स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा मिंधे गटाचा द्वेष आता सत्तेच्या मस्तीत उघडपणे दिसू लागला आहे.
किरण पावसकरांनी जे बोललं, ते त्यांच्या मनातलं बोललं.
पावसकरांनी फक्त ओठांवर आणलं, जे मिंधे गटाच्या पोटात होतं.
बाळासाहेबांच्या शब्दांचा हा अवमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही.
एकनाथ शिंदे यांनी तात्काळ शिवसैनिकांची माफी मागावी आणि किरण पावसकरांवर कारवाई करावी! 🚩
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
असं प्रेम मिळायला रक्तात निष्ठा आणि विचारात स्पष्टता लागते…!
गद्दारांनी खोक्यांचा पाऊस पाडला तरी त्यांच्या नशिबात असं प्रेम आणि फुलांची उधळण मिळू शकत नाहीत!
उलट आता त्यांचं ‘स्वागत’ लोकांकडून नेमकं कसं होतंय याचीच उत्सुकता आहे!
@RajabhauW
असं प्रेम मिळायला रक्तात निष्ठा आणि विचारात स्पष्टता लागते…!
गद्दारांनी खोक्यांचा पाऊस पाडला तरी त्यांच्या नशिबात असं प्रेम आणि फुलांची उधळण मिळू शकत नाहीत!
उलट आता त्यांचं ‘स्वागत’ लोकांकडून नेमकं कसं होतंय याचीच उत्सुकता आहे!
@RajabhauW
अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील
उद्या ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील,
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली
छत्रपतींचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही !
कवडीचे अक्कल नसलेला कोणीतरी भोंदू महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो ही बाब अत्यंत दुर्दैवी व लाजिरवाणी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतःचा कर्मावर विश्वास होता. महाराज कधीच कोणत्या भोंदू बाबासमोर झुकले नाहीत. महाराज झुकले नाहीत म्हणून हे स्वराज्य स्वाभिमानाने उभे राहिले. अशा आमच्या स्वाभिमानी दैवताचा अपमान करण्याची हिम्मत कोणी भोंदू करत असेल, ही भोंदूगिरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निमूटपणे सहन करत असतील, तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही. महाराष्ट्र योग्य वेळी उत्तर देणार !
धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे, त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती. हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो, लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवजात, राज्यात त्याचे मोठमोठे कार्यक्रम घेतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या लोकांना आणि राजकारण्यांना सरळ केले पाहिजे. राज्य शासनाने या भोंदू बाबाला राज्यात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी.
राणेंचा निर्लज्ज मुलगा, दंगलखोर संग्राम, मंगळसूत्र चोरीचा आरोप असलेला पडळकर आणि भोसरीचा गुंड; यांसारख्या सर्व 'नवहिंदूरक्षकांनी' विकृत धीरेंद्र शास्त्रीने (बागेश्वर बाबा) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ओकलेले वादग्रस्त वक्तव्य अजून ऐकले नाही का? आता हे सर्व नेमके कुठल्या बिळात लपून बसले आहेत? जोपर्यंत मालक ‘छू’ म्हणत नाही, तोपर्यंत यांच्यातला तथाकथित हिंदू जागाच होत नाही, असे वाटते. राजकीय फायद्यासाठी आणि स्वतःच्या मालकाच्या सांगण्यानुसार सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या या सर्व 'नवहिंदूरक्षकांना' उघड करण्याची जबाबदारी आज छत्रपती शिवरायांचा वैचारिक वारसा जपणाऱ्यांची सर्वांची आहे.
#शिवद्रोही_भाजपा #शिवरायविरोधी_भाजप #MaharashtraPolitics
कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे.
असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे..
प्रौढप्रतापपुरंदर...क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.
माझे मित्र आणि एक प्रतिभावंत अभिनेते रितेश जी देशमुख दिग्दर्शित आणि जिनिलीया देशमुख निर्मित #राजा_शिवाजी चित्रपट लवकरच चित्रपट गृहात झळकणार आहे. शिवछत्रपतींचं उत्तुंग व्यक्तीमत्व या चित्रपटात तेवढंच दमदारपणे साकारलं असणार हे या चित्रपटाचा टीझर पाहूनच दिसतंय..
त्यांच्या या ‘राजा शिवाजी’ चित्रपटास माझ्या मनापासून शुभेच्छा..!
@Riteishd
#राजा_शिवाजी #RajaShivaji