खासदार संजय राऊत @rautsanjay61 यांनी माध्यमांशी बोलतांना माझ्या बद्दल वक्तव्य केलं असे ऐकले.
त्यांनी मला, बीड चे प्रकरण सोडून, आता विकासावर बोलण्याचा सल्ला दिला. मी त्यांच्या सल्ल्याचे स्वागत करते. पण मी एक अत्यंत सामान्य स्त्री, एक सामान्य नागरिक आहे, कुठलाही लढा मी हातात घेतला की मी तो तडीस जाई पर्यंत लढते.
बीड चे प्रकरण खूप गंभीर होते, मी खूप हलून निघाले होते, म्हणून ते मी लढत होते आणि न्याय होईपर्यंत लढत राहीन आणि त्या व्यतिरिक्त, मला झेपेल तेवढे विकासाचे मुद्दे मी नक्कीच एक सामान्य नागर���क म्हणून लढेन.