Warning to travellers booking with @flyspicejet!My Dubai 🇦🇪 to India flight has been delayed by 12hrs, with no proper response / clear communication frm SpiceJet. Passengers are left struggling with uncertainty and inconvenience.
Is this how an airline should treat its customers?
My daughter’s abroad-study dream is collapsing. SBI sanctioned the loan 5 months ago, but it’s still not released because SBILife won’t issue the mandatory term plan (Georgia not covered). No other insurer will issue it since it’s an SBI loan. We’re stuck in a cruel loop. Please
@Uber_India I was travelled from manayat park to the Cunningham hotel , Cunningham Road . Receipt attached. I had a discussion with the driver and he confirmed that my sunglasses is available with him . You are requested to take immediate action and return the same to me .
हम हर दिन #महाबोधि_मुक्ति_आंदोलन के लिए बौद्धों से अविश्वसनीय समर्थन देख रहे हैं, और फिर भी केंद्र सरकार और बिहार प्रशासन सो रहा है!
मैं फिर से दोहराता हूँ — मोदी, पूरी दुनिया की नज़र भारत पर हैं!
आप न केवल भारत में बौद्धों के विरोध की अनदेखी कर रहे हैं, बल्कि जापान, मंगोलिया, वियतनाम, दक्षिण कोरिया, थाईलैंड, म्यांमार, श्रीलंका, नेपाल, कंबोडिया के साथ भारत की बौद्ध धर्म-केंद्रित डिप्लोमेसी और रणनीतिक साझेदारी को भी खतरे में डाल रहे हैं।
आपकी निष्क्रियता न केवल बौद्ध धर्म के विरुद्ध है, बल्कि भारत के हित के भी विरुद्ध है!
#महाबोधि_मुक्ति_आंदोलन की लड़ाई को भारतीय बौद्ध महासभा और वंचित बहुजन आघाडी का पूरा समर्थन हैं!
मी पीडित कुटुंबाला बोललो त्यांना हिंमत देऊन आवाज उठवला आहे. होलार समाजाचे या गावात दोनच घरं आहेत, राज्यात सुद्धा त्यांची संख्या कमी आहे. होलार समाजाने घाबरू नये हा पँथर तुमच्यासोबत आहे अशा धीर दिलेला आहे. गुन्हा नोंद प्रक्रिया सुरु झाली असून काही मिनिटात हा मुद्दा राज्याचा झाला आहे. अपेक्षा करतो की तात्काळ राज्य सरकार दखल घेईल!
तुला खल्लासच करतो म्हणत दलित तरुणाला मारहाण!
#बीड अंबाजोगाई पोलीस पुढील दोन तासात हे सगळे अटक केले पाहिजेत.
होलार समाजाचा अनुसूचित जातीचा कृष्णा साळे दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारलं आहे. त्याचे पैसे घेतले, मोबाईल हिसकावला गेला.
गुन्हा घेण्यास पोलीसांनी विलंब केला हे दुर्दैव आहे. ऍट्रॉसिटी ऍक्टचा गुन्हा का नोंद केला नाही?
बीड पोलिस अधीक्षकांनी तात्काळ दखल घ्यावी. सर्व आरोपीला अटक करण्याचे आदेश द्यावेत. आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करावे. तात्काळ आरोपीना अटक करून कायद्याचा जबर धाक दाखवला पाहिजे.
व्हिडीओ काढून बीड जिल्ह्यात मारण्याचे प्रकार वाढले आहेत त्या अनुषंगाने कुणी जाणीवपूर्वक हे करतंय का? यामागे पोलीसांना, पोलीस अधीक्षकांना बदनाम करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेचा मुद्धा निर्माण करण्यासाठी हे कृत्य करतंय का याची सखोल चौकशी करावी.
राज्य सरकारने गंभीर्याने दखल घ्यावी. मुख्यमंत्री गृहमंत्री सपसेल फेल झालेले आहेत. त्यांच्या कारकीर्तीला चॅलेंज देणाऱ्यांना ते रोखू शकलेले नाहीत त्यामुळे दलितांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
ऑल इंडिया पँथर सेना जाहीर निषेध करत असून तात्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी करत आहे!
#AllindiaPantherSena
#भोर : विक्रम गायकवाड बौद्ध तरुण दिसायला अतिशय स्मार्ट, उच्चशिक्षित, डोळ्यात उज्ज्वल भविष्य असलेला हा तरुण होता. नेरे भोर भागात त्याचा अतिशय क्रूरपणे संपवलेला मृतदेह सापडला. परिवाराने जी शंका उपलब्ध करून खुलासा केला तो हादरून टाकणारा आहे. मानवतेला काळिमा फासणारा आहे.
पैसाच्या वादातुन त्याच्याच चव्हाण नामक मित्राने त्याला मारलं असं सगळं बनवून पोलीसांनी तपास संपल्यासारखी भूमिका घेतली.
गायकवाड कुटुंब जे खुलासे करत आहे, त्या बाजुने तपास होत नाही. मी या कुटुंबाला फोनवर बोललो त्यांनी अतिशय हादरून टाकणारी माहिती दिली.
विक्रम गायकवाडने सप्टेंबर 2024 मध्ये कोर्ट मॅरेज आंतरजातीय विवाह केला होता. मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणाला विरोध करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुलीने विक्रम गायकवाड मरण्याच्या आधी त्याची शेतात भेट घेतली होती. तेंव्हा तिने त्याला सावध राहण्याचा सल्ला दिला होता. ते मारणार असल्याचे तिने त्याला सांगितले होते. आणि दोनच दिवसाने विक्रम गायकवाड मृत अवस्थेत सापडला.
मुलगी आता तिच्या आई वडिलांकडे आहे. पुणे पोलीस राजकीय दबावाखाली आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी अद्याप या कुटुंबाला भेट दिलेली नाही. स्थानिक आमदार सुद्धा अजित पवार गटाचा आहे त्याने सुद्धा भेट दिलेली नाही त्यामुळे पोलीसांवर कुणाचा दबाव आहे हे उघड झालं आहे.
🛑 कुटुंब सांगत असलेल्या अँगलने तपास का होत नाही?
🛑 लग्न झालेलं सर्टिफिकेट विक्रम गायकवाड कुटुंबाकडे आहे मग मुलगी तिच्या आई बापाकडे कसं काय आहे?
🛑 मुलीचा जबाब पोलीसांनी घेतला का?
🛑 विक्रम गायकवाड याला एकच माणूस अपहरण करून संपवू शकतो का? त्याचे सहआरोपी कुठे आहे?
🛑 जिथे हत्याकांड झालं तेथे किती मोबाईल ऍक्टिव्ह होते? आधुनिकपणे तपास का होत नाही?
🛑 पीडित परिवाराने ज्यांचे ज्यांचे नाव घेतली त्या सगळ्यांचे मोबाईल डिटेल तपासले का? त्यांची चौकशी झाली का?
ऑल इंडिया पँथर सेना मागणी करत आहे तात्काळ या घटनेचा तपास सीआयडी, एसआयटीकडे देण्यात यावा. राज्य सरकारने गांभीर्याने या प्रकरणात भूमिका घ्यावी. गृहमंत्री दलितांवर होणारे अन्याय रोखण्यात अपयशी ठरलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळात बिनधास्त अन्याय अत्याचार वाढत आहेत.
विक्रम गायकवाड ला न्याय मिळालाच पाहिजे. आरोपीला फाशी झाली पाहिजे. पीडित कुटुंबाला 25 लाखांची मदत व शासकीय नोकरी दिली पाहिजे. पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे. पोलिसांनी लवकरात लवकर छडा न लावल्यास राज्यभर तीव्र आंदोलने छेडण्यात येतील.
#justiceforvikramGaikwad
#AllindiaPantherSena
मातंग समाजाचं कुटुंब न्यायासाठी थेरगाव ते मुंबई चालत निघालय...
राज्यात मातंग राहतो तो ही माणूस आहे. नॅशनल हायवेने जीव धोक्यात घालून महिला मुली लहान लेकरं निघालेत.
पोलीसांनी तात्काळ धाव घेऊन कुटुंबाला वाचवावे त्यांचं प्रकरण गांभीर्याने हाताळले पाहिजे.
ऑल इंडिया पँथर सेना राज्य सरकारला मागणी करत आहे की तात्काळ कुटुंबाला न्याय द्या!
@CMOMaharashtra
कच्च्या तेलाचा खर्च: भारत 80% कच्चे तेल आयात करतो, आणि ब्रेंट क्रूडची किंमत $75.22 प्रति बॅरलपर्यंत गेल्याने आयातीचा खर्च वाढला आहे.
इतर वस्तूंच्या किंमती: इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री आणि रसायने यांसारख्या वस्तू महाग झाल्याने डॉलरच्या मागणीत वाढ होत आहे.
रुपयाचे मूल्य आर्थिक घटकांवर अवलंबून असते.
आयात-निर्यात असंतुलन
भारताचा व्यापार तुटीचा आकडा ऑक्टोबर 2024 मध्ये $26.83 अब्जांवर पोहोचला आहे. कच्च्या तेलासह अन्य महत्त्वाच्या वस्तूंच्या वाढत्या आयातीमुळे डॉलरची मागणी वाढते, परिणामी रुपयाचे मूल्य कमी होते.
भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सतत घसरत आहे आणि सध्या तो ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. 11 फेब्रुवारी 2025 रोजी रुपयाने 86.65 चा स्तर गाठला, आणि आशियातील सर्वात खराब प्रदर्शन करणारा चलन ठरला आहे.
पण असं का होतंय? यामागची कारण समजून घ्या.
पुणे ते मंत्रालय निघालेल्या मातंग दलित महिलांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. पाणी नाकारल्याचा त्यांनी आरोप केला आहे. जातीवाचक शिवीगाळ झाल्याचा आरोप केलेला आहे.
अनेक महिने पोलीस स्टेशन तक्रार घेत नाही म्हणून नॅशनल हायवेनि हे कुटुंब चालत पार पनवेल पर्यंत पोहोचलं आहे.
सर्वात आधी ऑल इंडिया पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची दखल घेतली, समजून घेतलं, उपाशीपोटी निघालेल्या कुटुंबाची जेवण मुक्कामाची व्यवस्था केली आणि हा प्रकार समोर आला आहे.
राज्य सरकार, अनुसूचित जाती आयोग, महिला आयोग यांनी दखल घेऊन या मातंग दलित कुटुंबाला न्याय द्यावा. तात्काळ त्यांना पोलिसांनी सन्मानाने गाडीत बसवून त्यांची तक्रार घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजे, सुरक्षा दिली पाहिजे.
पुणेहुन मुंबई जाण्याची वेळ का आली? संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@ChakankarSpeaks@abpmajhatv@TV9Marathi@News18lokmat
#AllindiaPantherSena
प्रति,
आदरणीय रामदासजी आठवले
राष्ट्रीय अध्यक्ष, रिपाई (आ)
तथा राज्यसभा सदस्य केंद्रीय मंत्री, भारत सरकार.
@RamdasAthawale
विषय : राज्यसभेत सोमनाथ सूर्यवंशी प्रशासनिक हत्याकांडावर बोलणे बाबत.
जयभीम,
सन्मानीय आठवलेसाहेब आपण पँथर आहात. परभणी घटनेला आपण भेट सुद्धा दिलेली आहे. राज्यसभेत दलितांचे प्रतिनिधी म्हणून आपला चेहरा महत्वाचा व तितकाच दखलपात्र आहे.
सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला अतिशय क्रूरपणे कोठडीत मारण्यात आले. आंबेडकरी जनता पायी लॉंगमार्च काढत 300 किलोमीटर चालत आली आहे. सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशी, विजय बाबा वाकोडे यांच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत, शासकीत नोकरी दिली पाहिजे या सामाजिक न्यायाच्या मागण्या आहेत.
ऑल इंडिया पँथर सेना अपेक्षा करत आहे की, परभणी पुतळ्याच्या विटंबणा करणाऱ्यावर देशद्रोह व सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीना फाशी झाली पाहिजे या मुद्द्यावर राज्यसभेत बोलावे, जेणेकरून हा मुद्दा देशव्यापी होईल.
आंबेडकरवादी आहात, नक्कीच राज्यसभेत या मुद्द्यावर बोलून दलितांच्या अन्याय अत्याचाराचा आवाज कराल ही एक पँथर म्हणून अपेक्षा बाळगतो.
संविधान जिंदाबाद!
- दिपक केदार
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना
#AllindiaPantherSena
आज देशात कंत्राट पद्धत, अंबानी अडाणीच्या घशात सरकारी संस्था घातल्या, खाजगीकरण झालं. यात कुणीही कायमस्वरूपी कामगार राहिला नाही. कामगारांचे काळे कायदे लागू झाल्यामुळे देशात कामगारांचा "वापरा आणि फेका धोरण" सुरु झालं त्यामुळे कामगारांचे हक्क संपले त्याला कायमस्वरूपी करण्याची प्रक्रिया संपली.
"पॅन इंडिया" सारख्या उपक्रमामुळे खाजगी क्षेत्रात कंत्राट एकाला देईचे. उदाहरणार्थ मुंबईचा प्रसाद लाड याला राज्यभर कंत्राट मिळणार.
कंत्राट पद्धतीमध्ये किमान वेतन धोरणाचा गळा घोटला गेला. वार्षिक 96 हजार ते 1 लाख वीस हजार अशी कामगारांना वेटन मिळत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किमान वेतन धोरण आणलं मजुरांच्या कष्टाचा मोबदला मिळावा म्हणून हक्क अधिकार दिले.
आजची मोदी व्यवस्था हे धोरण राबवत नाही.
12 लाख वार्षिकचा फायदा कुणाला? मजुरांना काय दिलं त्याचा किमान वेतन तरी द्या.
मध्यमावर्गीयांचा टक्का संपत चाललाआहे त्याला कारण खाजगीकरण कंत्राटी पद्धती होय
देशभर ऑनर किलिंगचे बळी जात आहेत. केंद्र सरकार असो की राज्यांचे सरकार असो या जातीय आपत्तीवर कुणीही ठोस भूमिका घेत नाही. तेलंगणातील ही घटना मानवतेला काळिमा फसणारी घटना आहे. दलित असलेल्या 30 वर्षीय अनुसूचित जातीच्या कृष्णाला जातीयतेतून संपवलं. त्याचा गुन्हा काय तर त्याने उच्च जातीच्या भार्गवी नावाच्या तरुणीसोबत प्रेम विवाह केला.
अशीच घटना गेल्या हप्त्यात लातूर, जळगाव ला घडली. कधी जातीतल्या तर कधी जाती बाहेरील ऑनर किलिंग च्या घटना समोर येतात. व्यक्तिगत कुटुंबाची प्रतिष्ठा तर कधी जातीय प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. प्रतिष्ठेचा आव का येतो? कारण सामाजिक भान आपण बदलू शकलो नाही.
कोणत्याही व्यवस्थेने कधीही सामाजिक परिवर्तनाला थारा दिला नाही. त्यांनी कायम जातीय प्रतिष्ठेला पाठबळ दिल्यासारखे वागत आले. कुठेही प्रेम विवाह करणार्यांना सुरक्षा दिली जात नाही. त्यांच्याकडे तुच्छतेच्या दृष्टीने बघितले जाते.
याउलट महाराष्ट्रात काही प्रबोधनकार "प्रेम करू नको गं पोरी, तुझा बाप अमुक, तुझी आई तमुक म्हणत रडवताना दिसतात. "
तेलंगणाची घटना असो महाराष्ट्रातील ऑनर किलिंगची घटना न्याय मिळाला पाहिजे. अशी ऑल इंडिया पँथर सेना मागणी करत आहे. केंद्र व राज्य सरकारने ऑनर किलिंग विरोधात ठोस भूमिका घ्यावी.
#JusticeForKrushna
#AllindiaPantherSena