काही काहींच असं असतं ना ते कुठल्या त्रासात आहेत हे त्यांना दाखवून देता येत नाही.. जाणीव करून देता येत नाही.. आणि कोणालाही वाटतं याना तर काहीच झालेलं नाहीये म्हणून.. आणि या न समजून घेतल्यामुळे त्या व्यक्तीचा त्रास अजूनच वाढत जाणारा असतो..
काही,काही जण आपल्याला एवढ्या छान प्रकारे टेन्शन फ्री करणारे असतात की त्यांच्याजवळ आपण आपली अडचण,टेन्शन नुसतं बोलून जरी दाखवलं तरीही ते अशाप्रकारे ते दूर करतात की वाटू लागतं आपण नाहकच या गोष्टींना अडचण,टेन्शन समजत होतो ते.. असावेत असे कोणीतरी प्रत्येकाच्याच आयुष्यात..
ज्या दिवशी ज्या व्यक्तीचा खास दिवस असतो त्या दिवशी आपण त्या व्यक्तीचा तो दिवस अजूनच जास्त खास बनवण्यासाठी म्हणून त्या व्यक्तीजवळ असावं असच वाटत राहतं..