🌸 CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to 'AdiKavi' Maharishi Valmiki on his birth anniversary at his official residence in Mumbai today.
🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी 'आदिकवी' महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने मुंबई स्थित सरकारी आवास पर 'आदिकवि' महर्षि वाल्मीकि इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया।
🕥 10.15am | 26-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. १०.१५ वा. | २६-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #MaharishiValmiki
Humble tributes to the author of the Ramayana, ‘AdiKavi’ Maharishi Valmiki, on his Birth Anniversary!
His timeless teachings and the divine wisdom of the Ramayana continue to illuminate the path of humanity.
प्रभू श्री रामचंद्रांच्या दिव्य चरित्राचे दर्शन घडवणारे, महाकाव्य रामायणाचे रचनाकार, आदिकवी 'महर्षि वाल्मीकि' यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!
#महर्षि_वाल्मीकि #MaharshiValmiki #रामायण #Maharashtra
आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 25 ऑक्टोबर 2026
नैना क्षेत्रात 15 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; विकासाच्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://t.co/Dcitu3agll
इंडिया ज्वेलरी पार्कमुळे महाराष्ट्र जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे केंद्र बनेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://t.co/ZDdc8bB0Bc
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि जंगलापासून लांबच्या अंतरावर असलेला हा प्रदूषणविरहित क्लीन एनर्जी प्रकल्प असून, विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न होत आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर और जंगल से काफी दूर स्थित यह प्रदूषण-मुक्त क्लीन एनर्जी प्रोजेक्ट है, लेकिन विपक्ष की ओर से फेक नैरेटिव फैलाने का प्रयास किया जा रहा है।
(नवी मुंबई | 25-10-2026)
#Maharashtra #NaviMumbai
India Jewellery Park: Strengthening Global Competitiveness and Powering Growth
Pleased to have commenced work on the Indian Jewellery Park Mumbai project in Navi Mumbai today.
Mumbai and Maharashtra are globally recognised for their business acumen, skilled workforce and entrepreneurial excellence. With a strong pool of skilled artisans, a thriving entrepreneurial ecosystem, an established trade network and a conducive industrial environment, Maharashtra has all the strengths needed to become a leading global hub for the jewellery industry. Spread across 22 acres, the India Jewellery Park presents an important opportunity to build on these strengths and strengthen Maharashtra’s position in the global jewellery industry.
Global trade dynamics are evolving, making modern technology, product innovation and new export opportunities essential for the jewellery industry. The India Jewellery Park will provide a modern platform to strengthen the industry’s global competitiveness.
Under the leadership of our Hon PM Narendra Modi Ji, the vision of a developed India by 2047 places strong emphasis on manufacturing, exports, employment generation and entrepreneurship. The India Jewellery Park will contribute to this journey by creating new opportunities for industrial growth, exports and jobs.
DCM Eknath Shinde ji, Minister Ganesh Naik ji, MLA Mandatai Mhatre, Chairman of India Jewellery Park Mumbai, Kirit Bhansali and other dignitaries were present.
@narendramodi@mieknathshinde@NaikSpeaks@MlaMandaMhatre@GJEPCIndia
#Maharashtra #IndiaJewelleryPark
🔸Commencement of the 'Indian Jewellery Park Mumbai' project's work at the hands of CM Devendra Fadnavis.
DCM Eknath Shinde, Minister Ganesh Naik, MLA Manda Mhatre, Chairman of India Jewellery Park Mumbai, Kirit Bhansali and other dignitaries were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई' प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबईचे अध्यक्ष किरीट भंसाली व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई' परियोजना के कार्य का शुभारंभ।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, विधायक मंदा म्हात्रे, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई के अध्यक्ष किरीट भंसाली एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕑1.55pm | 25-10-2026📍Navi Mumbai | दु. १.५५ वा. | २५-१०-२०२६📍नवी मुंबई.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@NaikSpeaks@MlaMandaMhatre@GJEPCIndia
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaJewelleryPark
मुहब्बत की दुकान में नफरत के बीज !!
अच्छा हुआ खर्गे जी, आपने आवेश में आकर काँग्रेस के बंद कमरें में चलने वाली बातें मंच पर इस्तेमाल कर ही दीं। भारत भी काँग्रेस को जान चुका है।
मोदी जी के दिवंगत पिताजी के बारे में अभद्र भाषा में की गई टिप्पणी काँग्रेस के बेशर्मी की हद बयां करती है।
मैं फिर कहता हूँ, आप अगले चुनाव भी हारेंगे और इसका कारण लोगों के मन में मोदी जी के प्रति लगाव तो होगा ही.. पर आपके ऐसे नफरती शब्द भी अनेक कारणों में से एक होंगे।
रत्न आणि आभूषणांच्या निर्यातीत महाराष्ट्र हे देशातील निर्विवाद आघाडीचे राज्य आहे.
रत्न और आभूषणों के निर्यात में महाराष्ट्र देश का निर्विवाद अग्रणी राज्य है।
( इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई परियोजना शुभारंभ समारोह | नवी मुंबई | 25-10-2026)
#Maharashtra#NaviMumbai #IndiaJewelleryPark
'इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई' साकारल्यानंतर नवी मुंबई हे देशातील रत्न आणि आभूषण उद्योगाच्या सर्वात आधुनिक केंद्राच्या रूपात विकसित होईल.
'इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई' के तैयार होने के बाद, नवी मुंबई देश के सबसे आधुनिक जेम्स एंड ज्वेलरी इकोसिस्टम का केंद्र बनेगी।
( इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई परियोजना शुभारंभ समारोह | नवी मुंबई | 25-10-2026)
#Maharashtra #NaviMumbai #IndiaJewelleryPark
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मुंबई येथे चेतन ताम्हणकर आणि पल्लवी ताम्हणकर यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे हितेंद्रसिंह यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
@Dev_Fadnavis#Maharashtra#DevendraFadnavis #CMReliefFund
महाराष्ट्राला जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे ‘इंडिया ज्वेलरी पार्क, मुंबई’ प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ केला. मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ, सुरक्षित औद्योगिक वातावरण आणि उद्योजकतेची परंपरा यांच्या बळावर महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील दागिने उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्याची क्षमता आहे. बदलत्या जागतिक व्यापार परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास, सरकार आणि उद्योग यांच्या सहकार्यातून साकारला जाणारा ‘इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई’ हा प्रकल्प दागिने उद्योगाच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्राच्या औद्योगिक सामर्थ्याला जागतिक संधींची जोड
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्राची व्यावसायिक क्षमता, कुशल मनुष्यबळ आणि व्यावसायिकतेची जागतिक स्तरावर ओळख आहे. रत्न व आभूषण उद्योगासाठी आवश्यक असलेले कुशल कारागीर, उद्योजकता, व्यापाराचे अनुभवसंपन्न जाळे आणि अनुकूल औद्योगिक वातावरण ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत. या सामर्थ्याचा उपयोग करून राज्याला जागतिक दागिने उद्योगातील महत्त्वाचे केंद्र बनविण्याची संधी ‘इंडिया ज्वेलरी पार्क’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
बदलत्या जागतिक व्यापाराशी जुळवून घेण्याचे आवाहन
जागतिक स्तरावरील बदलती परिस्थिती आणि अमेरिका व चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांमधील घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत उद्योगांनी बदलत्या बाजारपेठांचा अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनातील नावीन्य आणि निर्यातीच्या नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ या बदलांना सामोरे जाण्यासाठी दागिने उद्योगाला आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
इंडिया ज्वेलरी पार्क उद्योगाच्या भविष्याचा महत्त्वपूर्ण टप्पा
महापे येथील 22 एकर क्षेत्रावर अत्याधुनिक दागिने उत्पादन केंद्र विकसित करण्यात येत आहे. हा प्रकल्प उद्योगाच्या दीर्घकालीन विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. आजपासून 30 ते 40 वर्षांनंतर मागे वळून पाहताना ‘इंडिया ज्वेलरी पार्क’च्या उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या उद्योग क्षेत्रातील नेतृत्वाचे निश्चितपणे स्मरण केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
उद्योगांना आवश्यक सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य
उद्योग उभारणीसाठी केवळ जमीन उपलब्ध करून देणे पुरेसे नसून, वीज, पाणी, रस्ते, भांडवल, पायाभूत सुविधा आणि विविध विभागांच्या परवानग्या वेळेत मिळणे आवश्यक आहे. ‘इंडिया ज्वेलरी पार्क’च्या कामात कोणत्याही अडचणी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परतेने मदत करावी. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल. तसेच उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सरकार आणि उद्योग यांच्यातील समन्वय व भागीदारी महत्त्वाची असून, उद्योगांच्या गरजा समजून घेऊन आवश्यक सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याची सरकारची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विकसित भारताच्या संकल्पपूर्तीत महाराष्ट्राचे योगदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प केला आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी उत्पादन, निर्यात, रोजगारनिर्मिती आणि उद्योजकता यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. भारत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्रही $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ‘इंडिया ज्वेलरी पार्क’सारखे प्रकल्प या आर्थिक वाटचालीला बळ देतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबईचे अध्यक्ष किरीट भंसाली व इतर मान्यवर उपस्थित होते.
@narendramodi@Dev_Fadnavis@mieknathshinde@NaikSpeaks@MlaMandaMhatre@GJEPCIndia
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaJewelleryPark
Maharashtra’s Next Growth Story Begins with NAINA
Glad to commence development works in the NAINA (Navi Mumbai Airport Influence Notified Area) Region, distribute property cards to landholders and inaugurate key connectivity projects in Navi Mumbai today.
The inauguration of basic infrastructure projects under CIDCO’s NAINA marks another significant step towards Maharashtra’s development. The Navi Mumbai International Airport will act as a major economic catalyst, boost the region’s GDP and accelerate integrated development around the airport. NAINA, the 3rd Mumbai, is set to emerge as a major growth engine for Maharashtra, creating substantial employment opportunities. The planned development of the NAINA region aims to generate approximately 15 lakh employment opportunities, including 5 lakh high-paying jobs, creating significant opportunities for Maharashtra’s workforce.
The inauguration of three major bridges, SBR-9, BR-4 and BR-5, built by CIDCO at a cost of ₹953 crore marks a significant step towards faster, smoother and seamless connectivity to the Navi Mumbai International Airport from the eastern side. Built across Panvel Creek, these bridges will provide direct eastern connectivity from Pune, Panvel, Thane and Kalyan via National Highway 4B to the Navi Mumbai International Airport, Ulwe Coastal Road, Mumbai Trans Harbour Link (MTHL) and Amra Marg.
To address the concerns of farmers and landholders, granted CIDCO special powers to rectify overlapping plots, incorrect plot numbers and errors in ownership records, despite the general limitations on revising a final development plan. This step ensures that genuine discrepancies are addressed and the concerns of project-affected people are resolved.
With the proposed EduCity, MediCity, Sports City, AeroCity and Knowledge City concepts, NAINA is poised to create new economic and social opportunities, while Thane, Navi Mumbai, Raigad and Palghar emerge as key centres driving Maharashtra’s economic growth.
DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Minister Bharat Gogawale, MP Sunil Tatkare ji, MP Shrirang Appa Barne, members of the state legislature and other dignitaries were present.
@mieknathshinde@SunetraA_Pawar@ibharatgogawale@SunilTatkare@MPShrirangBarne@niranjandtweets@ivikrantpatil@MLC_DBMhatre@ATatkare@ithakurprashant@mlamaheshbaldi@MahendraD8100@iNitinPatil
#Maharashtra #NAINAProject #Development
🔸Commencement of Development Works in the NAINA (Navi Mumbai Airport Influence Notified Area) Region and Distribution of Property Cards to Landholders, along with the Inauguration of Significant Connectivity Projects in Navi Mumbai at the hands of CM Devendra Fadnavis.
Various Development Projects :
✅ Bhoomipujan of various infrastructure project works in NAΙΝΑ TPS
✅ Inauguration of significant connectivity projects surrounding the airport: SBR-9 (Stilt Bridge), BR-4 and BR-5
✅ Inauguration of Uran Bypass Bridge
DCM Eknath Shinde, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Bharat Gogawale, MP Sunil Tatkare, MP Shrirang Appa Barne, members of the state legislature and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) परिसरातील विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण तथा नवी मुंबईतील महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण.
विविध विकासप्रकल्प -
✅ नैना टीपीएसमधील विविध पायाभूत प्रकल्प कामांचे भूमिपूजन
✅ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सुलभ कनेक्टिव्हिटीसाठी SBR 9 (Stilt Bridge), BR 4 व BR 5 पुलांचे लोकार्पण
✅ उरण बाह्य वळण पुलाचे (Uran Bypass) लोकार्पण
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, इतर आमदार व मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरिया) क्षेत्र में विकास कार्यों का शुभारंभ एवं भूमि धारकों को संपत्ति पत्रों का वितरण और नवी मुंबई में महत्वपूर्ण कनेक्टिविटी परियोजनाओं का लोकार्पण।
विभिन्न विकास परियोजनाएँ -
✅ नैना टीपीएस में विभिन्न बुनियादी ढाँचा परियोजनाओं का भूमिपूजन
✅ नवी मुंबई अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे के आसपास बेहतर कनेक्टिविटी के लिए SBR 9 (Stilt Bridge), BR 4 एवं BR 5 पुलों का लोकार्पण
✅ उरण बाहरी बायपास पूल (Uran Bypass) का लोकार्पण
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री भरत गोगावले, सांसद सुनील तटकरे, सांसद श्रीरंग आप्पा बारणे, विधायकगण एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕦 11.40am | 25-10-2026📍Panvel, Raigad | स. ११.४० वा. | २५-१०-२०२६📍पनवेल, रायगड.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@ibharatgogawale@SunilTatkare@MPShrirangBarne@niranjandtweets@ivikrantpatil@MLC_DBMhatre@ATatkare@ithakurprashant@mlamaheshbaldi@MahendraD8100@iNitinPatil
#Maharashtra #DevendraFadnavis #NAINAProject #Development
पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनाही भारतात यायचे आहे!
पाक व्याप्त कश्मीर के लोग भी भारत में आना चाहते हैं!
( नवी मुंबई | 25-10-2026)
#Maharashtra#NaviMumbai
वेगवान कनेक्टिव्हिटी, पिण्याचे मुबलक पाणी आणि नियोजनबद्ध विकासाच्या माध्यमातून नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) हे भविष्यातील उत्तम शहर म्हणून विकसित करणार!
तेज कनेक्टिविटी, पर्याप्त पेयजल और नियोजित विकास के माध्यम से नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरिया) को भविष्य के एक उत्कृष्ट शहर के रूप में विकसित करेंगे!
(विविध विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण | रायगड | 25-10-2026)
#Maharashtra #Raigad #NAINAProject #Development
LIVE | नैना परिसरातील विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण तथा नवी मुंबईतील महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण
🕐 दु. १२.५० वा. | २५-१०-२०२६📍पनवेल, रायगड.
#Maharashtra#Raigad#Development https://t.co/e4OyN3g2uD
नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) प्रकल्पाच्या माध्यमातून 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार.
नैना (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरिया) परियोजना के माध्यम से रोजगार के 15 लाख अवसर सृजित होंगे।
(विविध विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण | रायगड | 25-10-2026)
#Maharashtra #Raigad #NAINAProject #Development
🔸Commencement of the 'Indian Jewellery Park Mumbai' project's work at the hands of CM Devendra Fadnavis.
DCM Eknath Shinde, Minister Ganesh Naik, MLA Manda Mhatre, Chairman of India Jewellery Park Mumbai, Kirit Bhansali and other dignitaries were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई' प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबईचे अध्यक्ष किरीट भंसाली व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई' परियोजना के कार्य का शुभारंभ।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, विधायक मंदा म्हात्रे, इंडिया ज्वेलरी पार्क मुंबई के अध्यक्ष किरीट भंसाली एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕑1.55pm | 25-10-2026📍Navi Mumbai | दु. १.५५ वा. | २५-१०-२०२६📍नवी मुंबई.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@NaikSpeaks@MlaMandaMhatre@GJEPCIndia
#Maharashtra #DevendraFadnavis #IndiaJewelleryPark
Prehistoric greatness of Maharashtra State.
Did you know that the Geoglyphs of the Konkan Region, spread across Maharashtra and Goa, preserve extraordinary prehistoric engravings of animals, humans and geometric forms. The UNESCO World Heritage Tentative List describes a rock-art tradition extending back as far as 30,000 years! These remarkable engravings offer a window into humanity’s distant past and India’s rich cultural heritage. 🇮🇳
🔗 https://t.co/0LwZZMWgQD
#IncredibleIndia #UNESCO #IndianHeritage #VisitIndia #Maharashtra #Geoglyphs
#WorldHeritage #TentativeList #JaiJaiMaharashtraMajha
@IndiaatUNESCO
नैना प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाला नवे 'ग्रोथ इंजिन' मिळणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पनवेल, रायगड येथे नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) परिसरातील विकासकामांचा शुभारंभ व जमिनधारकांना मालमत्ता पत्रक वितरण तथा नवी मुंबईतील महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण केले. यात नैना टीपीएसमधील विविध पायाभूत प्रकल्प कामांचे भूमिपूजन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सुलभ कनेक्टिव्हिटीसाठी SBR 9 (Stilt Bridge), BR 4 व BR 5 पुलांचे लोकार्पण, उरण बाह्य वळण पुलाचे (Uran Bypass) लोकार्पण यांचा समावेश आहे.
नैना परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून सुमारे 15 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यापैकी 5 लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. या विकासातून निर्माण होणाऱ्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना विकासाचे भागीदार बनविण्यासह आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नियोजनबद्ध विकासातून रोजगारनिर्मितीला चालना
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नसून संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. विमानतळाच्या प्रभाव क्षेत्राचा नियोजनबद्ध आणि कालबद्ध विकास करण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करून नगररचना योजनांच्या माध्यमातून या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यात येत आहे. या नियोजनबद्ध विकासातून रोजगारनिर्मितीला अधिक चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
भूधारकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी शासन कटिबद्ध
भूधारकांच्या हातात जमिनीशी संबंधित कागदपत्रे दिल्यानंतरच विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गावनिहाय मोजणी, भूखंडांची ओळख, मालकी नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे. भूधारकांचे प्रश्न सुटेपर्यंत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विविध संकल्पनांतून नैना क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा
विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती आणि नागरी वसाहती उभारणे नव्हे, नैना परिसरात रोजगार, पाणीपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे आहे. एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एरोसिटी आणि नॉलेज सिटी यांसारख्या संकल्पनांमधून या क्षेत्रात विविध प्रकारच्या आर्थिक आणि सामाजिक संधी निर्माण होतील. मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर या परिसरातील विकासाला नैना क्षेत्रामुळे नवी दिशा मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर राज्याच्या आर्थिक विकासाची प्रमुख केंद्रे ठरणार
महाराष्ट्रात मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशी विविध विकासकेंद्रे विकसित होत आहेत. याच धर्तीवर ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर हा परिसर आगामी काळात राज्याच्या आर्थिक विकासाचे महत्त्वाचे इंजिन ठरेल. हा विकास भूमिपुत्रांना सोबत घेऊन आणि त्यांच्या हिताचे संरक्षण करूनच केला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
प्रकल्पांविषयी माहिती
उरण बायपास ब्रिज
उरण शहरातील वाहतूक कोंडी दूर करून प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी सिडकोच्या वतीने नवी मुंबईतील द्रोणागिरी परिसरात हॉटेल आनंदी ते उरण शहरादरम्यान ₹50.26 कोटी खर्चून 11 मीटर रुंदीच्या बायपास पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 941 मीटर असून, त्यामध्ये 640 मीटर लांबीचा पूल, 153 मीटर लांबीचा पोहोच रस्ता आणि 148 मीटर लांबीचा जोडरस्ता समाविष्ट आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी 1.75 मीटर रुंदीचे पदपथ असून, वाहनांसाठी 7.5 मीटर रुंदीचा मार्ग उपलब्ध आहे. या प्रकल्पामुळे उरण शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ व जलद होणार आहे.
एसबीआर-9, बीआर-4 आणि बीआर-5 प्रकल्प
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी पूर्वेकडून जलद, सुलभ आणि अखंड वाहतूक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सिडकोच्या वतीने ₹953 कोटी खर्चाचा एसबीआर-9, बीआर-4 आणि बीआर-5 या तीन महत्त्वपूर्ण पुलांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत पनवेल खाडी ओलांडून उभारण्यात आलेल्या पुलांमुळे पुणे, पनवेल, ठाणे आणि कल्याण या भागांतून राष्ट्रीय महामार्ग 4बीमार्गे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, उलवे किनारी मार्ग, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) आणि अमरा मार्गाशी पूर्वेकडून थेट संपर्क साधणे शक्य होणार आहे. या पुलांची एकूण लांबी मध्यवर्ती गोलाकार वाहतूक बेटासह 2593 मीटर असून, पुलाची एकूण रुंदी 60 मीटर आहे. पुलावर दोन्ही दिशांना प्रत्येकी चार मार्गिकांचा मुख्य रस्ता आणि प्रत्येकी दोन मार्गिकांचे सेवा रस्ते उपलब्ध आहेत. तसेच, 100 मीटर व्यासाचे मध्यवर्ती गोलाकार वाहतूक बेट उभारण्यात आले आहे. विमानतळाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूस उभारण्यात आलेल्या क्लोव्हरलीफ इंटरचेंजमुळे सिग्नलविरहित आणि अखंड वाहतूक प्रवाहाला चालना मिळणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री भरत गोगावले, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, इतर आमदार व मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@ibharatgogawale@SunilTatkare@MPShrirangBarne@niranjandtweets@ivikrantpatil@MLC_DBMhatre@ATatkare@ithakurprashant@mlamaheshbaldi@MahendraD8100@iNitinPatil
#Maharashtra #DevendraFadnavis #NAINAProject #Development