भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक क्षण! 🇮🇳🏸
थॉमस कप २०२६ च्या उपांत्य फेरीत भारताची दिमाखदार धडक! चायनीज तैपेईचा ३-० ने धुव्वा उडवत भारताने या स्पर्धेतील आपले दुसरे पदक निश्चित केले आहे. २०२२ मधील ऐतिहासिक सुवर्णपदकानंतर भारताची ही आणखी एक मोठी कामगिरी!
निकाल:🇮🇳🔥
🏸 लक्ष्य सेन विजयी वि. चौ टिएन चेन — १८-२१, २२-२०, २१-१७
🏸 सात्विक/चिराग विजयी वि. एच चिऊ / वांग — २३-२१, १९-२१, २१-१२
🏸 आयुष शेट्टी विजयी वि. लिन चुन यी — २१-१६, २१-१७
#ThomasCup2026 #IndianBadminton #TeamIndia #BadmintonIndia
माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून 1 मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल. - राज ठाकरे, मनसेप्रमुख
#RajThackeray #Maharashtra #MaharashtraDin #LatestNews
(Raj Thackeray, Maharashtra, Maharashtra Din, Latest News)
पुण्यातील वसंत व्याख्यानमालेच्या १५१ व्या ज्ञानसत्रात, 'माझ्या मनातील महाराष्ट्र, मराठी अस्मिता' या विषयावर माझं व्याख्यान झालं. महाराष्ट्र हा असा प्रांत आहे की तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रातली उत्तुंग व्यक्तिमत्व या भूमीत जन्माला आलेले आहेत. या सगळ्यांनी फक्त महाराष्ट्राला आकार दिला असं नाही तर त्यांनी देशाच्या भावविश्वाला आणि विचारविश्वाला आकार दिला. अशा महान व्यक्तींचा महाराष्ट्राला काहीसा विसर पडला आहे असं हल्ली जाणवतं.
आपण कोण आहोत, कोणाचे पूर्वज आहोत याचं अचूक भान आपल्याला आलं तर आपलं वर्तमान आणि भविष्य उज्वल असेल. त्यासाठी महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेचा एक पट मी पुन्हा एकदा वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने मांडायचा प्रयत्न केला. आज १५० हुन अधिक उत्तुंग माणसांविषयी अगदी थोडक्यात व्यक्त झालो. अर्थात ज्यांच्याबद्दल बोलता आलं त्याच्या इतकीच किंवा त्याहून मोठी यादी ज्यांची नावं घेता आली नाहीत त्यांची आहे याची मला पूर्ण जाणीव आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून आला हा विशेष आनंद आहे. राजकीय नेत्यांचं काम हे फक्त राजकारण करणं इतकं नाही तर जमेल तेंव्हा प्रबोधन करणं हे पण आहे हे मानणाऱ्यातला मी आहे. त्यामुळे हे व्याख्यान तुमच्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी भाषेसाठी आणि आपल्याकडे जी रत्न जन्माला आली त्यांच स्मरण करून त्यातून बोध घेण्यासाठी जरूर ऐका.
https://t.co/0vOjM57rAs
Maharashtra Is a Tune. It Must Be Sung Together. Long Live Maharashtra....
Greetings to all on #MaharashtraDay..
Watch Maharashtra Day Celebrations on 1st May 1960.
#महाराष्ट्रदिन
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. सामाजिक प्रबोधन, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्वाचा महाराष्ट्राला प्रदीर्घ गौरवशाली इतिहास लाभला आहे. साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट ते उद्योग, शिक्षण, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा याद्वारे राज्याने भारताच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राच्या निरंतर विकासासाठी आणि येथील महान जनतेच्या कल्याणासाठी मी प्रार्थना करतो.
दरीखोऱ्यांतून गुंजणारा, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असणारे महाराष्ट्र राज्य!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन_२०२६
Best wishes to my sisters and brothers of Maharashtra on Maharashtra Day. Maharashtra has a long history of social awakening, cultural richness and leadership across sectors. From literature, theatre, music and cinema to industry, education, science and public service, the state has made a lasting contribution to India’s growth. Praying for the continuous development of Maharashtra and the well-being of its great people.
बेळगाव, निपाणी, कारवार, भालकी शिवाय संयुक्त महाराष्ट्र अपूर्ण आहे.
अमर्याद स्थलांतरामुळे महाराष्ट्राच मूळ रूपही वेगाने बदलत आहे, मराठी भाषिक राज्य ही ओळख कमजोर होत आहे.
#महाराष्ट्रदिन#MaharashtraDay
मित्रहो,
१ मे हा दिनदर्शिकेवरचा केवळ एक दिवस नाहीय.
१०७ हुतात्म्यांनी मुंबईसह महाराष्ट्र राज्य मिळविण्याकरीता आणि मराठी भाषेकरीता लढून, रक्त सांडून मिळवलेल्या राज्याचा स्थापना दिन आहे.
आपल्या बापजाद्यांच्या संघर्षाचा, बलिदानाचा आणि अभिमानाचा दिन आहे हा!
तो तेवढ्याच दिमाखात, आनंदात साजरा करूया.
मराठी अभ्यास केंद्रच्यावतीने हा दिवस मुंबईत तर आम्ही साजरा करतोच आहोत. पण डोंबिवली, कल्याण, पनवेल, पालघर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर इथेही साजरा करत आहोत.
आणि शासकीय आदेश काहीही असो, महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही राज्यगीतानेच करणार आहोत.
फडणवीसांच्या शासनाकडून आम्हाला राष्ट्रगीताचे महत्व समजून घेण्याची गरज नाही!
चला तर मग...
सकाळी १० वा. हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारक येथे भेटूया, हुतात्म्यांना अभिवादन करूया आणि मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठ्या आवाजात सामूहिकपणे महाराष्ट्रगीत गाऊया.
आनंद भंडारे
कार्यवाह, मराठी अभ्यास केंद्र
#महाराष्ट्रधर्म #मराठी #मराठीप्रथम #Marathi #Maharashtra #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन
सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यापर्यंत प्रत्येक मैलावर ऐतिहासिक शौर्याचा पैलू जोपासत विस्तारलेले आपले महाराष्ट्र राज्य!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन_२०२६