आत्मसंयम, शिस्त आणि सुदृढ आरोग्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे योग. नियमित योगाभ्यासाने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि मानसिक स्थैर्य लाभते. सशक्त शरीर आणि शांत मनासाठी योग अत्यंत आवश्यक आहे.
#जागतिक_योग_दिन#InternationalYogaDay#Yoga#आरोग्य#FitIndia
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
#राजमाता_जिजाऊ#RajmataJijau#राजमाता#स्वराज्य
रक्तदान म्हणजे गरजूंच्या आयुष्यातील निराशा दूर करून नव्या आशेचा आधार देणे होय. आपल्या एका रक्तदानामुळे एखाद्या रुग्णाला नवजीवन मिळू शकते.
चला, जागतिक रक्तदाता दिनानिमित्त जागरूक नागरिक म्हणून रक्तदान करूया!
#जागतिक_रक्तदाता_दिन#BloodDonor#BloodDonation#रक्तदान#WorldBlood
छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा लाल महाल, पुणे येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याची काही क्षणचित्रे!
३५३ वा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न!
📍लाल महाल, पुणे
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा जपणारा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा लाल महाल येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक व मंगलमय शुभेच्छा!
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात स्त्री-सन्मान, सामाजिक न्याय आणि प्रशासकीय शिस्त यांचा जो भक्कम पाया रचला, तो आजही आपल्याला जबाबदार आणि सजग नागरिकत्वाची प्रेरणा देतो.
प.पू. सद्गुरू गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे श्री दत्त ध्यान मंदिराच्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिरकाई देवी व नर्मदा माता प्राणप्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. याचीच काही क्षणचित्रे...
प.पू. सद्गुरू गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे श्री दत्त ध्यान मंदिराच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिरकाई देवी व नर्मदा माता प्राणप्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
अभिनंदन, यशवंतांचे!
10 वी च्या निकालात यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन...! पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा..!
#SSC#अभिनंदन#congratulations#BoardExam