्थळ : मंत्रालय, मुंबई
📅 दिनांक : 1 डिसेंबर 2025
⏰ वेळ : सकाळी 10 वाजता
#MPSC कडून संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब) 2025 साठी एकूण 674 पदांची जाहिरात काढण्यात आलेली असून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) 392 पदांचा समावेश आहे. सामान्यतः संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात डिसेंबरमध्ये प्रकाशित होऊन परीक्षा फेब्रुवारी/मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येते, मात्र यावेळी सदर जाहिरात जुलै 2025 रोजी प्रकाशित होऊन परीक्षा 21 डिसेंबर 2025 रोजी होत असून वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 1 नोव्हेंबर असल्यामुळे कम्बाईन परीक्षेचा अभ्यास करणारे विशेषतः PSI पदासाठी तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा ओलांडल्यामुळे नुकसान होणार आहे.
गेले तीन महिने झाले विद्यार्थी PSI साठीची वय सवलत याबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत परंतु अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. परीक्षेच्या वेळापत्रकाला ध���्का न लावता कम्बाईन विशेषतः PSI पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वय सवलत देण्यात यावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
📢 We are not against anyone — we are standing for justice.
Commerce students deserve equal recognition & fair recruitment in Government jobs.
Join the movement ✊
#JusticeForCommerce#CommerceCircle