@DhananjayDeore4@Shinde_Revati21 Also I am sure, AI is rewriting every post. Language doesn’t look organic or natural. Too much preaching in each post.
@gauravkheterpal The real reason for this is that you and many other companies, are not paying the candidate to its full potential but just want to pay him or her based on the previous salary. This leaves candidates no other option other than shop around. Another reason is 3 months longer notice!
@Shinde_Revati21 If the school is made for 3 hours how do you suggest students can spend the day provided both parents working?
Also what makes you think schools at this level are hectic? Infact they are fun and kids love going to school. Same for classes at this level.
@MarathiRojgar त्यांनी Google नसताना पुस्तकांमधून प्रोग्रामिंग शिकले.
पुस्तके वाचून आणि संघर्षातून त्यांनी सखोल कौशल्य मिळवले.
इतरांना मार्गदर्शन करता यावे म्हणून त्यांनी डिझाइन्स आणि पद्धती विकसित केल्या.
त्यांनी डॉट-कॉम बूम आणि २००८ च्या आर्थिक संकटाचा काळ अनुभवला आहे.
सोपे नव्हते हो
माझे अत्यंत आवडते टीव्ही सादरकर्ते सर डेव्हिड अटेनबरो यांनी आज वयाची १०० वर्ष पूर्ण केली. त्याबद्दल डेव्हिड अटेनबरो यांना अनेकोत्तम शुभेच्छा.
२००६ च्या आसपास डेव्हिड अटेनबरो यांची 'प्लॅनेट अर���थ' नावाची सिरीज आली होती. तो काळ डीव्हीडीजचा होता. तेंव्हापासून डेव्हिड अटेनबरो या माणसाच्या कामाने मला शब्दशः वेड लावलं होतं. 'प्लॅनेट अर्थ' पासून पुढे आलेल्या सीरिजच्या डीव्हीडीज आणि पुढच्या काळात ब्ल्युरेज, रिलीज झाल्या रे झाल्या की त्या मिळवून बघणे हा माझा छंदच झाला होता. पुढे २०१३ मध्ये त्यांची 'आफ्रिका' ही सिरीज आली. त्याचा सुरुवातीचा मोंटाज इतका सुंदर आणि व्हिज्युअल स्टोरीटेलिंगचा उत्कृष्ट नमुना होता, जो मी कितीवेळा पाहिला असेल याची मोजदादच नाही.
मला नेहमी सर अटेनबरोंच्या डॉक्युमेंट्रीज बघताना एक गोष्ट वाटत राहते ते म्हणजे, ते ज्या पद्धतीने सांगतात ती एक परीकथा वाटते आणि त्या सांगण्यात, त्या कथेत आपण गुंतून जातो आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट कायमची मनात घर करून बसते. डॉक्युमेंट्रीतून एखादा विषय मांडणारे अनेक जण होऊन गेले पण डेव्हिड अटेनबरोंच्या सारखा विरळाच.
सर डेव्हिड अटेनबरो यांच्या आयुष्याकडे पाहिलं की कमाल वाटते की हा माणूस काय जगलाय आणि काय जगाला देऊन गेलाय ? कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट ) ते रंगीत ते हाय डेफिनिशन ते ३डी ते ४के या सगळ्या बदलांच्या काळात तो माणूस पडद्यावर होता, निसर्गाची कथा त्याच उत्कंठतेने सांगत होता, आणि हे करताना स्वतः पडदा न व्यापता, त्यांचं ज्या निसर्गावर अतिशय प्रेम होतं त्या निसर्गाला, त्यातील विस्मयकारक गोष्टींनाच त्यांनी केंद्रस्थानी ठेवलं.
��नेक माणसं १०० वर्ष जगतात पण अशी थोडी फार माणसं असतात ती या काळात सातत्याने कशाचा शोध घेत असतात आणि तो शोध हाच त्यांचा मित्र असतो.
गेल्या १०० वर्षांत अटेनबरोनी त्यांच्याशी निगडित काय पाहिलं नाही ? टीव्हीचा उदय पाहिला, दुसरं महायुद्ध पाहिलं, कृष्णधवल टीव्हीचा स्क्रीन रंगीत झालेला पाहिला, सॅटेलाईट क्रांती पाहिली, जेट युग पाहिलं, डिजिटल युग, इंटरनेट युग आणि निसर्गाचा एक घटक ते विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश करणाऱ्या मानवाचा प्रवास पाहिला. एका अर्थाने मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील सगळ्यात वेगवान शतकाला अनुभवलं आणि त्याचवेळेस या सगळ्या बदलांनी विचलित न होता निसर्गाची कथा ते भरभरून मांडत राहिले.
सुरुवातीला हा निसर्ग किती सुंदर आहे हे सांगणारे अटेनबरो पुढे आपण या निसर्गाचीच काय हानी करत आहोत हे उद्वेगाने मांडायला लागले. अवघ्या पाच सहा दशकांत झालेला ह्रास याचं मूर्तिमंत उदाहरण कुठे शोधायचं असेल तर डेव्हिड अटेनबरो यांच्या डॉक्युमेंट्रीजच्या प्रवासात सापडेल.
पब्लिक ब्रॉडकास्टींग इतका सुंदर कन्टेन्ट तयार करू शकतो आणि तो विज्ञान, निसर्ग इतक्या सोप्या आणि दृश्य पद्धतीने शिकवू शकतो हे जसं बीबीसी २ ने दाखवलं तसंच ते इतकं प्रभावी आणि अचूक कसं असू शकतं हे डेव्हिड अटेनबरो यांनी दाखवलं.
अटेनबरो यांच्याबद्दल मला अजून खूप दीर्घ लिहिता येईल. पण त्याऐवजी मी मराठी तरुण-तरुणींना विनंती करे�� की कृपा करून त्यांच्या डॉक्युमेंट्रीज बघा. त्या स्टोरीटेलिंगसाठी बघाच पण निसर्ग किती सुंदर आहे आणि आपण तो अमुक रस्ता, तमुक ब्रिज यांच्या नावाखाली कसा उध्वस्त करत आहोत हे समजून घेण्यासाठी पण बघा.
आणि अजून एका कारणासाठी अटेनबरो माझ्या माध्यमातील सहकाऱ्यांनी बघा ते म्हणजे एखाद्या विषयातील अभ्यास जर पक्का असेल तर तुम्हाला माझा कन्टेन्ट कोणी बघेल का? मला तो व्हायरल करायला काय करावं लाग���ल याची चिंता करावी लागत नाही यासाठी नक्की बघा.
अटेनबरो ज्या काळात जन्माला आले तेंव्हा पृथीबद्दलच, निसर्गाबद्दलच कुतूहल जागृत असण्याचा काळ होता, ते आज अवघ्या १०० वर्षांचे आहेत जेंव्हा हे कुतूहल जाऊन पृथ्वी, निसर्ग पार उध्वस्त करण्यापर्यंतचा काळ त्यांना बघावा लागत आहे. त्यांना इतकं दीर्घायुष्य लाभू दे की ही पृथ्वी हा निसर्ग पुन्हा रसरसलेला त्यांना बघायला मिळेल.
सर डेव्हिड अटेनबरो यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा !
राज ठाकरे ।