पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाच��ा येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित ��ोतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणा��� आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाह���त आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा ���ण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलि��ागचे दत्तात्रय काशिनाथ ��ुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांती��ांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
��ाजसाहेबांनी आजपर्यंत आपला पूर्ण पक्ष मराठी माणसाच्या हितासाठी पणाला लावला.. मतांच्या राजकारणाला कधीही भीक घातल नाही, नेहमी भूमिकेला महत्व दिल.. मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी जितक्या पोडतिडकीने ते उभे राहत आले, तितक्या खंबीरपणे मराठी माणूस राजसाहेबांमागे कधी उभा राहील?
डोंबिवलीत प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजपाचे गांधी प्रेम …….!
सर्रास पैसे वाटप सुरू आहे. कालचा रेट ३०००/- होता, हे प्रकरण उघडकीस आल्यावर रेट ५०००/- प्रति मत केल्याचे ऐकायला येत आहे. डोंबिवलीत पैसा व गुंडगीरीचा वापर सुरूच आहे.सत्तेचा माज ओसाढून वाहत आहे.
हे बघा शिंदे सेनेचे उमेदवार .. मीनाक्षी शिंदे !!
लोक प्रचाराला येत नाही आहेत
तर बलात्काराची धमकी
घरे पाडायची धमकी
जातीवाचक आगरी समाजाला शिव्या
पायाखालची वाळू हळूहळू यांच्या सरकत आहे. कारण लोक यांच्या दहशतीला यांच्या पैशाला नाकारत आहेत
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत��त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग ��ाय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ?
महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल...
बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन...
भाजपचा आरोप आहे की ठाकरेंना बोगस/दुबार मतदारांमध्ये मराठीच दिसले का? आणि कल्याण-डोंबिवलीसारखे (युतीने जिंकलेले) मतदारसंघच दिसले का?
पण
गेल्याच सोमवारी शिवसेना UBT चा मेळावा ���ाला ज्यात बोगस/दुबार मतदारांचं प्रेझेंटेशन झालं.
ज्यात मतदारसंघ होता वरळी म्हणजे UBT ने जिंकलेला आणि त्यांचेच नेते आदित्य ठाकरे आमदार असलेला मतदारसंघ
त्या प्रेझेंटेशनमध्ये गुप्ता, अडवानीसह रझाक, अन्सारी या मतदारांचाही समावेश होता (ट्विटसोबतचा फोटो पाहा) मग मविआला मुस्लिम मतदारांची पोलखोल करावीशी वाटली नाही हा प्रश्न कसा?
मतदार याद्यांचाही मुद्दा हिंदू-मुस्लिमवर नेण्यापेक्षा दुबार\बोगस मतदार हटवण्यावर जास्त भर नको का?
#UddhavThackeray #BJP #Maharashtra
@AmazonHelp@AmazonHelp Even today the shipment has not been delivered, the return has been sent to the seller with a fake update.
Order Number: 403-2030225-9809135
@amazonIN#amozon
@amazonIN Our shipment is not being delivered. We are updating the fake status. Please deliver the shipment as soon as possible.
Order Number: 403-2030225-9809135
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच जर महाराष्ट्राचा सन्मान जपू शकत नसतील, धडधडीत खोटं बोलून महाराष्ट्र विरोधी वक्तव्यांची बाजू घेत असतील तर मग काय अर्थ आहे मुख्यमंत्री पदाला?
@SandeepDadarMNS@avinash_mns
काही महिन्यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक नराधम गुंड परळीतील कोण्याही गरीबाच्या घरी जाऊन त्याच्या मुलीला उचलून घेऊन जातो हा प्रसंग सांगून गुंड गोट्या गितेची महाराष्ट्राला ओळख करून दिलेली त्या गोट्या गितेचा हा भाऊ मिसरूड पण फुटले नाही तर अशा पद्धतीने मुलांना मारहाण करत आहे...
नामदेव शास्त्री तुमचे संस्कार महाराष्ट्राला नाही तर बीड मधील तुमच्या जातं बांधवाना शिकवायची गरज आहे.. महाराष्ट्रभर फिरू नका टीव्ही वर कीर्तन देऊ नका बीड मध्ये फिरा माणुसकी शिकवा...