धुळे-मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजिज शेख यांनी रोहिणी, बोराडी ता. शिरपूर येथे भेट देऊन कामांची पाहणी केली. तसेच बोराडी येथे डिजिटल अंगणवाडीचा शुभारंभ श्री शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात धुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा - ना.श्री जयकुमार रावल
धुळे- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबवून राज्यस्तरावर धुळे जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन पणन व राजशिष्टाचार मंत्री ना.श्री जयकुमार रावल यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांसाठी फागणे ता जि धुळे येथे एका महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा समन्वयक श्री. उमाकांत पाटील यांनी महिलांना मानसिक आरोग्य व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दि. 11 -११-२०२५ रोजी फागणे ता धुळे येथे मा. श्री अजीज शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, धुळे यांनी भेट देवून सविस्तर माहिती घेतली. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार ,गटविकास अधिकारी मा.चौधरी उपस्थित होते .
धुळे- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीवर लक्ष केंद्रित करावे अशा सूचना धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजीज शेख यांनी मंगळवारी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत दिल्या.
धुळे-मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संदर्भात धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अजीज शेख यांनी शुक्रवारी विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यामध्ये विभाग प्रमुख तसेच सर्व गटविकास अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करून अभियानास गती द्यावी अशा सूचना बैठकीत दिल्या
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व स्वच्छता ही सेवा 2025 मोहिमेचा शुभारंभ ताजपुरी ता. शिरपूर येथे आ. श्री काशीराम पावरा व धुळे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजीज शेख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी अधिकारी पदाधिकारी यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
धुळे- ग्रामविकास विभाग व इतर विभागांच्या विविध योजनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणेसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान दि.17 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत असल्याची माहिती धुळे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजीज शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
धुळे जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अजीज शेख यांनी आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून सविस्तर मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान धुळे जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे अशा सूचना धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री अजीज शेख यांनी आज विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिल्या.
धुळे : महाराष्ट्र राज्य माननीय लोकायुक्तांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संबंधित एका महत्त्वपूर्ण तक्रारीवरील सुनावणी पार पडली. या सुनावणीत तक्रारदार व जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे (आयएएस),उपस्थित होते.
धुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने SMFG इंडिया क्रेडिटच्या CSR उपक्रमाची सुरुवात
आज या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद, धुळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल नरवाडे (IAS) यांच्या हस्ते करण्यात आले.
आज दिनांक 29 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद, धुळे येथे ग्रामपंचायत कुंडाणे (बारी), तालुका धुळे, जिल्हा धुळे येथील ग्रामसेवक बदल्याबाबत प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यात आली.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांच्या उपस्थितीत सोनशेलू ता.शिंदखेडा जि.धुळे ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहीत्यांचे वाटप कार्यक्रम.
धुळे, २9 जुलै २०२५
“कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा (AI) कार्यालयीन वापर " या विषयावर सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धुळे यांच्या अध्यक्षतेखाली कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञानाचा (AI) कार्यालयीन वापर " या विषया बाबत कार्यशाळा.
धुळे, २५ जुलै २०२५