Top Tweets for #TUKSP
गाव एक स्वप्नाचे
सत्यात वाहुन गेले
खंत वाटेल जाता जाता
जगणेच राहुन गेले...!
.
.
.
शोकांतिका मोठी अशी
जपलेले गोंदणही मिटुन गेले
जाता जाता मात्र
चटका लावून गेले..!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#TUKSP
#माझीकविता
#मराठी #म
#पूnm
https://t.co/AjN0yOWHk1

🔆 भार 🔆
उचलली लेखणी
शब्द पसार झाले
काळजाने काळजावर
वार हजार केले...!
क्षणार्धात विरुनी
सर्व करार गेले
जातीचा मारून शिक्का
माणुसकीला फरार केले..!
.
.
विणवावे हात जोडूनी
तरी बंद ते दार केले
पेलवावे कसे ओझे
जगणेच भार झाले
जगणेच भार झाले...!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#TUKSP
#म

🛑आशेचा झुला🛑
आयुष्य झुलत राहीले
आशेच्या झुल्यावर
मलाच मी शोधत आहे
नवीन या वळणावर...!
.
.
.
सुंगध उधळुन सुकलेल्या फुलांना
कसलीच खंत उरली नाही
श्वास मात्र श्वासांमध्ये
आज जीवंत नाही...!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#TUKSP
#मराठी #म
#माझीकविता
https://t.co/m8oeD5wjc2

प्रतिक्षेला अंत नाही
पण मन पार थकलंय...!
माघारी वळायला तयार नाही
म्हणूनच तर थोडं थांबलंय....!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#TUKSP
#म
चंद्राची शीतल छाया
हवीहवीशी वाटते...!
काही क्षण नजरेआड जाता
मनी अनामिक काहुर दाटते..!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#TUKSP #म
#पूnm
भयाण वादळाने जरी
मनी काहुर दाटले
ओझे वाहता वाहता मात्र
शब्दही निःशब्द झाले...!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#TUKSP
#पूnm #म
जीवनाच्या वाटेवर चालता चालता अशी वेळ येते कि पुढचे पाऊल रोखुन धरले जाते एका अशा प्रतिक्षेत जिचा अंत माहिती असतो पण स्विकारला जात नाही....!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#TUKSP
#पूnm
#मराठी #म
अविस्मरणीय क्षण
तो सुर्यास्त सोहळा...! 😍
झुलत राहील मनी सदैव
आठवणींचा हिंदोळा...!!
#पूनमच्या_लेखणीतुन #म
#TUKSP

जगता जगता नकळत
संपुन जाईल हेही क्षण..!
एकटं असेल आठवणींच्या पावसात
चिंब चिंब भिजणारं मन.....!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#म #मराठी
#TUKSP
ऐ मौत....
तु अब आके गले लगाले
तो भी कोई गम नहीं...!
दो पल जिये जी भर के
ये भी कुछ कम नहीं...!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#पूnm
#TUKSP
परतताना पुन्हा त्या वाटेवर ज्वालामुखी सारख्या उचंबळून येणाऱ्या आठवणी, सुखद असल्या तरी मनाला चटका लावून जाणाऱ्या, हसवणाऱ्या आणि डोळ्यांतुन ओसंडून वाहणाऱ्या, नेहमी हव्याहव्याशा पुन्हा पुन्हा जगाव्या वाटणाऱ्या पण कधी न परतणाऱ्या...!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#TUKSP
#म
जडलेली सवय आणि काही गोष्टी विसरायचा, बदलायचा प्रयत्न केला तरी त्या मोठमोठ्याने ओरडुन सांगतात....
'मी पुन्हा येईल' 'मी पुन्हा येईल'
आणि विशेष म्हणजे येतातही
कारण त्या जातच नाहीत😅
#पूनमच्या_लेखणीतुन
#TUKSP
#म
संपता संपत नाही रात्र
त्यात फक्त उशीच तर ओलावते
सकाळी डोळे उघडल्यावर
स्वप्नांच्या मागेच पुन्हा मन धावते
बाकी आता मी खुश असते!
.
एकांतपणात विहरत
आठवत नाही कधी हसते
माझी सावली माझ्यापासूनच
कुठेतरी हरवलेली असते
बाकी आता मी खुश असते!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#TUKSP #म

स्वप्नांचे झाले जरी तुकडे तुकडे
तरी आजही आहे ते उशाशी...
उघडता मग अलगद डोळे
विखुरलेली ती स्वप्ने का वाटे हवीशी..!!
#पूनमच्या_लेखणीतुन #म
#पूnm
#TUKSP
सर्व पर्याय संपले की माणसाची हार होत नाही.
पण नकारात्मकतेचं पांघरूण घेऊन सोडलेले प्रयत्न मात्र कारणीभूत ठरतात त्याच्या कधीच न जिंकण्याला...!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#मराठी #म
#TUKSP
मन जड झालं की सर्वच जड जाते.
ढगांमध्ये पाणी भरून ते जड झाले की शेवटी त्याचं बरसणं कोणीच थांबवु शकत नाही..!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#पूnm
#TUKSP
#म
@smitanikam09 दिलासा देतो इवलासा कवडसा
असला जरी कभिन्न काळोख...
सोनेरी किरण अजुन यायचा आहे
माघार घेऊन कशाला करतो स्वप्नांची राख...!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#TUKSP
काही कळेना
शब्दांत गुंफावे कसे
खंत मनाची अन
दुःखाचे उसासे....!!
.
.
.
नशीबाच्या खेळाचे
गणित वेगळेच भासे
खेळ संपता संपता
उलटे पडले फासे...!!
भरभरून जगलेले
कितीतरी क्षण असे
जी वाट हवीहवीशी
तेथून मागे वळावे कसे...!!
#पूनमच्या_लेखणीतुन
#TUKSP
#म

Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.7M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.9M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.9M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.4M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.4M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers

