राष्ट्रभूषण,महाराष्ट्रभूषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बाबासाहेबांनी 100 वर्षांच्या आयुष्यात हजारो वर्ष पुरेल एवढं कार्य केलय.
शिवचरित्र घराघरात पोहचवण्यात बाबासाहेबांचा सिहांचा वाटा आहे.उभा महाराष्ट्र यासाठी आपला कायम ऋणी राहील. 💐🎂
आज गुरुपौर्णिमा. आईबाबा, माझे गुरू ज्यांच्यामुळे माझे अस्तित्व आहे त्यांना प्रणाम 🙏. आपणा सर्वांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
#गुरुपौर्णिमा#गुरू#GuruPurnima2021
आज बाबांची पुण्यतिथी. बाबांना जाऊन १३ वर्ष झाली. बाबा आमचे कायमच मार्गदर्शक राहतील. त्यांनी आखून दिलेल्या चाकोरीतूनच आज आनंदवनच कार्य सुरू आहे आणि पुढेही राहील. 💐
#Anandwan#आनंदवन#BabaAmte#बाबाआमटे
आज शीतलचा वाढदिवस. आज तु हवी होतीस शीतल. असा एकही दिवस जात नाही, जेव्हा तुझी आठवण येत नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂 😞
#HappyBirthdaySheetal#happybirthday
माझ्या सोबत अनेकांना ऊर्जा आणि प्रेरणा देणाऱ्या, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. ताईंच खूप खूप अभिनंदन. ताई तुम्ही अशाच आम्हाला ऊर्जा देत रहा. आपल्या कार्यास आनंदवनाचा सलाम 🙏
#आनंदवन#Anandwan#सिंधुताई_सपकाळ#सिंधुताई
आज बाबांची जयंती. त्यांनी घेतलेला वसा आणि सुरू केलेले कार्य आज त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून आम्ही पुढे घेऊन जात आहोत. बाबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
@MSSAnandwan@kvamte#BabaAmte#Anandwan
आज पुलंची १०१ वी जयंती. रोज पुलंची काही ना काही कारणाने आठवण येतच राहते. कधी त्यांचे कथाकथन ऐकताना तर कधी एखादा मिश्किल विनोद वाचताना.कधी जुने अल्बम चाळत असताना त्यांनी #आनंदवनाला दिलेल्या भेटीचे फोटो पाहताना आठवण येते.
@MSSAnandwan#पुलदैवत#पुलदेशपांडे#pula#puladeshpande#पुल