आज पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कर्वेनगर येथील सम्राट अशोक विद्या मंदिर येथे पत्नी तेजश्री हिच्यासमवेत मतदानाचा हक्क बजावला.
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असते. आपल्या एका मतातून लोकशाहीप्रती असलेली निष्ठा आणि समाजाच्या उज्ज्वल भवितव्याप्रती असलेली बांधिलकी व्यक्त होते.
या निवडणुकीत सुज्ञ मतदार विकासाला, सकारात्मक विचारांना आणि जनहिताच्या कार्याला आपला कौल देतील, असा विश्वास आहे. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होणाऱ्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन..!
आपला सहभाग, लोकशाहीचा सन्मान!
#पुणे #पदवीधरमतदारसंघ #शिक्षकमतदारसंघ #लोकशाही #मतदान
आदरणीय अमित शाह जी, आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ। 💐🙏
आपका दृढ़ संकल्प, असाधारण संगठन कौशल और राष्ट्रसेवा के प्रति अटूट समर्पण हम जैसे युवा कार्यकर्ताओं के लिए सदैव प्रेरणास्रोत है। ईश्वर से प्रार्थना है कि आपको उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और राष्ट्रसेवा के लिए निरंतर ऊर्जा प्रदान करें।
सादर प्रणाम एवं पुनः जन्मदिन की अनंत शुभकामनाएँ! 🇮🇳
दुष्यंत मोहोळ
अध्यक्ष
भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर
तीन महिन्याची गरोदर असलेल्या महिला पत्रकाराला राहुल गांधीने धक्का मारून खाली पाडला. ती महिला पत्रकार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
राहुल गांधी पिसाटला आहे.. याचा ईलाज मेंटल हॉस्पिटलमध्ये करण गरजेचं आहे..
देखिए, कांग्रेस का असली रंग!
हालात यह हैं कि कांग्रेस पार्टी को अपने ही कार्यकर्ताओं को प्रदर्शन में शामिल होने के लिए धमकाना पड़ रहा है! 😂
जनता इनके 'फेक नैरेटिव' को पूरी तरह पहचान चुकी है, और अब तो खुद इनके अपने कार्यकर्ता भी इनसे मुंह मोड़ रहे हैं। इनका सीधा एजेंडा है… प्रदर्शन में जाओ, राहुल गांधी की तरह महिला पुलिसकर्मियों के साथ अभद्र व्यवहार करो, और तभी आपको चुनाव का टिकट मिलेगा।
वैसे, कांग्रेस में चुनावी टिकट का सीधा सिस्टम तो उनकी पार्टी और पूरा देश, दोनों जानते हैं! 💰🤑
मा.@RRPSpeaks , MPSC आंदोलन स्थगित झाल्यानंतर एस. एम. जोशी पुलावरील घटनास्थळी संविधानाची प्रत धूळ खात आणि तिरंगा उलट्या स्थितीत असल्याचे दृश्य समोर आले.
संविधानाच्या सन्मानाचा मुद्दा मांडणाऱ्या आंदोलन स्थगित झाल्यानंतर संविधानाची प्रत आणि तिरंगा सन्मानपूर्वक ठेवण्याची व्यवस्था का केली नाही?
आयोजक म्हणून घटनास्थळावरील या बाबींची जबाबदारी रोहीत पवार तुमचीच आहे !
संविधानाचा आणि तिरंग्याचा सन्मान हा केवळ तुमच्यासाठी भाषणांचा विषय आहे तुम्ही ना संविधाना प्रति ना तिरंग्या प्रति ईमानदार आहात तुमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, तुम्ही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाचा अपमान केला आहे त्याबद्दल तुम्ही या देशाची नाक घासून माफीच मागितली पाहिजे.
२५ वर्षांचा नेतृत्वप्रवास…
आणि विकसित भारताचा संकल्प! 🇮🇳🪷
७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून सुरू झालेला आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचा २५ वर्षांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास म्हणजे विकास, निर्णयक्षमता आणि राष्ट्रसेवेच्या ध्येयाचा प्रेरणादायी अध्याय!
याच सेवापर्वानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत डी. पी. रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे आयोजित विशेष प्रदर्शनाला भेट दिली. मोदीजींच्या कार्यप्रवासापासून ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पापर्यंतची वाटचाल या प्रदर्शनातून प्रभावीपणे अनुभवता आली.
यानंतर कोथरूडमध्ये आयोजित ‘सेवा ज्योत यात्रा’ मध्ये केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्यासह सहभागी होत कोथरूडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि राष्ट्रभक्तीचा उत्साह अनुभवला.
या प्रसंगी राज्याचे मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, माजी केंद्रीय मंत्री मा. प्रकाशजी जावडेकर, भाजपा पुणे शहराध्यक्ष मा. धीरज घाटे, आमदार मा. भीमरावअण्णा तापकीर, आमदार मा. सिद्धार्थदादा शिरोळे, आमदार मा. सुनीलभाऊ कांबळे यांच्यासह भाजपा व भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित होते.
२५ वर्षांचा प्रवास…
आजच्या भारताची ताकद…
आणि २०४७ च्या विकसित भारताचे स्वप्न! 🇮🇳
ही केवळ २५ वर्षांची कहाणी नाही;
हा नव्या भारताच्या आत्मविश्वासाचा प्रवास आहे!
🪷 राष्ट्र प्रथम… सदैव प्रथम!
📍 कोथरूड, पुणे | ७ ऑक्टोबर २०२६
#25YearsOfSeva #SevaSankalpAbhiyan #SevaJyotYatra #NarendraModi #ViksitBharat2047 #NationFirst #SevaSamarpan
पुणे शहर भाजपाच्या वतीने ‘सेवा, सुशासन पर्वा’ अंतर्गत आयोजित बैठकीत सहभागी होऊन अभियानाचा आढावा घेतला. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गुजरातपासून सुरू झालेल्या आणि आज संपूर्ण देशाला विकास व सुशासनाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त हे अभियान राबविण्यात येत आहे.
‘जनसेवा हीच राष्ट्रसेवा’ या भावनेतून प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने या सेवा, सुशासन पर्वात सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी केले.
या बैठकीस शहराध्यक्ष धीरज घाटे, गटनेते गणेश बिडकर, स्थायी समिती सभापती श्रीनाथ भिमाले, शहर सरचिटणीस व अभियान प्रमुख सुशील मेंगडे, नगरसेवक पुनीत जोशी, राघवेंद्र बापू मानकर, रवींद्र साळेगावकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, वर्षाताई डहाळे, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा लडकत, रमेश परदेशी यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
📍५ ऑक्टोबर २०२६ | पुणे
#SevaSushasanParv #BJP #Pune #NarendraModi #SevaSankalp #भाजपा #पुणे #सेवा_आणि_सुशासन_पर्व #BJP4Pune
@BJP4India@narendramodi@NitinNabin@AmitShah@blsanthosh@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@RaviDadaChavan@DheerajGhate@GaneshBidkarBJP@DushyantMohol@punitjoshi26
भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी सुवर्णक्षण! 🇮🇳🥇🏑
आपल्या अद्भूत 'नारी शक्ती'ने आशियावर वर्चस्व गाजवले आहे! #AsianGames2026 मध्ये गतविजेत्या चीनला १-० ने धूळ चारत सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे हार्दिक अभिनंदन.
१९८२ नंतर तब्बल ४४ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून आपल्या लेकींनी नवा इतिहास रचला आहे. या दिमाखदार विजयामुळे भारताने आगामी 'लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिक'चे थेट तिकीटही खिशात घातले आहे!
या ऐतिहासिक आणि सुवर्ण पुनरागमनाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. तुम्ही भारताची मान उंचावली आहे!
#Cheer4Bharat
श्री गणरायाच्या पावन नगरीत राष्ट्रीय अध्यक्षांचे स्वागत..!
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार मा. नितीन नबीनजी यांचे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मनःपूर्वक स्वागत केले.
यावेळी पुण्याच्या गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा आणि श्री गणरायाचा आशीर्वाद यांचे प्रतीक म्हणून त्यांना श्री गणेशाची मूर्ती भेट दिली. 🙏🚩
गणपती बाप्पा मोरया..!
‘वंदे मातरम्’ हा आमचा श्वास आहे, त्याचा अवमान सहन करणे आमच्या रक्तात नाही! 🇮🇳
दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात जे घडले, ते पाहून प्रत्येक राष्ट्रभक्ताच्या काळजाला घरघर लागली आहे. ज्या 'वंदे मातरम्' महामंत्राने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, हजारो क्रांतिकारकांना फासावर जाताना हसतमुख ठेवले, त्या राष्ट्रीय गीताचा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस मुख्यालयात जाहीर अपमान केला. हा केवळ एका गीताचा अवमान नसून हुतात्म्यांच्या बलिदानावर आणि भारताच्या आत्म्यावर केलेला थेट आघात आहे.
याच विकृत आणि राष्ट्रद्रोही मानसिकतेच्या निषेधार्थ आज पुण्यातील ऐतिहासिक गुडलक चौकात भाजप युवा मोर्चाच्या वतीने प्रचंड जनक्षोभाचा एल्गार पुकारला. यावेळी माझ्यासोबत पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी, युवती आणि राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्वांनी रस्त्यावर उतरून काँग्रेसच्या या कृत्याचा तीव्र शब्दांत धिक्कार केला.
देशभक्ती ही भाषणांतून दाखवण्याची गोष्ट नाही, ती नसानसांत आणि आचरणात असावी लागते. देशभक्तीसाठी रक्त देशी असावं लागतं, विदेशी रक्त असून चालत नाही! म्हणूनच काँग्रेस नेतृत्वाला या राष्ट्रमंत्राचे मोल कधीच कळू शकले नाही.
काँग्रेस नेतृत्वाला आमचा स्पष्ट इशारा आहे— देशातील १४० कोटी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी संपूर्ण देशाची जाहीर व बिनशर्त माफी मागावी.
जर राहुल गांधींनी माफी मागितली नाही, तर २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणारा त्यांचा दौरा भारतीय जनता युवा मोर्चा पूर्ण ताकदीने उधळून लावेल. राष्ट्रसन्मानाच्या रक्षणासाठी आमचा लढा असाच सुरू राहील!
भारत माता की जय!
वंदे मातरम्! 🚩
— दुष्यंत मोहोळ
अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहर
सरकारें आएंगी, जाएंगी
पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी
मगर ये देश रहना चाहिए।
भारतरत्न, माजी पंतप्रधान तथा प्रखर राष्ट्रनेते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
A politician who has faced defeat in 90+ elections, despite belonging to a political family that has dominated India’s oldest political party for generations, now lectures the country on the foreign policy of a leader who has served as Gujarat’s Chief Minister three times and India’s Prime Minister three times.
A leader who has built a global diplomatic profile and received numerous international state and civilian honours from governments across the world since 2016.
Yet, instead of debating policies, performance and facts, Rahul Gandhi and @_SandeepDikshit chose to drag the name of the Italian Prime Minister into their political rhetoric.
Was it ignorance? Was it deliberate? Or was it simply an attempt to please their political leadership?
Whatever the reason, it reflects a disturbing decline in the quality of political discourse within the Congress party.
You can criticise Narendra Modi ji Question his foreign policy. Challenge his decisions. That is democracy....But do it with facts, substance and intellectual honesty not with misleading references, cheap political insinuations and personal attacks.
India deserves a stronger opposition.... But, not louder politics. Not manufactured controversies...But a credible alternative built on facts and ideas.
Shame on this kind of politics ,
@RahulGandhi
#ShameOnCongress #RahulGandhi #IndianPolitics #ForeignPolicy #PoliticalAccountability #Congress
📍बी जे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय पुणे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले आवश्यक!
बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी तन्मय वांगे यांच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी विद्यार्थ्यांची सुरक्षितता, रॅगिंगविरोधी यंत्रणा अधिक प्रभावी करणे आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास तातडीने मदत मिळावी, याबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.
यामध्ये विशेषतः—
🔹 Anti-Ragging Committee मध्ये आवश्यक सुधारणा करून ती अधिक प्रभावी व विद्यार्थी-केंद्रित करावी.
🔹 विद्यार्थ्यांना कोणत्याही भीतीशिवाय आपली तक्रार किंवा समस्या मांडता यावी यासाठी Dean Office कडून स्वतंत्र WhatsApp Active Helpline Number उपलब्ध करून द्यावा.
🔹 विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची यंत्रणा अधिक सक्षम करावी.
🔹 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबतच पुणे शहराच्या समृद्ध शैक्षणिक परंपरेची आणि शिक्षण व्यवस्थेची प्रतिष्ठा अबाधित राहावी, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि पारदर्शकपणे कार्यवाही करावी.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये आणि कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याची भूमिका मी ठामपणे मांडली आहे.
तन्मय वांगे प्रकरणातील सत्य निष्पक्षपणे समोर यावे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना अधिक सक्षम व्हाव्यात आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने कार्यवाही करावी.
यावेळी पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रवीण वनशिव, प्रणव गंजिवले,सुचित देशपांडे,प्रतीक कुंजीर, आशिष सुर्वे,अथर्व कुलकर्णी, संकेत बिरामने,अनुराग मिश्रा,सागर शेटे,सिद्धार्थ भावकर विविध पदाधिकारी उपस्थित होते.
#BJMedicalCollege #AntiRagging #StudentSafety #PuneEducation
📍 पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ
आज देशाचे कणखर, दूरदर्शी आणि निर्णायक नेतृत्व करणारे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांचे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत करण्याचा सन्मान लाभला.
राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या सुरक्षा, विकास आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाने भारत अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि सुरक्षित बनविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यातून प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळते.
पुण्यनगरीत त्यांच्या आगमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांचे मनःपूर्वक स्वागत करताना अभिमानाची भावना मनात दाटून आली.
मा. अमितभाई शाह यांचे पुण्यभूमीत मनःपूर्वक स्वागत आणि त्यांच्या दौऱ्यास हार्दिक शुभेच्छा!
@AmitShah
#AmitShah #Pune #BJP #BJYM #Welcome #ViksitBharat #PuneAirport