Throwback Thursday. A photo from a trip you took.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर, गोंदवले बुद्रुक, ता. माण, जिल्हा सातारा.
#theme_pic_India_templeHeritage
जिन्होंने सजाए यहाँ मेले
सुख-दुःख संग-संग झेले
वो ही चुनकर खामोशी
यूँ चले जाए अकेले
- योगेश
Bhandarkar institute has this amazing innate ability to trigger visuals and verses
#theme_pic_India_streets
अण्णा,तात्या मिटिंगला या!!!!
सातारा जिल्ह्यातील खेड्यांमध्ये लग्नाच्या आदल्या दिवशी एक खास आणि जुनी परंपरा आजही पाळली जाते.
लग्नाच्या एक दिवस आधी संध्याकाळी वधू आणि वराच्या कुटुंबातील सदस्य गावातील घरोघरी जातात. ते प्रत्येक घरी जाऊन लोकांना सांगतात की रात्री आठ वाजता वधू/वराच्या घरी सभा आहे, सर्वांनी येणे गरजेचे आहे. या निमंत्रणानंतर गावकरी नियोजित वेळेला एकत्र येतात.
सभेला येणाऱ्या सर्वांसाठी चहा आणि साधा नाश्ता ठेवलेला असतो. सर्वजण बसले की गावातील मुख्य व्यक्ती किंवा गावचे नेते उभे राहतात. ते लग्नपत्रिका वाचून दाखवतात आणि लग्नाला येण्याचे निमंत्रण देतात.
यानंतर लग्नाची संपूर्ण माहिती दिली जाते — कोणती वाहतूक व्यवस्था केली आहे, कोणत्या वेळेला काय विधी होणार आहेत, कोणती तयारी गावकरींनी करायची आहे, आणि लग्नाच्या दिवशी होणाऱ्या प्रत्येक विधीबद्दल सविस्तर चर्चा केली जाते. सर्वांना स्पष्टपणे समजावून सांगितले जाते की कुठे, कधी आणि कसे उपस्थित राहायचे आहे.
ही सभा फक्त औपचारिकता नसते, तर संपूर्ण गाव एकत्र येऊन लग्नाच्या तयारीत सहभागी होतो. यामुळे लग्नात गावातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे स्थान आणि जबाबदारी जाणवते.
अशा परंपरा आजही सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जोपासल्या जातात.
Pc -friend
#सातारा #महाराष्ट्र #लग्नपरंपरा #VillageWedding #MarathiCulture