परमेश्वराची हिशोबाची वही खूप चोख असते. कारण, तो या जन्मीचे पुण्य याच जन्मी पदरात पाडत असतो आणि उरलेला कर्माचा चोथा (पाप) तुमच्या गाठीला बांधून मोकळा होतो. पुण्याई एखादे वेळी संपेलही, पण पापाचा चोथा कित्येक जन्मे तुमच्या सोबत जात असतो. यालाच कदाचित 'कर्म' जाणावे.
ज्या दिवशी पुण्य किंवा पाप पूर्णपणे संपेल, त्या दिवशी दोघांचे अस्तित्व संपलेल असेल. म्हणूनच की काय या सृष्टीच्या अस्तित्वासाठी दोघे एकमेकांना आजही धरून चालतात. म्हणून थोड्याशा स्वार्थासाठी जेव्हा तुम्ही एखाद्याचा घात करता, तेव्हा ते कर्म तुम्हालाच संपवत असते.
ज्या दिवशी तुमचं आयुष्य संपेल,त्या दिवशी तुमच्या इतिहासाला फक्त काही ओळी किंवा एका पानात वर्णन केले जाईल.तात्पर्य एवढंच की, तुमच्या एका वर्षाच्या आयुष्याची किंमत एका ओळी एवढी पण नाही.म्हणून पैसा कमावण्यापेक्षा, असे कर्म कमवा की,त्यातील एक एक अक्षर तुमची मृत्यूनंतरची पुण्याई बनेल.
ज्याचे संख्याबळ जास्त, पक्ष त्याचा..!!!
भविष्यात भाजप पक्ष अ'भाजप' पक्षातल्या लोकांनी take over केल्यास नवल वाटायला नको.
कारण, केलेले 'कर्म' आणि खणालेला 'खड्डा' कधीच वाया जात नाही. तो तुमच्याकडेच परत येतो.
भांडण जर स्वतःशी असेल, तर जिंकण फार महत्त्वाचं होऊन जातं.
पण, जर हेच भांडण माझ्या आपल्यांशी असेल तर पराभव स्वीकारणं जास्त गरजेचं होऊन जातं. कारण, इतरांना जरी तो पराभव वाटत असला तरी तो माझ्यासाठी माझ्या या आयुष्याची पुंजी आहे.
Karmayogi Dr Akshay Bhoir
काही प्रश्न हे कधीच सुटत नसतात
काही प्रश्नांची उत्तरे जन्मालाच येत नाहीत
कदाचित, म्हणूनच आयुष्याच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण कोणालाच मिळत नसतात
Karmayogi Dr Akshay Bhoir
सध्या इंस्टाग्राम वर असाच एकमेकांकडे पाहून नाचण्याचा फॅड सुरू झालाय म्हणे..? ट्रेण्ड तसा जुनाच आहे, पण तमाशाच्या फडाला upgraded प्लॅटफॉर्म मिळालाय.
थोडक्यात काय, हम करे तो 'रास लीला' और तमाशात केलं तर 'Character ढिला'. तुम्हीच ठरवा, तमाशा की नाच...नाव बदललं तरी अर्थ तोच राहतो.
सध्या पुरणपोळी हॉटेलात मिळते आणि पिझ्झा घरात बनतोय.म्हणजे सुगरण बायको करायची म्हंटल तर रेस्टॉरंट उघडण्याची ऐपत असेल तरच अशी स्वप्न बघावित,अन्यथा 'फास्ट फूड' येत असणाऱ्या बायका 'गोड' मानून घ्याव्यात.
चायनीज सूप हीच संसाराची शिदोरी असून चटणी,ठेचा ही मोहमाया असते.
जनहितार्थ जारी..
'अच्छे दिन आयेंगे' नावाचा एक नवीन मंत्र बाजारात रूढ झालाय. आयुष्यभर सकाळ संध्याकाळ जाप केला की, देव वैगेरे पावतो म्हणे.आणि विशेष म्हणजे यासाठी 108 मण्यांची माळ पण नाही लागत. पण, पदोपदी बॅनर च्या रूपाने कित्येक अ'देवां'चे दर्शन मात्र फुकटात होते.
#PoliticsToday#corruption
माझ्या इंग्रज बांधवांना हे कस काय जमतं काही कळत नाही.म्हणजे ब्रेड मध्ये चॉकलेट टाकल की त्याला waffle म्हणायचं.. त्याच्याने वजन वैगेरे वाढल की gym आणि डाएट चिवडा विकून माझीच भारतीय ब्रँड दुपटीने महाग विकायचे.
सध्या भाकरीत मध आणि चटणी टाकून विकायचा विचार सुरू आहे. बघा पटतंय का?
त्यांनी 'शांपेन' उडवली की, ते प्रगत आणि celebration masters आणि आम्ही आपली रोज संध्याकाळी 'एकच प्याला'तून दोन थेंब शिंपडली तर तो चक्क गवाठीपणा..? मी काय म्हणतो की, celebration साठी गावठी उडवली तर काय हरकत आहे?म्हणजे,पैसे ही वाचले आणि स्वदेशी नारा पण दिला
काय वाटतं..??कटू पण सत्य
आमचा इतिहास नक्की काय होता यावर एवढा काही संभ्रम निर्माण झालाय की, 'पंजा' वाल डिपार्टमेंट खर समजायचं की 'कमळ' वाल ?
सत्य एवढंच की, प्रत्येक जण आपली स्वार्थाची पोळी भाजतोय आणि आम्ही मात्र षंढपणे त्यावर 'चाय पे चर्चा' करतोय.
#Politics#india#culture#history
आम्ही नेहमी इतिहासातील राष्ट्रपुरुषांवरच का राजकारण करतो? म्हणजे आजच्या राजकारण्यांना हे कळून चुकलय का की, आता नव्याने टीका करायला एकही महापुरुष जन्माला येणे शक्य नाहीये...
राष्ट्रपुरुष की राजकारणी? होऊनच जाऊदेत एकदा
#Political#Savarkar#bjp#Congress
"इंडियन जुगाड" एवढा काही फेमस होईल असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे चक्क महाराष्ट्र सरकारच सध्या सॉलिड 'जुगाडू ' झालंय.कोण कोणासोबत होत आणि आता कोण कोणासोबत आहे, काही कळतच नाही.पण,सरकार मात्र फिरून फारून यांचच....जनता वाऱ्यावर सरकार धाऱ्यावर..
#MaharashtraPolitics#cm#BJP#shivsena
'अजब ' अनुभव हे भारतासारख्या देशासाठी काही नवीन गोष्ट नाही. पण आता गर्दीतून वाट काढताना हाताची घडी आणि तोंडावर बोट असे शाळेत का शिकवले जात असे, हे सध्याचं राजकीय प्रकरण (चर्चा नको) बघून लक्षात येतंय.
धन्य ते माझे सर्व शिक्षक गुरुजन आणि त्यांची दूरदृष्टी