Every year you make my b'day very special by wishing me on my bday.thnx @TheRashamiDesai Idk how to explain how precious u are to me & how much ur happiness matters to me. my love for you is never going to decrease. I❤️U♾️. nobody can replace you from my heart🫶 #RashamiDesai
Rash made my day. Her wishes & blessings are really precious & imp to me. She is such an amazing person the way she treats her fans it seems like they are not just her fans but her family.I feel so damn proud & lucky to be her fan.
God bless her always ❤️
#RashamiDesai
आजपर्यंत अभिनेता म्हणून रितेशने आख्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर राज्य केलं, पण दिग्दर्शनाच्या बाबतीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला नव्हता. राजा शिवाजी हा सिनेमा पाहून एकच सांगतो-
"दिग्दर्शक म्हणून रितेश आज जिंकला आहे" ❤️🫡
सिनेमा खूप छान आहे, थेटरमध्येच जाऊन बघा 👌 @Riteishd
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या या मंगल प्रसंगी, महाराजांनी दाखवलेल्या शौर्याच्या मार्गावर चालण्याचा आपण संकल्प करूया.
त्यांचे विचार आणि दूरदृष्टी आपल्याला सदैव मार्गदर्शन करत राहो. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय भवानी!
जय शिवाजी!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन..!
शिवजयंतीच्या तमाम शिवभक्तांना शुभेच्छा..!
"जय भवानी जय शिवाजी" 🙏🚩
"छत्रपति शिवाजी महाराज"
#ShivajiMaharajJayanti
निश्चयाचा महामेरु
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धार
|| श्रीमंत योगी ||
" श्री छत्रपती शिवाजी महाराजांना" मानाचा मुजरा.🙏
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!🚩
#ShivajiMaharajJayanti
छत्रपति शिवाजी महाराज
#शिवजयंती#रयतेचा_राजा
"शिवजन्मोत्सव सोहळा"
एक नाव, एक व्यक्तीमहत्व, एक विचार, एक प्रेरणा, एक आदर्श, एक इतिहास, यापेक्षा ही खूप काही म्हणजेच....
"श्री छत्रपती शिवाजी महाराज "🙏
जय जिजाऊ.. जय शिवराय..🚩🚩
छत्रपति शिवाजी महाराज
#ShivajiMaharajJayanti#शिवजयंती#रयतेचा_राजा
माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला.
अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील, अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा. पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली.
१९९० च्या दशकांत महाराष्ट्रात शहरीकरणाने वेग पकडला. ग्रामीण भाग अर्धशहरीपणाकडे झुकू लागला, तरी तिथल्या राजकारणाचा बाज हा ग्रामीणच होता, जरी तिथल्या प्रश्नांचं स्वरूप हे काहीसं शहरी होत चाललं असलं तरी. या पद्धतीच्या राजकारणाचा पूर्ण अंदाज आणि ते उत्तम पद्धतीने कसं हाताळायचं याचं कसब अजित पवारांकडे होतं. पिंपरी चिंचवड आणि बारामती ही त्याची दोन उत्तम उदाहरणं. पिंपरी चिंचवड असेल की बारामती असेल अजित दादांनी या भागांचा कायापालट केला हे त्यांचे राजकीय विरोधक पण मान्य करतील.
प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.
अजित पवारांच मला आवडणारं अजून एक वैशिट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की.
राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जहरी टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते, हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एका मागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान आहे.
मी आणि माझं कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अजित पवारांना भावपुर्ण श्रद्धांजली.
राज ठाकरे ।
खमक्या नेता म्हणजे कोण हे देशाला दाखवून देणारे अजितदादा एकमेव राजकारणी होते. त्यांच्या सारखी कार्यतत्परता असलेला आणि राज्याच्या जनतेप्रति सर्वाधिक वेळेची कमिटमेंट असलेला दादांशिवाय दुसरा नेता आपल्या राज्याकडे नाही याची खंत कायम राहील.!
भावपूर्ण श्रद्धांजली दादा.!
Feeling proud of the valour of the Indian Army today...
This country will remain in your debt...
Salute to all the military families..
With so much happening today and watching the news, no one will be able to understand your situation.Prayers 🙏🙏🙏
#StaySafe#IndianArmy
अभिमान आहे मराठी असल्याचा,
माझ्या मातीचा,माझ्या महाराष्ट्राचा !!
आम्ही जपतो आमची संस्कृती,आमची निष्ठा!!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
"जय महाराष्ट्र" 🚩
#महाराष्ट्रदिन