मोदीजी अतिरीक्त ईंधन वापरू नका,मेट्रोने प्रवास करा असे सल्ले तुम्ही देताय...
अतिरिक्त ईंधन कोण वापरतो ? तुम्ही व तुमच्यासकट भाजपचे पदाधिकारी.लाखो मुंबईकर सार्वजनिक परिवहन मुंबई लोकल वापरतात,बेस्टने प्रवास करतात.तुम्ही बेस्टच खाजगीकरण करून बेस्ट मारून काढली आहे.रेल्वे प्रवासात रोज १० लोकांचा मृत्यु होतो.सार्वजनिक परिवहनाच्या विरोधात तुमची धोरणे आहेत.
मेट्रोने प्रवास करा म्हणता.मेट्रो देशाच्या किती शहरात आहेत.त्याची भाडी परवडणारी नाहीत.
देशाला अरिष्टात आणण्यास तुमची कॉर्पिरेट धार्जिणी,अदानी,अंबानी प्रेमी धोरणे कारणीभूत आहेत.देशवासियांना सल्ले हे तुमचे ढोंग आहे...
राजीनामा द्या...
लेनिनचा पुतळा पाडला तेव्हा गप्प बसलेल्या 'विचारवंत',तथाकथित पुरोगाम्यांसाठी,तसेच कम्युनिस्ट द्वेष्टांसाठी व लेनिन हा भारतीय नव्हता,त्याच्या विचारांबद्दल काय बोलता वगैरे,वगैरे सांगणाऱ्या मूर्खांसाठी.खालील दृश्य पहा,स्वामी विवेकानंद,रविन्द्रनाथ टागोर,नेताजी सुभाषचन्द्र बोस ईत्यांदिंच्या फोटोवर कपाळावर टीळा लावून जय श्रीराम,हरहर मोदी म्हणत बंगालमध्ये खुले आम फिरणारे देशभक्त...
निषेध
शेम ..
*📢 संयुक्त निदर्शनाची घोषणा*
*मा. आमदार संजय गायकवाड यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.*
*छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटे व अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर महाराजांचा तीव्र निषेध करण्यात यावा.*
या प्रमुख मागण्यांसाठी *महाविकास आघाडी, इंडिया आघाडी, डावे पक्ष, वंचित बहुजन आघाडी* तसेच इतर पुरोगामी संघटनांच्या वतीने
📍 *मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६*
🕟 *सायं. ४:३० वा.*
📌 *शिवतीर्थ (दादर), छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ*
येथे भव्य निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत.
हा निर्णय काल झालेल्या ऑनलाइन बैठकीत एकमताने घेण्यात आला.
या बैठकीस मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार *वर्षा गायकवाड*, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस *धनंजय शिंदे*, मुंबई प्रवक्ते *सुरेशचंद्र राजहंस*, शेतकरी कामगार पक्षाचे *कॉ. राजेंद्र कोर्डे*, *कॉ. सौम्या कोर्डे*, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते *कॉ. प्रकाश रेड्डी*, *कॉ. शंकर कुंचीकोरवे*, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे *कॉ. एस. के. रेगे*, *कॉ. शैलेन्द्र कांबळे*, भाकपा (माले) चे *कॉ. गोहिल*, वंचित बहुजन आघाडीचे *चेतन अहिरे*, राष्ट्रवादी काँग्रेसचे ;मुंबई अध्यक्ष *मिलिंदाण्णा कांबळे*, समाजवादी पक्षाचे राज्य सरचिटणीस *राहुल गायकवाड* आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. प्रकाश रेड्डी होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार *अनिल देसाई* यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच *अंधश्रद्धा निर्मूलन समिती* देखील या निदर्शनात सहभागी होणार आहे.
*आपण सर्वांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या भावना ठामपणे व्यक्त कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.*