आपल्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, एक अपरिचित, अतिसुंदर जे जास्त लोकांना माहीत नसणारे ठिकाण जे की वेंगुर्ला तालुक्यातील ऐतिहासिक रेडी, रेड्डी (रेवती द्वीप) ह्या गावातील सुप्रसिद्ध असे एक अद्भुत, डोळ्याचे पारणे फेडणारा,अतिशय सुंदर, अतीउत्कृष्ट, Picturesque, Scenic स्पॉट, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असे ठिकाण म्हणजे "श्री घंगाळेश्वर (घंघाळबाबा) मंदिर".
श्री घंगाळेश्वर मंदिर याचे लोकेशन अतिशय सुंदर आहे. हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात, समुद्राच्या कडेला आहे. मंदिराच्या आजुबाजूला नारळाची झाडे आहेत व मंदिराच्या समोर अफाट पसरलेला निळाशार समुद्र व आजुबाजूचा निसर्ग ह्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पडते.
श्री घंगाळेश्वर मंदिर हे एक लहान असे व open मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराला एक लहान अर्धवर्तुळाकार लोखंडी कमान आहे. कमानी वरती भगवा ध्वज आहे व कमानीला घंटा बांधलेल्या आहेत. लहान अशी निळ्या कलरने रंगवलेला असा चौकोनी कट्टा आहे व आत घंगाळेश्वरचे मंदिर आहे. जसे तुम्ही कमानीच्या आत प्रवेश करता तसे तुम्हाला श्री घंगाळेश्वराचे मंदिर दिसते व समोर सुंदर दिसणारा अफाट असा समुद्र दिसतो.
श्री घंगाळेश्वर मंदिरात अनेक लोक गाऱ्हाणे घालण्यासाठी, नवस फेडण्यासाठी येतात.
श्री घंगाळेश्वर मंदिराला लागूनच दोन लहान वाटा आहेत. डावीकडे जाणारी वाट आहे ती सिमेंटच्या लहान पायऱ्या उतरून समुद्राच्या पाण्याजवळ जाते तिथे एक छोटासा असा सुंदर दिसणारा पांढऱ्या वाळूचा बीच तयार झालेला आहे तिथे गेल्यावर दिसणारे दृश्य अतिशय सुंदर दिसते ते निळे पाणी आणि त्या बीचवर येऊन थडकणाऱ्या लहान लाटा, तसेच येथून दिसणारा सूर्यास्त ही खूप सुंदर दिसतो. समुद्राला ओहोटी असेल तरच आपण त्या लहान बीच वर जाऊ शकतो. दुसऱ्या बाजूला जाणाऱ्या वाट येथून निळाशार असा अफाट समुद्र दिसतो व दोन लहान बेट संपूर्ण माडाच्या झाडाने वेढलेले दिसतात. तिथे जाण्यासाठी पायी वाट नसून बोटीने जावे लागते. डोळ्यात साठवून ठेवावे असे नयनरम्य दृश्य दिसते.
रेडी ता. वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग येथे येणारे बरेच लोक हे श्री गणेश मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी येतात व मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या समुद्र किनारा बगतात, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला रेडी किल्ला (यशवंतगड किल्ला) हे परिचित असणारे स्थळ बगतात.
रेडी गावात बरेच मंदिर आहेत श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री देवी माऊली मंदिर.
निसर्गाने रेडी ह्या गावाला भरभरून सौंदर्य दिले आहे.
"श्री घंगाळेश्वर मंदिर" हे अपरिचित असे ठिकाण आहे. येथे जाण्यासाठी श्री गणेश मंदिर येथून डाव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने जायला लागते हा थोडा ऑफ रोड आहे व तिथून पुढे मायनिंग चे काम सुरू असल्याने त्या कंपनीचे गेट उघडून आपल्याला जावे लागते. थोडा कच्चा रस्ता पार करून गेल्यावर आपल्याला श्री घंगाळेश्वर मंदिर, माडाची झाडे, व अफाट पसरलेला असा निळाशार समुद्र दिसतो. येथील दैवी एनर्जी व निसर्ग सौंदर्य पाहून आपले मन प्रसन्न होते.