समाज नेहमी काहीतरी अपेक्षा ठेवत असतो
कधी पैसा, कधी दिखावा, कधी मानपान,
कधी परंपरेच्या नावाखाली ओझं....
तुम्ही कितीही दिलंत तरी समाज पूर्ण समाधानी होत नाही.....
घराच्या उंबरठ्यावर बसलेला माणूस दिसायला शांत असतो...
पण आतून तो किती तुटलेला असतो, हे फक्त त्यालाच माहित असतं.
आयुष्यभर बेरीज-वजाबाकी करत राहतो आपण.
कधी नात्यांची, कधी पैशांची, कधी स्वतःच्या स्वप्नांची.
आणि शेवटी काय उरतं?
तर एक थकलेलं अस्तित्व...
जे पुन्हा त्याच उंबरठ्यावर येऊन बसतं जिथून सगळं सुरू झालेलं असतं.
कधी कधी वाटतं,
माणूस जग जिंकायला निघतो.
पण शेवटी स्वतःलाच हरव���न बसतो.
त्या उंबरठ्यावर बसलेला माणूस फक्त आराम करत नसतो,
तो आयुष्याचा हिशोब मांडत असतो..
कोण आपलं होतं, कोण फक्त वेळेपुरतं होतं,
आणि आपण स्वतःसाठी खरंच किती जगलो.
खरं सांगायचं तर,
मोठं घर, पैसा, नाव या सगळ्याच्या शेवटी माणूस पुन्हा शांतता शोधत उंबरठ्यावरच येतो.
बाकी सगळं फक्त धावपळ असते...🥹
#सातारकर_लिखाण
जगण्याची रीत अशीच असते कधी पाऊलवाटा फुलांनी सजतात, तर कधी काट्यांनी भरून येतात..मन थकतं, भावना हरवतात पण निष्ठा, संयम आणि जिद्द ��ांच्या सावलीत चालत राहणाऱ्यांनाच क्षितिज कवेत घेतं.
कारण आयुष्याचं पूर्णत्व हे सहज मिळत नाही, ते शांतपणे संघर्ष पेलत पुढे सरकण्यातच फुलत असतं.❤️
#जगणं
इंस्टाग्राम रील्स मध्ये ज्या प्रकारे गाव, सुख, आनंद वगैरे दाखवलं जातंय पण ते फक्त reel पुरतं मर्यादित आहे... शहरातून दोन दिवस गावात येऊन गावात सुख आहे म्हणणं आणि गावाकडे राहून तिथल्या समस्या आणि तुटपुंज्या सोयी सुविधा सोबत रडतखडत आयुष्याचा प्रवास करणं यात बरंच अंतर आहे..!
#गाव
आयुष्यात एकटा राहिलात एकट पडलात लाईफ एकट्यालाच सफर करायला लागली तरी चालेल.. पण चुकिच्या माणसाच्या संगतीत जावू नका.. कसय देव सगळ पाहत असतो.. चांगल कर्म करत रहा.. शेवट इतका चांगला होईल कि.. त्याचा कायम अभिमान वाटेल..❤️
#हमसफर_दोस्त..✨🌞
डिप्रेशन ही काही नैसर्गिक गोष्ट नाही..
तर तुमच्या आयुष्यातील काही स्वार्थी आणि चुकीच्या लोकांनी दिलेली एक वेदनादायक भेट आहे...
जी एका हसऱ्या-खेळत्या माणसालाही आतून तोडून टाकते...
आणि त्याला एकटं, हरवल्यासार���ं वाटायला लावते...
पण लक्षात ठेवा...
तुमची किंमत कोणाच्या वागण्यावर ठरत नाही...
तुम्ही त्यापेक्षा खूप मजबूत आहात...🔥🔥🔥
गाव... काय सांगू माझ्या गावाविषयी...? आवडतं मला माझं गाव.. कसंही असलं तरी तिथं मायेची ऊब मिळते.. बऱ्याच गोष्टी साठी नावं ठेवता येतील... पण जग फिरूनही परत ओढ लागते फक्त आपल्या गावाची... इथं उचापती आहेत, भावकी आहे, भांडणं आहेत.. कुरघोड्या आहेत...
#गाव ❣️
भर उन्हाच्या तडाख्यात एखादं झाड जेव्हा मायेनं आपल्याला कवटाळतं, तेव्हा कळतं निसर्ग किती नि:स्वार्थ प्रेमानं आपल्याला जगवतो. 🌳
आपण मात्र घेतच राहिलो, तर ही माया एक दिवस रुसून जाईल,म्हणून जपूया त्याला जसं घरच्या माणसांना ���पतो, तसं मनापासून!
#झाडेलावा
घराच्या बाहेर पडतांना आपलं संवेदनशील मन घरीच ठेवलेलं बरं. दुनियेच्या बाजारात तुमच्या भावनिकतेला आणि संवेदनशिलतेला कुत्रेही विचारत नाही. नको तिथे आपला साधेपणा दाखवायला गेला, तर तुम्हालाच घोडा लावाय��ा लोकं कमी करणार नाही. हरामी दुनियेत सगळ्यांना स्वतःसारखं समजण्याची चूक करू नका.!!
लोक बदलतील, ऋतू बदलतील, कदाचित आयुष्यही बदलेल...
पण मला फक्त एकच हवंय तुझ्या वेदनेतलं माझं हक्काचं रडणं आणि माझ्या प्रत्येक श्वासावर कोरलेलं तुझं नाव.
साथ म्हणजे फक्त सोबत असणं नाही, तर शेवटपर्यंत एकमेका��त मिसळून जाणं असतं..❤️