एकनिष्ठता ही अरविंद सावंत आणि संजय राऊत यांच्या सारखी असावी..पक्षाचा आदेश आणि केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा, तुरुंगवास पण पक्ष बदल नाही..स्वाभिमानाने लहान राहून आपल्या माणसासोबत उभं राहणं, अभिमानाच्या खोट्या शिखरावर राहण्यापेक्षा कधीही चांगलं..!
#महाराष्ट्र#राजकारण
महाराष्ट्राचा DNA हा खऱ्या अर्थाने स्वाभिमान आणि लढवय्या वृत्तीचा आहे...पण गेल्या दशकातील राजकारण पाहता संघर्षाच्या तलवारी म्यान करुन सत्तेच्या वळचणीला जाणं हे अधिक सोयीचं झालंय.. एकंदरीत राजकीय पटावर "वाघ थकला म्हणून गवत खात नाही" असं कुणी म्हणू नये..!
#राजकारण@prash_dhumal
विचारधारा वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत..राजकारणी जाड कातडी पांघरूण असतात म्हणून त्यांना फरक पडत नाही.. कार्यकर्ते मात्र नाईलाजाने का होईना " Caught with pants down" समर्थन करत बसतात..!
#irony#राजकारण#महाराष्ट्र
राजकारणातील "सुवर्णकाळ" हा बाप्पू पठारे सारखा असावा..२०२४ ला स्वतः आमदार, २०२६ मध्ये मुलगा, सुनबाई, भाचेसून पुणे मनपा मध्ये नगरसेवक आणि आता जिल्हापरिषद निवडणूकीत दोन्ही मुली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत..!
#पुणे#जिल्हापरिषद#निकाल#zplectionresult#राजकारण
"सत्ता..!!"
राजकारण हे कायम नैतिकतेपासून वंचित असते.. दरबारी राजकारणात वावरणाऱ्या ज्या व्यक्तीस संभाव्य शक्यता, संधी आणि घडामोडींचा अंदाज इतरांपेक्षा लवकर आणि अचूक येतो तोच या स्पर्धेत टिकतो हेच अंतिम सत्य..!!
#राजकारण#PoliticsToday
अकाली जाणं कोणाचंही नसावं.. फार त्रास होतो.. राजकीय भूमिका वेगवेगळ्या असतील पण दादांसारख रोखठोक आणि निर्भीड नेतृत्व पुन्हा होणे नाही..😔
जगणं फुलपाखरासारखं क्षणभंगुर होत चाललंय..!
#अजितपवार#AjitPawar
निवडणूक निकालानंतर सोशल मीडियावर "मोठं मोठे गार गेले गंमत मध्ये" हे गाणं सध्या ट्रेडिंगला आहे. एकदा पुण्यातील विशेषतः उपनगरातील उमेदवारांना एकदा खासगीत विचारुन पाहा ही गंमत कितीत पडते ते..!
#पुणे#महानगरपालिका#निवडणूकनिकाल#Pune#electionresult
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना काही अपवाद वगळता घवघवीत यश मिळाले आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असल्याने पुढील ५ वर्षात निदान पायाभूत सुविधा आणि विकासकामांची अपेक्षा करुयात..!
#निवडणूक#महाराष्ट्र#महानगरपालिका
एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना काही ठिकाणी त्या बिनविरोध होत आहेत हे खरंच अनाकलनीय आहे..!
#निवडणूक#महानगरपालिका#महाराष्ट्र