मानवी हक्क अभियान आयोजित
सामाजिक न्याय परिषद, संभाजीनगर
या परिषदेला उद्घाटक म्हणून राजस्थानचे राज्यपाल महामहीम हरिभाऊ बागडे साहेब,
पहिल्या सत्राचे अध्यक्ष मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद आवाड साहेब. या परिषदेला राज्यातील सर्वात प्रमुख समाजाचे नेते उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना मानवी हक्क अभियान गेवराई तालुक्याच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरण करण्यात यावा या संदर्भात निवेदन देण्यात आले.
आज गेवराई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन मजुराचे ओळखपत्र आणि ग्रामपंचायत मार्फत होणाऱ्या सर्वेच्या संदर्भात चर्चा केली. लवकरच पूर्ण तालुक्यातील काम पूर्ण होणार आहे.