5. कोरोनाग्रस्त किंवा Quarantine असणार्या मतदारांना शेवटच्या एक तासात मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे.
*तरी सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, आपण मतदानासाठी दिलेल्या वेळेदरम्यान उपस्थित राहून कोरोनाच्या पार्श्व्भूमीवर सर्व नियमांचे पालन करत निर्भयपणे मतदान करावे*.
भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे. यामध्ये निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा म्हणून खालील बाबी सुनिश्चित केल्या आहेत.
3. सर्व मतदान कक्षांचे ठरवून दिलेल्या वेळेनंतर निर्जंतुकीकरण करण्यात येईल.
4. मतदान करतेवेळी सामाजिक अंतर पाळणे सोईस्कर होण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक 1/12/2020 रोजी होणार आहे. या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नवासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. या मतदान प्रक्रियेविषयी मतदारमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी मतदारांनी मतदान कसे नोंदवावे याबाबत आयोगाने सूचना जारी केल्या आहेत
३. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकाण्यात एकच पसंतीक्रम नोंदवायचा आहे. एकदा नोंदवलेला पसंतीक्रम परत दुसर्या उमेदवारच्या रकाण्यात नोंदवू नये. पसंतीक्रम नोंदवताना 1,2,3 अशा आंतराष्ट्रीय स्वरुपात, १,२,३ अशा देवनागरी स्वरुपात, I, II, III अशा रोमन स्वरुपात नोंदवू शकतात.
कोविड-19 (कोरोना)च्या प्रादुर्भावामध्ये निवडणूक घेतांना मतदान केंद्रावर आवश्यक त्या दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला होईल. या निवडणुकीसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
मतदारास मतपत्रिकेवर मतदान केंद्रावर उपलब्ध केलेल्या जांभळया स्केच पेननेच पसंती क्रमांक लिहावयाचा आहे. त्यामुळे बाण फुलीचा शिक्का दिलेला नसून मतदारांना जांभळा स्केचपेन देवून मत नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करुन घेतली जाणार आहे.
उपायुक्त (सर्वसाधारण) संजयसिंह चव्हाण, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
मतदारास मतपत्रिकेवर मतदान केंद्रावर उपलब्ध केलेल्या जांभळया स्केच पेननेच पसंती क्रमांक लिहावयाचा असतो. त्यामुळे बाण फुलीचा शिक्का दिलेला नसून मतदारांना जांभळा स्केचपेन देवून मत नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करुन घेतली जाणार आहे.
निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये - मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर चिन्ह छापलेली नसतात. मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत मतपत्रिकेत मतदार पसंती क्रमांक अंकात १ पासून लिहावयाचा असून ते आकडे मराठी, इंग्रजी, रोमन भाषेत लिहिण्यास मुभा आहे, परंतु ते शब्दात लिहिता येणार नाहीत.