पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पार्श्वभूमीवर विकासकामांना गती देण्याचे निर्देश
कामे निर्धारित वेळेत पूर्ण न केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश
पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध विकासकामे आणि पायाभूत सुविधांच्या कामांना गती देऊन ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश मा. पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम व मा. जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांना दिले.
पुणे ग्रँड टूरच्या अनुषंगाने सुरू असलेल्या पॅकेज १, २, ३ आणि ४ अंतर्गत सर्व कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे प्राधान्याने आणि जलदगतीने पूर्ण करावीत. कामांच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामांचा वेग वाढवावा. तसेच, निर्धारित मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या संबंधित कंत्राटदार व जबाबदार यंत्रणांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश मा. आयुक्तांनी दिले.
शहरातील विकासकामे करताना मेट्रो, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) तसेच इतर संबंधित संस्थांशी योग्य समन्वय साधून कामांचे नियोजन करावे. तसेच, सर्व संबंधित कंपन्यांनी शहरातील सुरू असलेली सर्व प्रकारची खोदाईची कामे दिनांक २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश यावेळी देण्यात आले. पुणे ग्रँड टूर २०२७ नंतर खोदाईची कामे करावयाची असल्यास संबंधित कंपन्यांकडून प्रचलित दराच्या चारपट दराने दंड आकारण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. विविध यंत्रणांमधील समन्वयाअभावी कामांना विलंब होणार नाही, याची दक्षता घेऊन सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
यावेळी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(ज) श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(वि) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. शहर अभियंता श्री. अनिरुद्ध पावसकर, मा. मुख्य अभियंता (पथ) श्री. राजेश बनकर, मा. उपायुक्त श्री. निखिल मोरे, मा. उपायुक्त श्री. माधव जगताप, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
https://t.co/vI31aw2xUv
#PuneGrandTour #InfrastructureDevelopment #PuneDevelopment #RoadDevelopment #UrbanDevelopment #DevelopmentWorks #RoadInfrastructure #CivicDevelopment #SmartPune #ProjectMonitoring #InfrastructureProjects #TimelyCompletion #RoadExcavation #InterDepartmentalCoordination #MaharashtraGovernment #PuneCollector #NavalKishorRam #JitendraDudi #PuneUpdate
सही केली… जबाबदारी कुणाची?
प्रमाणपत्र देणाऱ्यांचं काय?
प्रमाणपत्र चुकीचं दिलं गेलं असेल, तर जबाबदारी फक्त ते घेणाऱ्याचीच का? सही करणाऱ्यांची, तपासणी करणाऱ्यांची जबाबदारी काय? पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रक्रियेबाबत मी चौकशी मागितली. पात्र दिव्यांग व्यक्तींचा हक्क जपण्यासाठी पडताळणी आवश्यक आहे. तुमच्या मते जबाबदारी कुणाची? कमेंटमध्ये सांगा आणि हा प्रश्न इतरांपर्यंतही पोहोचवा.
#PoojaKhedkar #DisabilityCertificate #CertificateVerification #PublicAccountability #RightsOfPersonsWithDisabilities #LegalAwareness #VijayKumbhar
पूजा खेडकर प्रकरण, दिव्यांग प्रमाणपत्र, प्रमाणपत्र पडताळणी, प्रमाणपत्र देणाऱ्यांची जबाबदारी, सरकारी अधिकारी, प्रशासकीय उत्तरदायित्व, दिव्यांग व्यक्तींचे हक्क, सरकारी प्रक्रिया, legal awareness, Vijay Kumbhar
परवा रात्री मुंबई व पुणे येथे आगीच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीने नागरिक म्हणून सरकारला प्रश्न विचारावा वाटतो, आपण त्या सर्व राजकीय नेत्यांच्या फटका स्टॉल, मार्केट बंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करीत नाही?
अनेक पक्षांचे नेते, आमदार, नगरसेवक हे आधारस्तंभ आहेत.
@AsimSarode
@daribichaogang We have remote sensing department which can help you what exactly was in and around charminar. They can have you a proof of last 100 years, so you can claim that there is no Temple.