NEET-UG प्रश्नपत्रिका आता केंद्र शासनाचे अर्थ मंत्रालय छापणार असल्याचा दावा खोटा आहे. NEET-UG परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत (NTA) शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत घेतली जाते. अर्थ मंत्रालयाचा परीक्षा घेणे किंवा प्रश्नपत्रिका छापणे याच्याशी कोणताही संबंध नाही.
#FactCheck
#DGIPRFactCheck
#NEET
#NTA
A new era of healthcare begins in Maharashtra!
Navi Mumbai International MediCity (NMIMC) will bring together world-class healthcare, medical education, research, innovation, and medical tourism on a single integrated platform. With a USD 1.2 billion investment, over 10,000 direct jobs, and Cleveland Clinic as the anchor institution, Maharashtra is taking a major step towards becoming a global healthcare destination aligned with the ‘Heal in India’ vision.
#NaviMumbaiMediCity #NMIMC #HealInIndia #HealthcareInnovation #MedicalTourism #HealthcareHub #Brookfield #ViksitMaharashtra #FutureOfHealthcare #HealthcareEcosystem
📍नवी दिल्ली
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली #नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या (गव्हर्निंग कौन्सिल) अकराव्या बैठकीचे आयोजन राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकासाचा #रोडमॅप सादर केला. या बैठकीस केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपा��, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोककुमार लाहिडी आणि सदस्य उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख बाबींवर महाराष्ट्र शासन विशेष भर देत आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीसोबतच समतोल व सर्वसमावेशक विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व क्षेत्रात व्यापक प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
एकूण सकल देशांतर्गत उत्पन्नात सुमारे १४ टक्के योगदान देणारे महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित होत असल्या तरी सुशिक्षित, कुशल, निरोगी आणि सक्षम नागरिक हीच महाराष्ट्राची खरी ताकद आहे. या पार्श्वभूमीवर विकसित महाराष्ट्र - २०४७ हे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करण्यात आले असून २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलर, २०३५ पर्यंत दोन ट्रिलियन आणि २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील सर्व विभागांनी २०२९-३० पर्यंतच्या कालावधीसाठी ��ृती आराखडे तयार केले असून शाश्वत विकास उद्दिष्टांची वेळेत पूर्तता करण्यावर राज्याचा भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आकांक्षित जिल्ह्यांची संख्या चारवरून दहापर्यंत आणि आकांक्षित तालुक्यांची संख्या २७ वरून १७७ पर्यंत वाढविण्यात आली असून या भागांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त : https://t.co/PJO173Hws9
@narendramodi
@Dev_Fadnavis
@NITIAayog
#नीतीआयोग
#विकसितभारत
भारताचे पहिले जागतिक स्तरावरील आरोग्य सेवा, संशोधन, वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय पर्यटन केंद्र म्हणून #नवीमुंबईइंटरनॅशनलमेडिसिटी विकसित केली जाणार
▶️राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (ए���एमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार
▶️प्रस्तावित भागीदारीनुसार, क्लीव्हलँड क्लिनिक या प्रकल्पाची प्रमुख संस्था म्हणून कार्य करेल. अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि रुग्णकेंद्रित आरोग्य सेवा पुरविण्यातील जागतिक अनुभव या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिला जाईल.
▶️या प्रकल्पातून सुमारे १.२ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि १०,��०० हून अधिक थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा
@ClevelandClinic
@Brookfield
@ArcelorMittal
@IndiainNewYork
@IndianEmbassyUS
📍क्लीव्हलँड, ओहायो
जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (ए��चसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार केला. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच ब्रुकफिल्ड आणि एएचसीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
‘#मेडिसिटी’ ही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘हील इन इंडिया’ या दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्��ात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज झालेल्या सामंजस्य करारातून ही भागीदारी भारतातील आरोग्य सेवांच्या क्षेत्रातील परिवर्तनकारी प्रवासाची सुरुवात आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित आरोग्य संस्थांपैकी एक असलेल्या क्लीव्हलँड क्लिनिकने महाराष्ट्रासोबत या उपक्रमात भागीदारी करण्याचा निर्णय घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे. डॉ. मिहाल्जेविक यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्लीव्हलँड क्लिनिक नेतृत्वाचे तसेच विशेषतः डॉ. समीर कपाडिया आणि लक्ष्मी मित्तल यांचे या उपक्रमाला पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले."
मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्त���भ धवसे यांनी क्लीव्हलँड क्लिनिकच्या मुख्यालयात महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व केले. क्लीव्हलँड क्लिनिकच्या पथकाचे नेतृत्व त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. टोमिस्लाव मिहाल्जेविक, डॉ. समीर कपाडिया (अध्यक्ष, कार्डिओव्हॅस्क्युलर मेडिसिन), डॉ. फाल्कोने (अध्यक्ष, इमर्जिंग मार्केट्स) आणि आर्सेलर मित्तलचे कार्यकारी अध्यक्ष तसेच क्लीव्हलँड क्लिनिकचे संचालक मंडळ सदस्य श्री. लक्ष्मी ���ित्तल यांनी केले. आरोधन हेल्थ सिटीच्या डॉ. सलोनी पटवर्धन याही क्लीव्हलँड येथे उपस्थित होत्या.
@Dev_Fadnavis
@ClevelandClinic
@Brookfield
@ArcelorMittal
@IndiainNewYork
@IndianEmbassyUS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता; अडचणीतील शेतकरी कुटुंबाला तातडीने बैल व नुकसान भरपाई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर ओढवलेली बिकट परिस्थिती समजताच त्यांना तातडीने मदत केली. वीज पडून बैल दगावल्याने पत्नीला जोखडाला जुंपण्याची वेळ आलेल्या या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासांत एक बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कम मिळाली आहे.
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्याकडे ��सणाऱ्या बैलाचा शुक्रवारी (5 जून) झालेल्या वादळी पावसात वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे काशिनाथ यांना शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी पत्नी हौसाबाई यांना जोखडाला जुंपावे लागले, हे वृत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लातूरचे जिल्हाधिकारी तसेच सर्व यंत्रणा��ना तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तहसील कार्यालयासह, पशूसंवर्धन, कृषी आदी सर्व यंत्रणा श्री. गायकवाड यांच्यापर्यंत पोहचल्या. पशूसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक एक बैल उपलब्ध करून घेतला आणि तो जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट गायकवाड कुटुंबियांकडे सुपूर्द केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या संवेदनशील हाताळणीमुळे गायकवाड कुटुंबाला मोठा दिलासा म��ळाला असून त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis
📍 नवी दिल्ली
‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२६’ साठी ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे. इच्छुकांनी आपले अर्ज https://t.co/eqG3QfPQcu या संकेतस्थळावर सादर करण्याचे आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केले आहे.
भारतात वास्तव्यास असलेले भा���तीय नागरिक आणि ५ ते १८ वर्षे वयोगटातील बालके यासाठी पात्र आहेत. या पुरस्कारासाठी स्व-नामांकन तसेच तृतीय पक्षाकडून शिफारस अशा दोन्ही प्रकारच्या अर्जांना मान्यता दिली जाणार आहे.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त - https://t.co/DqfXj2KvMJ
A major boost to connectivity in the Mumbai Metropolitan Region
₹22,611 crore worth of road and metro projects approved to transform mobility across the Mumbai Metropolitan Region and benefit nearly 12 lakh commuters every day
#InfrastructureBoost#MumbaiDevelopment #NaviMumbaiMetro #ConnectivityForAll #MaharashtraInfrastructure #Maharashtragovernment
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले प्रधानमंत्री बनले आहेत; हा टप्पा त्यांच्या एका दशकाहून अधिक काळातील नेतृत्व, सेवा आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या नेतृत्वात भारतासह महाराष्ट्र राज्याने विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल अनुभवले आहेत. आर्थिक विकास आणि डिजिटल परिवर्तनापासून ते पायाभूत सुविधांचा विस्तार, सामाजिक सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर अधिक बळकट स्थान निर्माण करण्यापर्यंतचा हा प्रवास विकास आणि लोककल्याणावर सातत्याने दिलेला भर, यामुळे साकार झाला आहे.
.
.
Prime Minister Narendra Modi has become India's longest-serving elected Prime Minister, a milestone that reflects over a decade of leadership, service and nation-building. Over the past 4,399 days, India and Maharashtra has witnessed transformation across sectors. From economic growth and digital transformation to infrastructure expansion, social empowerment and a stronger global presence, this journey has been shaped by a sustained focus on development and citizen welfare.
#LongestServingElectedPMModi
सक्षम भारताची उभारणी भक्कम पायाभूत सुविधांवर होते. २०१४ मध्ये ७४ विमानतळांपासून २०२६ मध्ये १६४ विमान��ळांपर्यंतचा प्रवास करत, हवाई संपर्क क���वळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. यामुळे देशभरातील विकासाला नवी गती मिळाली आहे.
.
.
A stronger India is built on stronger infrastructure. From 74 airports in 2014 to 164 in 2026, connectivity has expanded far beyond major cities, unlocking growth across the country.
.
.
आधुनिक भारत की बदलती तस्वीर यहाँ की कनेक्टिविटी में साफ दिखती है। साल 2014 में देश में सिर्फ 74 चालू हवाई अड्डे थे, जिनकी संख्या आज बढ़कर 164 हो चुकी है। इसने नए अवसरों को हर क्षेत्र के करीब ला दिया है।
#LongestServingElectedPMModi
काही सुधारणा व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणतात व त्या पिढ्यानपिढ्या उपयुक्त ठरतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात लागू करण्यात आलेल्या #जीएसटी मुळे विविध करांच्या गुंतागुंतीच्या जाळ्याऐवजी एकसंध राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण झाली. त्यामुळे भारतभर व्यवसाय करणे अधिक सुलभ झाले.
.
.
Some reforms change systems for generations. #GST, introduced within PM Modi's first term, replaced a maze of taxes with one national market, making it easier to do business across India.
.
.
टैक्स के उलझे जाल को खत्म कर 'एक राष्ट्र, एक बाजार' का सपना सच करने वाला GST, आजाद भारत के सबसे बड़े आर्थिक सुधारों में से एक ���हा। पिछले 4,399 दिनों के सफर में यह देश की तरक्की का बड़ा मील का पत्थर है।
#LongestServingElectedPMModi
सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या ४०१ दिवसांत 'डिजिटल इंडिया' अभियानाची सुरुवात करण्यात आली. आज १०२ कोटींहून अधिक इंटरनेट जोडण्या, डिजिटल पेमेंट्स आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनामुळे भारताची काम करण्याची, शिकण्याची आणि व्यवहार करण्याची पद्धत आमूलाग्र बदलली आहे.
.
.
401 days after taking office, Digital India was launched. Today, over 102 crore internet connections, digital payments and technology-led governance have transformed how India works, learns and transacts.
.
.
401 ��िन! 'डिजिटल इंडिया' को जमीन पर उतारने में बस इतना ही समय लगा। आज इसी ��िजिटल क्रांति के दम पर पेमेंट्स से लेकर सरकारी सेवाओं की डिलीवरी तक, यह टेक्नोलॉजी करोड़ों भारतीयों को सशक्त बना रही है।
#LongestServingElectedPMModi
२०१४ मध्ये मोजक्याच स्टार्टअप्सपासून सुरू झालेला प्रवास आज १.४ लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्सपर्यंत पोहोचला आहे. नव्या पिढीतील नवोन्मेषकांच्या बळावर भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था म्हणून उदयास आला आहे.
.
.
From a handful of startups in 2014 to more than 1.4 lakh registered startups today, India has emerged as the world's third-largest startup ecosystem, powered by a new generation of innovators.
.
.
भारत की स्टार्टअप क्रांति देश की युवा पीढ़ी के बढ़ते आत्मविश्वास की कहानी है। 1.4 लाख से ज्यादा रजिस्टर्ड स्टार्टअप्स के साथ भारत आज दुनिया का तीसरा सबसे बड़ा स्टार्टअप इकोसिस्टम है, जहाँ हमारे युवा देश को आगे बढ़ा रहे हैं।
#LongestServingElectedPMModi
#परभणी
परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६
मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
@MahaDGIPR@InfoMarathwada