राजापूर तालुका मधील विविध विकास कामांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्री महोदयांची भेट घेतली व मा. @ChhaganCBhujbal साहेबांचे आशिर्वाद घेतले त्याक्षणी माझे बंधू व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. आबा आडिवरेकर सोबत होते. @nawabmalikncp@Jayant_R_Patil@MumbaiNCP
📍 कणकवली | छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान
आज तहसीलदार कार्यालय, कणकवली येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या शुभहस्ते 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' अंतर्गत लाभ वाटप व निवेदन स्वीकृती कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमास उपस्थित होतो.
यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे, आमदार श्री. प्रमोदजी जठार, आमदार श्री. विक्रांतजी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक श्री. मोहन दहिकर, माजी आमदार श्री. अजित गोगटे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. अबीद नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज मुंबई, काळाचौकी येथे शिवसेना शिवडी विधानसभा महिला विभाग प्रमुख सौ. रेश्मा सकपाळ गावंकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उपस्थित राहून सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान! समाजसेवेच्या या पवित्र कार्यात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या उदात्त योगदानाबद्दल हार्दिक आभार 🚩
आज मुंबई, गिरगाव येथील आर्यन हायस्कूल येथे शिवसेना व मी मराठी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य वह्या वाटप व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, उपनेत्या श्रीमती आशाताई मामडी, संस्थेचे संस्थापक श्री. परेश तेलंग, माजी नगरसेवक श्री. दिलीप नाईक, दक्षिण मुंबई सहप्रमुख श्री. संतोष नलावडे, महिला विभाग प्रमुख नीलम पवार तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्य उपस्थितीत पदाधिकारी मेळावा पार पडला.
राज्यात नगरपालिका निवडणुकीत केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला विजय मिळाला असून त्याच गोष्टीची पुनरावृत्ती आता महानगरपालिका निवडणुकीत करायची असल्याचे उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितले. उल्हासनगरमध्ये अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने उड्डाणपूल, चांगले रस्ते, सोयी सुविधांचा समावेश आहे. शहरातील ड्रेनेज आणि पाणीपुरवठा योजनेसाठी ५४३ कोटी तर मूलभूत सोयी सुविधांसाठी २४२ कोटींचा निधी दिला आहे. चार्जिंग सेंटर्स, दिव्यांग केंद्र अशी अनेक कामे या निधीतून पूर्ण झाली आहेत. धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून मिनी क्लस्टर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे उल्हासनगर या व्यापारी नगरीचा सुनियोजित विकास करण्यावर आमचा भर असल्याचे ही सांगितले. तर सर्वांनी आगामी निवडणुकांसाठी मोठ्या तयारीने कामाला लागा. पुन्हा एकदा महायुतीचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे. असे आवाहन ही सर्व शिवसैनिकांना केले.
यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रवक्ते किरण सोनवणे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, अरुण आशान, दिलीप गायकवाड, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी नगरसेविका मीना सोंडे, किशोर वनवारी, रमेश चव्हाण, जया साधवानी, लिलाबाई आशान, राजश्री चौधरी, अपेक्षा पाटील, यशस्विनी नाईक, मनीषा भानुशाली यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
अंबरनाथच्या माधवी सिंह यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह सर्वेश श्रीवास्तव, अनिता सिंह, आशा पाल, कामिनी महतो, चमेली मिश्रा, निशा यादव, आशिष साळवे, प्रसाद धुमाळ, प्रभात कुमार, सिद्धार्थ सिंह, सोमनाथ पुजारी, सागर अहुजा, दीपक गुप्ता, साहिल सय्यद, सिद्धेश दळवी यांनी ही शिवसेनेत प्रवेश केला. सर्वांचे शिवसेनेत जाहीर स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अंबरनाथचे माजी नगरसेवक उमेश गुंजाळ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #shivsenapakshapravesh
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात आज शिवसेनेचे आमदार श्री. रमेश बोरनारे यांच्या पुढाकाराने शिवसेना पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना संबोधित केले. तत्पूर्वी सर्वांनी आत्मीयतेने आमचे स्वागत केले. यावेळी शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्याही पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहरात विकासकामे मार्गी लागली आहेत. लोकांच्या समस्येची, प्रश्नांची जाण असलेले आणि विकासकामे मार्गी लागावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे लोकप्रतिनिधी म्हणून रमेश बोरनारे सरांची ओळख असल्याचे यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी आजवर जनकल्याणासाठी अनेक योजना राबविल्या. शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणींसाठी, युवा वर्गासाठी, शहरी तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरीव कामे केली. यामुळेच आज शिवसेना अधिक जोमाने सर्वत्र काम करत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकांसाठी आपण योजना राबविल्या आणि त्यांना आधार दिला. अवकाळी पावसामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसत त्यांचे पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी भरीव आर्थिक मदत दिली. आता वेळ आली आहे जनतेमध्ये जाऊन या सर्व कामांची माहिती द्यायची असेही यावेळी सांगितले. राज्यात नगरपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभेप्रमाणेच सर्वांनी एकजुटीने काम करा. वैजापूरच्या विकासासाठी आपली शिवसेना कटिबद्ध आहे. सर्वांनी एकजुटीने काम केले तर निश्चितच सगळीकडे महायुती विजयी होईल. यासाठी नगरपरिषदेच्या, पंचायत समिती, महापालिका अशा सर्व निवडणुकांमध्ये जोमाने काम करण्याचे आवाहन यावेळी सर्व शिवसैनिकांना केले. यावेळी उबाठाचे उपजिल्हाप्रमुख संजय पाटील निकम आणि त्यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करून पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील, खासदार संदीपान भुमरे, उपनेते अर्जुन खोतकर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी आमदार भाऊसाहेब तात्या पाटील, अण्णासाहेब माने - पाटील, कैलास पाटील, साबीर भाई, बाबासाहेब पाटील - जगताप, प्रतिभा ताई जगताप, सुलभा भोपळे, भरत पाटील, राजेंद्र पाटील - साळुंखे, राम हरी जाधव, भगिनाथ भगर, राजीव डोंगरे, शिवसेना डॉक्टर सेलचे प्रमुख धनंजय पडवळ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
मुरबाडमध्ये गेल्या अडीच वर्षात विकास कामांसाठी १०० कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. आणि नियोजन समितीच्या माध्यमातून ४० कोटी निधी मिळाला आहे. यामुळे अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. भविष्यात देखील जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही आज शिवसेना मुरबाड तालुका वतीने आयोजित शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याला संबोधित करताना दिली. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना
आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने संबोधित केले.
गेल्या अडीच वर्षात उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात जनकल्याणाच्या अनेक योजना राबविल्या आणि त्या योजना
महाराष्ट्राच्या गावागावात पोहचविण्याचे काम केले. लाडकी बहिण योजनेसारखी महत्वाकांक्षी योजना राबविली. यामुळे नुकत्याच विधानसभा निवडणुकीत सर्व माता - भगिनींनी महायुतीला मोठा विजय मिळवून दिला, असे यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आजही एका कार्यकर्त्यासारखे पक्षासाठी काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली पक्षाच्या माध्यमातून अनेक जनकल्याणाची कामे मार्गी लागत आहेत. यामुळे शिवसेनेत राज्यभरात विविध पक्षातून नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी एकत्रित मिळून काम करा, व शिवसेनेला आणि महायुतीला मोठ यश मिळवून देण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन यावेळी केले. सर्व शिवसैनिकांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विजयाचा संकल्प केला.
यावेळी आमदार शांताराम मोरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, सचिव भाऊसाहेब चौधरी, सह सचिव एकनाथ शेलार, उपनेते रूपेश म्हात्रे, उपनेते निलेश सांबरे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, मदनबुबा नाईक, कांतीलाल कंठे, संतोष जाधव यांच्यासह स्थानिक, कार्यकर्ते, महिला आघाडी व पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
शहापूर तालुक्यात शिवसेना जनसंवाद कार्यक्रम आज उत्साहात पार पडला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी एकजुटीचा आणि विजयाचा संकल्प करत आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्जतेचा निर्धार व्यक्त केला.
या मेळाव्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला तसेच शहापूर तालुक्यात पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटी, व जनसंपर्क उपक्रमांवर विस्तृत चर्चा झाली. तसेच सर्वांना जोमाने कामाला लागण्याचे यावेळी आवाहन केले.
या मेळाव्यास आमदार शांताराम मोरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, सचिव भाऊसाहेब चौधरी, सह सचिव एकनाथ शेलार, उपनेते रूपेश म्हात्रे, उपनेते निलेश सांबरे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde
शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्य उपस्थितीत शिवसेना प्रणित “स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ” स्थापना मेळावा आज मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार श्री. गजानन किर्तीकर साहेबांची यावेळी महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर माझी कार्याध्यक्षपदी आणि श्री.अरुण मोरे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
मराठी माणसाला रोजगार मिळवून देणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देणे या हेतूने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी लोकाधिकार समितीची बीजे रोवली होती. हाच वारसा पुढे नेत ''स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ” स्थापन करण्यात आला आहे. सर्व मराठी तरुणांना न्याय मिळवून देणारी, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारी आणि रोजगारनिर्मितीसाठी मार्गदर्शक ठरणारी संघटना निर्माण करणे, हा यामागचा हेतू. आजच्या काळात शिक्षित मराठी तरुणांकडे अपार क्षमता असूनही त्यांना योग्य संधी आणि दिशा मिळत नाही. त्यामुळे लोकाधिकार संघाच्या माध्यमातून या तरुणांना रोजगाराच्या नव्या वाटा दाखविण्यासाठी प्रयत्नशील राहू. सरकारी क्षेत्रासोबतच खासगी क्षेत्रात देखील संधी उपलब्ध आहेत आयटी, एआय, उत्पादन उद्योग, आणि नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठी तरुणांना सक्षम स्थान मिळवून देण्यासाठी आपला महासंघ प्रयत्नशील राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. मराठी कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मुंबईत मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष केला आणि यशही मिळवले आहे. त्याच पद्धतीने, आता पुढील काळात मराठी युवकांच्या शिक्षण, रोजगार आणि हक्कांच्या लढ्यासाठी लोकाधिकार सेना कार्यरत राहील, असे मत यावेळी व्यक्त केले. तर कार्याध्यक्ष म्हणून माझा प्रयत्न असेल की, केंद्रीय यंत्रणा, आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि विविध सरकारी-खासगी संस्थांमध्ये समन्वय साधून मराठी तरुणांसाठी नव्या संधी निर्माण करणे, उद्योग-व्यवसायाचे नवे दालन उघडणे आणि समाजात त्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देणे, असेही सांगितले.
उपमुख्यमंत्री महोदयांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ ही केवळ एक संस्था नाही, तर ती आहे मराठी तरुणांच्या न्यायाची, स्वाभिमानाची आणि प्रगतीची चळवळ. या माध्यमातून आपण मराठी माणसाच्या हितासाठी, रोजगारासाठी, न्यायासाठी आणि स्वाभिमानासाठी कार्यरत राहू, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी विविध आस्थापना पदाधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली. यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत वाहने देखील रवाना करण्यात आली.
यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते विविध खासगी आणि सरकारी आस्थापना संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत वाहने देखील रवाना करण्यात आली.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
'इंडिया टुडे' वृत्रसमुहातर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'इंडिया टुडे कॉनक्लेव्ह' या कार्यक्रमात आज सहभागी झालो. यावेळी इंडिया टुडेचे मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार श्री. साहिल जोशी यांनी माझी मुलाखत घेतली. सर्वप्रथम मला या विशेष मुलाखतींच्या कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल मी 'इंडिया टुडे'चे आभार मानतो. यावेळी अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभेला शिवसेनेला लोकांनी दिलेली साथ यांसह विविध राजकीय - सामाजिक विषयांवर मी भाष्य केले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि 'इंडिया टुडे'चे वरिष्ठ संपादक श्री. राजदीप सरदेसाई हे देखील उपस्थित होते.
Today, I participated in the ‘India Today Conclave’ program organised in Mumbai by the India Today group. On this occasion, senior Mumbai-based journalist Mr. Sahil Joshi of India Today interviewed me.
First of all, I thank India Today for inviting me to this special interview series. During the session, I spoke on various political and social issues, including the upcoming local self-government elections and the support the people extended to Shiv Sena in the Assembly elections. Senior journalist and India Today’s Group Editor Mr. Rajdeep Sardesai, was also present at the event.
#Shivsena #DrShrikantEknathShinde