आज राजर्षी शाहू महाराजांची जयंती आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, सामाजिक समतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे.
त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आजही कोल्हापूर हिरवंगार आहे.
राधानगरी धरण हे राजर्षी शाहूंची मोठी देण आहे. २०१९ ला पावसाने ओढ दिली होती, तेव्हा राधानगरी धरणाचा इतिहास टिपून ठेवला होता. थोडा वेळ असेल तर नक्की पाहा..
राजा लक्षात राहतो तो शाळा, कॉलेज, रुग्णालय, उद्योग, शेती आणि समाजाला दिशा देणाऱ्या दूरदर्शी निर्माणामधून…!
राजर्षी शाहूंना विनम्र अभिवादन 🙏
#RajarshiShahuMaharaj #Maharashtra
ऐंशी नव्वदेचा पत्रकारितेचा काळ होता. त्यातच एक मराठी पत्रकार लोकप्रभा कडून बिहारला गेला होता. तिथल्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील माफियांवर लिहिण्यासाठी.
जहानबाद, धनबाद, आरा, गोपालगंज सारख्या बाहुबलींच्या भागात तो पत्रकार वास्तव्यास होता. त्याचवेळी चंद्रशेखर यांचे सरकार पडून देशात मध्यावधी निवडणुका लागल्या होत्या.
त्याचवेळी जहानबाद येथील नौनवी गावात राज्याचे मुख्यमंत्री भेट देणार होते. त्यामुळे सर्व पत्रकार त्याठिकाणी जायला निघाले होते. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, एस. पी, काही मंत्री यांच्या ताफ्यामागे पत्रकारांची एक जीप होती. आणि पत्रकारांच्या जीप पुढे खासदार महेंद्र प्रसाद यांची लाल रंगाची जिप्सी चालली होती. इतक्यात ती लाल रंगाची जिप्सी थांबली. त्यातून एकजण खाली उतरला. आणि त्याने पत्रकारांची जीप आडवली. पण पत्रकारांनी दुर्लक्ष केलं, पण दुर्लक्ष करताच त्या माणसाने जीप च्या चालकाला खाली ओढले.
तेवढ्यात लाल रंगाच्या जिप्सी मधून खासदारांचा भाऊ उतरला. आणि त्याने पत्रकारांशी धक्काबुक्की करत त्यांचे कॅमेरा हिसकावून घेतले.
पत्रकारांनी गावात पोहचताच तिथं उपस्थित असलेले गृहराज्यमंत्री यांच्याकडे त्या खासदार भावाची तक्रार केली. पण खासदारांचे नाव ऐकताच त्यांनी त्या गोष्टीकडे कानाडोळा केला. मग पत्रकारांनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि एस. पी. यांची भेट घेतली.
एस. पी. त्या सर्व पत्रकारांना घेऊन खासदारांच्या लाल रंगाच्या जिप्सी जवळ घेऊन गेले. ती जिप्सी हत्यारांनी गच्च भरली होती. खासदार भावाच्या हातात मशीनगन होती. एस. पी. ला पाहून खासदाराच्या भावाने कॅमेरा मधील रोल ओढून काढला आणि कॅमेरा एस. पी. साहेबांच्या अंगावर फेकला.
तेव्हा पत्रकारांना ताबडतोब पोलिस संरक्षण देऊन पाटणा येथे पाठवण्यात आले. कारण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांचे म्हणणे होते की, खासदाराच्या भावाचा भरवसा नाही. तो चिडला तर ह्या पत्रकारांसोबत काहीही करू शकतो.
सगळे पत्रकार निघून गेले. नौनवी गावात त्याच रात्री बराच नरसंहार झाला. पण एवढ होऊन सुद्धा एक निर्भीड पत्रकार सर्वांसोबत निघून न जाता तिथेच थांबला आणि साक्षीदार झाला त्या सर्व घटनेचा.
तो पत्रकार म्हणजे संजय राऊत...
- कपिल जाधव
@rautsanjay61 जी 🫡
Yes I did it!
मी आता आमदार किंवा खासदार नाही, पण आज माझं मन भरून आलं आहे.
महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर उभारल्या जाणाऱ्या नवीन ४०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयासाठी ३६० वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा ठराव जारी केला आहे. हे रुग्णालय अशा जमिनीवर बांधले जात आहे, जी मूळतः गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी वाटप करण्यात आली होती. गोपीनाथ मुंडे हे भाजपचे नेते होते, पण एक खरे लोकप्रतिनिधी होते, ज्यांचे माझ्यासकट सर्वजण कौतुक करत असत.
जेव्हा मी ते वाटप पाहिले, तेव्हा मी त्याला विरोध केला. मोक्याची सरकारी जमीन अशा स्मारकासाठी वापरली जात होती, ज्याचा फायदा त्यांच्या पक्षाव्यतिरिक्त कोणालाही होणार नव्हता. मी त्या निर्णयाविरुद्ध लढलो. मला शिवीगाळ झाली. बीड, आंबेगाव आणि परळी येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला धमक्या दिल्या. केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेवर नियंत्रण असलेल्या सत्ताधारी पक्षांतील राजकारण्यांनी माझी खिल्ली उडवली आणि मी हरणारी लढाई लढत आहे असे मला सांगितले. काहींनी तर माझ्या धर्माचा शस्त्र म्हणून माझ्याविरुद्ध वापर करत आणखी पुढे मजल मारली. एका व्यक्तीने मध्यरात्री फोन करून मला पाकिस्तानात जाऊन तिथे रुग्णालय बांधायला सांगितले.
मी शांत राहिलो. मला माझे ध्येय माहित होते.
२०१४ ते २०१९ या माझ्या आमदारपदाच्या कार्यकाळात, मी महाराष्ट्र विधानसभेत असा युक्तिवाद केला की स्मारकावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याऐवजी आपण गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने एक रुग्णालय बांधले पाहिजे. आपली सरकारी रुग्णालये दयनीय अवस्थेत होती. गरिबांना अत्यंत वाईट वागणूक दिली जात होती. पण कोणीही ऐकले नाही. त्यावर चर्चा करायलाही कोणी तयार नव्हते.
म्हणून मी एक वेगळा मार्ग निवडला. मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर जनहित याचिका क्रमांक ९९/२०१७ दाखल केली. शहराला कशाची गरज आहे हे न्यायालयाने समजून घेतले आणि रुग्णालयासाठी स्मारकाची जमीन हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. माझे वकील, श्री. शैलेश ब्रह्मे यांनी माझ्याकडून एक रुपयाही घेतला नाही — त्यांचा या कार्यावर विश्वास होता. ते आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. त्यानंतर मी निधीसाठी सरकारकडे पाठपुरावा केला, निविदा काढण्यात आल्या, कामाचे वाटप झाले आणि आता बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. रुग्णालय सुमारे सहा महिन्यांत तयार होईल.
माझा नेहमीच विश्वास होता की, हे रुग्णालय आमदार, खासदार किंवा शक्तिशाली राजकारण्यांच्या सेवेत येणार नाही — कारण सरकार आधीच देशातील सर्वोत्तम सुविधांमध्ये त्यांच्या आयुष्यभराच्या उपचारांची सोय करते. हे रुग्णालय गरीब, गरजू आणि ज्यांना खाजगी उपचार परवडत नाहीत अशा सर्वा
मला उद्घटनासाठी कदाचित आमंत्रित केले जाणार नाही. ज्या राजकारण्यांनी माझा विरोध केला होता, त्यांच्याच हस्ते रिबन कापली जाण्याची शक्यता आहे. पण जेव्हा कधी मी जालना रोडवरून जाईन आणि ती भव्य इमारत पाहीन, तेव्हा मी हसेन आणि स्वतःशीच म्हणेन — *इम्तियाज, तू करून दाखवलंस.*
आणि या रुग्णालयाचे नाव गोपीनाथ मुंडे मेमोरियल हॉस्पिटल असे ठेवले जावो. हीच तर नेहमीची कल्पना होती.
संजय दिना हा भुरटा इसम आहे.कोणतरी छोटू त्याच्या नावाचे बॅनर लावतोय.हा भानुशाली समाजात जाऊन पाठिंब्याचे व्हीडिओ करतोय.गोवंडी-मानखुर्दच्या मुसलमानांनी ठाकरेंवर विश्वास टाकून या भामट्याला मतं दिली म्हणून हा निवडून आला.संजय राऊतांनी याची लायकी काढली ते योग्य झालं.पुढच्या निवडणुकीत याला चोरसेनेकडून तिकीट न मिळणं किंवा मिळालं तरी हा दणकून ढुंगणावर आपटणं हीच याला योग्य शिक्षा होईल.
आणि त्यांनी मराठी भाषेचाच ‘शोकप्रस्ताव’ मांडला!
म्हणून मराठी शाळा टिकवा,
पोरांना मराठी बोलायला शिकवा!
नाहीतर मराठी भाषेचा ‘norwayकर’ होईल!
#मराठी#शाळामराठी
@Prasaadhere तरीही त्यांच्यात शंभूराजे देसाई सारखी हातापायी झाली नाही निदान त्यांच्या मित्रपक्षाने /मित्राने केली नाही 🤣😃😂😁😅
स्वाभिमान संपला की उरतात फक्त जिवंत प्रेत...
शिंदे गट...
नीट पेपरसाठी यायला 2 मिनिटं उशीर झाला म्हणून म्हणून अनेक मुलांना प्रवेश नाकारला. आपल्या यंत्रणांच्या नालायक पणामुळे अख्खा पेपर फुटला तरी काही नाही पण विद्यार्थाना थोडाही उशीर झाला की No entry. या पोरीने तिच्या बापाने मुलीच्या अभ्यासासाठी काय काय सॅक्रीफायसेस केले असतील.. सगळं 2 मिनिटात उध्वस्त.... ही आपली व्यवस्था.
@MeAkshayshinde Civic sense बद्दल शिंदेच्या लोकांनी बोलायचं म्हणजे तोंडांत मारून घेतल्यासारखं आहे...
अख्खे हिंदुत्व सोडलेले ६खासदार पावन करून घेतलेत...