Top Tweets for #Press_note
#प्रसिद्धी_पत्रक (#Press_Note)
विषय - NCERT च्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल.
मुंबई/पुणे -
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली विस्तार दर्शवणारा नकाशा हटवल्याच्या निर्णयाला आता कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात #श्रीमंत_राजे_मुधोजी_भोसले यांच्या नेतृत्वाखाली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली आहे.
याचिकाकर्ते क्रमशः -
1) राजे मुधोजी महाराज भोंसले
नागपूर.
2) शिवाजीराजे जाधव
सिंदखेडराजा.
3) श्रृषीकेश निकम पाटील
छत्रपती संभाजीनगर.
4) रघुजीराजे आंग्रे
अलीबाग.
5) रविंद्र पडवळ
पुणे.
6) कुणाल मालुसरे
पुणे
7) राम नारायण मराठा
पानीपत (हरीयाणा)
8) शरद मोडे
बीड
9) अर्थव मारणे
पुणे.
मुख्य मुद्दे:
इतिहासाचे विद्रुपीकरण: याचिकेत असे नमूद करण्यात आले आहे की, मराठा साम्राज्याने अठराव्या शतकात भारताच्या मोठ्या भूभागावर अधिपत्य गाजवले होते. मात्र, NCERT ने नवीन बदलांमध्ये हा ऐतिहासिक नकाशा वगळून नवीन पिढीला खऱ्या इतिहासापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
अस्मितेचा प्रश्न: मराठा साम्राज्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते अटकेपार पसरलेले राष्ट्रव्यापी साम्राज्य होते. असा नकाशा हटवणे हा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वारसांच्या कर्तृत्वाचा, महाराष्ट्रातील व भारतातील आठरापगड जातीचा अपमान असल्याची भावना याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.
मागणी: उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून NCERT ला सुधारित पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्याचे आदेश द्यावेत, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे.
"आपल्या पूर्वजांनी रक्ताचे पाणी करून हे स्वराज्य आणि साम्राज्य उभे केले. जगाला हेवा वाटेल असा आपला इतिहास आहे. हा इतिहास पुसण्याचा किंवा तो कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. भावी पिढीला शुद्ध आणि सत्य इतिहास मिळावा, यासाठीच आम्ही हा न्यायालयीन लढा पुकारला आहे."
— #श्रीमंत_राजे_मुधोजी_भोसले
पुढील दिशा:
या याचिकेवर लवकरच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या लढ्याला शिव-शंभू प्रेमी आणि इतिहासकारांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.
आशे विविध मुद्याच्या आधारवर 266 पानाची जनहित याचिका (PIL) मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
नागपूर महाराज #राजे_मुधोजी_महाराज_भोंसले यांनी पुण्याच्या पत्रकार भवनात घेतलेल्या या पत्रकार परिषदेला प्रामुख्यानें कुणाल मालुसरे, रविंद्र पडवळ, दिपकराजे शिर्के, ऋषिकेश निकम पाटील व इतर शिवप्रेमी संघटना, मान्यवर उपस्थित होते.
आपला - #सारंग_ढोक
प्रसिद्धि प्रमुख- महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट.

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.5M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.5M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.9M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.6M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.7M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.6M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers









