My father gave me the greatest gift any person could give another person : "he believed in me ". Today on father's day I only hope n try that I turn out to be at least half good as he is. Happy Father's Day to all the loving fathers and their loving kids @SunilTatkare
चंद्राच्या शीतल प्रकाशात, सुख, समाधान आणि समृद्धी लाभो!
आपल्या सर्वांना शरद पौर्णिमा तथा कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! चंद्राच्या शीतल किरणांसोबत आपल्या आयुष्यातही आनंदाचे आणि आरोग्याचे चांदणे सदैव पाझरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#KojagiriPurnima #SharadPurnima #AditiTatkare #Maharashtra #FullMoon
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. श्री. राहुल नार्वेकर यांची 'राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या' (CPA) कार्यकारी समितीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली निवड राज्यासाठी अत्यंत गौरवाची आहे. लंडनस्थित सीपीए मुख्यालयाकडून त्यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे.
आपल्या संसदीय प्रक्रियेचा अनुभव आणि कार्यक्षमता जागतिक पातळीवर पोहोचणे हे आपल्यासाठी भूषणास्पद आहे. या यशस्वी आणि मानाच्या निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
@rahulnarwekar
जागतिक पोलिओ दिन!
बालकांचे आरोग्य आणि सुरक्षित भविष्य हीच आपली खरी संपत्ती आहे. पोलिओसारख्या गंभीर आजारापासून आपल्या लहानग्यांचे संरक्षण करण्यासाठी वेळेवर पोलिओ डोस आणि लसीकरण पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
लक्षात ठेवा, दोन थेंब, सुरक्षित बालपणाचे
#WorldPolioDay #जागतिकपोलिओदिन #PolioFreeIndia #VaccinationSavesLives #HealthChild #AditiTatkare #MaharashtraHealth
दसऱ्याच्या पावन दिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित केल्याबद्दल, सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याबद्दल महाराष्ट्रीयन यादव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अजय बिरवटकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
📍 नायगाव (दादर)
श्रीकृष्ण मंदिर सभागृह, नायगाव येथे महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दसरा संमेलनात सहभागी होत उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधला. या सोहळ्याच्या माध्यमातून कर्तुत्वाचे सीमोल्लंघन करून विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, नागरिकांचा, महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सर्व सन्मानार्थींचे अभिनंदन करून उपस्थित सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
अष्टमी येथे दरवर्षी नवरात्रोत्सवाला अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणाऱ्या श्री. धाविर महाराज, वराठी गावच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे परमभाग्य लाभले.
यावेळी श्री धाविर महाराजांचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि समस्त जनसामान्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. श्री धाविर महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, तसेच सर्वांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना!
#dhavirmaharaj #roha #raigad #AditiTatkare #ncp #maharashtra
विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारे, देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणारे आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारे केंद्रीय गृह व सहकार मंत्री माननीय श्री. अमितजी शाह साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@AmitShah
माझ्यासह रायगड जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे रोहा शहराचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज... सर्वांच्या मनात चैतन्य निर्माण करणारा व समाजात एकोपा निर्माण करणारा महाराजांचा पालखी सोहळा म्हणजे सर्वांसाठी आनंदाची व भक्तीची पर्वणीच.
याच अत्यंत पवित्र आणि भक्तिमय सोहळ्यात रायगडचे पालकमंत्री मा.श्री. भरत गोगावले साहेब , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेते, खासदार मा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब, आमदार मा.श्री. अनिकेतभाई तटकरे यांच्यासह उपस्थित राहत, श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले. यावेळी, रोहा नगराध्यक्ष कु. वनश्री शेडगे तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परंपरेप्रमाणे यावर्षीही रायगड पोलीस दलाच्या वतीने श्री धावीरदेव महाराजांना सशस्त्र सलामी देण्यात आली. महाराजांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदावी, आपली कृपा सर्व भक्तांवर असावी अशी मनोभावे प्रार्थना केली !
जय श्री धावीर! हर हर महादेव!
@SunilTatkare@ibharatgogawale@ATatkare
#dhavirmaharaj #रोहा #raigad #palkhi
पोलीस स्मृती दिनानिमित्त देशाच्या सुरक्षेसाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर पोलीस जवानांना विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांचे शौर्य, समर्पण आणि त्याग सदैव स्मरणात राहील.
#policesmritidiwas#AditiTatkare#ncpmaharashtra
माझ्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, रोहा शहराचे ग्रामदैवत 'श्री धावीर महाराज'. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात, शिस्त आणि उत्साहाच्या संगमावर श्री धावीर महाराजांचा भव्य पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी, ऐतिहासिक परंपरेचा मान राखत, रायगड पोलीस दलाच्या वतीने श्री धावीर महाराजांना पारंपरिक सशस्त्र सलामी देण्यात आली. पोलिसांची ही मानवंदना आणि त्यानंतर होणारा 'श्रीं'चा पालखी सोहळा रोहेकरांच्या अस्मितेचे व सामाजिक एकतेचे प्रतीक आहे.
#RohaPalkhi #DhavirDevSalami #dhavirmaharaj #Gramdaivat #Roha #PalkhiUtsav #PoliceSalute #raigad #Adittatkare #CultureOfMaharashtra
मित्र-मैत्रिणींसोबत नवरात्रोत्सव दर्शन !
रोह्यातील श्री धावीर महाराज देवस्थान म्हणजे आम्हा तटकरे परिवारासह रोहा शहर व तालुक्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान..!
नवरात्रोत्सवात हे पवित्र देवस्थान भाविकांच्या उत्साहाने आणि अध्यात्मिक ऊर्जेने भारावून जाते. याच उत्सवाचे औचित्य साधून माझ्या शालेय मित्र-मैत्रिणींसोबत श्री धावीर महाराज देवस्थान येथे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी रोहा शहर व तालुक्यातील सर्वच जिवाभावाच्या माणसांसोबत, परिचितांसोबत संवाद साधला व सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच, आम्ही सर्व मित्र-मैत्रिणींनी मिळून महाप्रसादाचे वाटपही केले.
इंदापूर , माणगाव, पाली तालुक्यात नवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. आज या उत्सवात सहभागी होत अनेक सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना, अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विविध मंदिरांना भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
#raigad#mangaon#इंदापूर#maharashtra #navratra
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आ.श्री. धर्मरावबाबा आत्राम, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, आपल्या हातून अखंड सेवाकार्य घडावे याच सदिच्छा!
@dharmaraobaba
यावेळी खा.श्री. श्रीरंग बारणे, आमदार श्री. अनिकेतभाई तटकरे, आमदार श्री. महेंद्र दळवी, आमदार श्री. रवींद्र पाटील, आमदार श्री. महेंद्र थोरवे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. मंगेश वाकडीकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. मधुकर पाटील, जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. उमेश सूर्यवंशी, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री. संदेश शिर्के यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
@SunilTatkare@ibharatgogawale
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खा.श्री. सुनिल तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला.
लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यातून विकासकामांसाठी मिळालेल्या निधीचा विहित कालमर्यादेत सदुपयोग व्हावा असे निर्देश या बैठकीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण सुविधांना प्राधान्य द्यावे, तसेच शेतकरी, महिला सक्षमीकरण आणि कुपोषण निर्मूलनावर भर द्यावा असेही निर्देश देण्यात आले. विकासकामांची गुणवत्ता, पारदर्शकता व नियमित पाहणी सुनिश्चित करावी अशा सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या.
माझे बंधु मावळ विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार श्री.सुनिल शेळके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
मावळच्या जनतेसाठी दिवसरात्र कार्यरत असलेल्या सुनिलजींच्या नेतृत्वामुळे मतदारसंघात विकासकामांना गती मिळाली आहे. आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, तसेच आपल्या हातून अखंड जनसेवा घडावी,हीच सदिच्छा!
@shelkesunilanna
"संकटाच्या प्रसंगी प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसाठी आणि समर्थनासाठी 'निर्भया पथक' सदैव त्यांच्या पाठीशी आहे!"
विजयादशमी / दसऱ्याच्या पवित्र निमित्ताने, स्त्री शक्तीचा सन्मान करत ‘जागर तीच्या कर्तृत्वाचा’ या विशेष मालिकेतील हा खास भाग. महिलांना त्यांच्या हक्कांची आणि सुरक्षेची जाणीव व्हावी, त्यांना कोणत्याही अडचणीच्या वेळी त्वरित मदत मिळावी यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलाचे ‘निर्भया पथक’ सदैव कार्यरत आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती किंवा छेडछाड झाल्यास घाबरून न जाता खालील हेल्पलाईन नंबरवर नक्की संपर्क साधा:
🚨 तातडीच्या मदतीसाठी महत्त्वाचे हेल्पलाईन नंबर:
आपत्कालीन मदतीसाठी: डायल ११२
महिला हेल्पलाईन: डायल १०३
महिलांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सबळ बनून, स्वतःच्या सुरक्षेसाठी या सुविधांचा वापर केला पाहिजे.
#Dasara #NirbhayaPathak #MaharashtraPolice #WomenSafety #WomenEmpowerment
#StreeShakti #AditiTatkare
दीक्षाभूमीवर घडलेली ती ऐतिहासिक सामाजिक क्रांती आजही आपल्या सर्वांना समता, बंधुता आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि महान धम्मक्रांतीला विनम्र अभिवादन...
सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#धम्मचक्र_प्रवर्तन_दिवस
दुष्ट प्रवृत्तींवर सत्कर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणजे विजयादशमी..!
महिलांच्या व बालकांच्या सन्मानाला, आरोग्याला, विकासाला बाधक ठरणाऱ्या अशाच दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील आहोत.
आपल्या या सत्कर्मांना यश यावे, महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीचे जीवन सन्मानाचे, प्रत्येक बालकाचे भविष्य उत्तम आरोग्याचे असावे याच सदिच्छा. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
#दसरा #विजयादशमी