औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खड्डे दुरुस्तीच्या कामांची पाहणी
मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी आज दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या खड्डे दुरुस्तीच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी प्रभाग क्रमांक ९ मधील पॅनकार्ड रोड तसेच प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत ब्रेमेन चौक ते आंबेडकर चौक आणि आंबेडकर चौक येथील मुख्य रस्त्यावरील फुटपाथ दुरुस्ती व खड्डे दुरुस्तीच्या कामांची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला. कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मा. अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी महापालिका मा. सहाय्यक आयुक्त श्री. दांगट, मा. उपअभियंता श्री. लांडे आणि मा. कनिष्ठ अभियंता श्रीमती शीतल जोशी उपस्थित होते.
नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवा. PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
https://t.co/68pW89uAu0
#FieldVisit #WorkUpdate #UrbanDevelopment #AundhBaner #FootpathRepair #PMCCare #PuneCity