@thatPunekar कालावधीचा उल्लेख नसणे, प्रत्यक्ष वीज उत्पादनाची आकडेवारी स्पष्ट नसणे यामुळे २८ कोटी झाडे हा आकडा कोणताही निश्चित वैज्ञानिक नियम किंवा सार्वत्रिक सत्य मानला जाऊ शकत नाही. प्रत्यक्ष उत्सर्जन व आवश्यक झाडांची संख्या ही प्रकल्पाच्या वापराच्या वेळा आणि तांत्रिक कार्यक्षमतेनुसार बदलते.
@thatPunekar महाराष्ट्रात जंगलतोड न करता किंवा कमीत कमी पर्यावरणीय नुकसान करून हायड्रो पॉवर प्रकल्प उभारण्यासाठी पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्ट्स हा सर्वात आधुनिक आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो.
@shriramX7 वरील सर्व गोष्टींसाठी लाकडं कमर्शियल फार्मिंग मधून येतात. जंगलांमधील जुनी, नैसर्गिक, जैवविविधतेने नटलेली झाडं एकदा कापली की, ती निसर्ग परत आणायला शेकडो वर्षं लावतात. एक जुनं, प्रगल्भ झाड जेवढा ऑक्सिजन देतं पर्यावरण नियंत्रित ठेवतं, तेवढी भरपाई नवीन रोपं लगेच करू शकत नाहीत.
@fornaxAR@grok@visvabhara27931 मला एक सांगा फक्त झाडं पाऊस पडत नाही म्हणून तोडायची! झाडे वातावरण शुद्ध ठेवतात, ऑक्सिजन देतात हे तरी खरे आहे की खोटे? वन्य प्राणी जंगलावर अवलंबुन असतात त्यांचे घर आहे हीच मुख्य कारणे आहेत. सह्याद्री तर हा महाराष्ट्राचा प्राण आहे, जीवनदाता आहे.
@Siya83377032@DheringeK@thatPunekar उपाय एकच की झाडांच्या कत्तली न करता हवे ते करा. बाहेरच्या देशातील लोकं नक्की आपल्यापेक्षा शिस्त प्रिय आहेत. आणि मुळात त्यांची विचारसरणी कोणत्या एका पक्षाच्या दावणीला बांधली नसते. भारतात ती आहे. प्रगती, विकास करा पण पर्यावरनाच्या, वन्य प्राण्यांच्या तिरडी वर नको.
@Siya83377032@DheringeK@thatPunekar म्हणून असेही काही पर्याय शिधावेत की प्रकल्प होतील आणि ज्या प्रमाणात सरसकट वृक्षतोड होत आहे ती होऊ न द्यावी. बाहेरच्या देशात असेच मार्ग काढतात.
@Siya83377032@DheringeK@thatPunekar आपल्या भारतापूरते नाही पण एकंदरीत जगाने जो विकासाचा वेग पकडला आहे त्याची गरज आहे का? माझ्या मते नाही. आपल्या पश्चिम महाराष्ट्र मधली जनता फक्त भीमाशंकर प्रोजेक्टवरच अवलंबुन आहे का? आजही आपण सगळे जेवतोच न. वन्य प्राणी सुद्धा महत्वाचं आणि आपला सह्याद्री देखील. 🙏
@DheringeK@Siya83377032@thatPunekar तेच, प्रश्न इथे पक्षाचा नसून आपला, आपल्या पुढच्या पिढ्यांचा आहे. आपण पक्षाला समर्थन देऊन मरून जाऊ, पण पुढची पिढीला जगायचे आहे. वन्य प्राणी आपल्याला जगवावे लागत नाही, ते त्यांचे जगतात. मग त्यांचे आयुष्य हिसकावून घेण्यात काय अर्थ?
@waglenikhil साहेब, यात घुसखोरी का होते यावर कोणतेच सरकार ठोस काहीच करू शकणार नाही कारण भौगोलिक परिस्थिती. काँग्रेस च्यावेळी आपण युद्ध हरले हे विसरून चालणार नाही पण यात काँग्रेस चा दोष नाही. असो, थोडे वाचन, आकलन वाढवा.
@gajabhauX 100% agree.
भीमाशंकर मधली वृक्षतोड ही सामान्य माणसाने थांबवली पाहिजे. सरकार, विरोधी, दोन्ही काहीच कामाचे नाही याबाबत.
आता आंदोलक शांत बसतील, न जरांगे, ज राज ठाकरे, न काँग्रेस इत्यादी काहीच करणार नाहीत.