भारतीय बॉक्सर्सनी आशियाई क्रीडा स्पर्धेत केला श्रीगणेशा...
नरेंद्र बेरवालने कांस्यपदकाने केली सुरूवात...
भारताच्या नरेंद्र बेरवालने मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या बॉक्सिंग खेळातील +९० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.
अटीतटीच्या झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकस्तानचा विद्यमान विश्वविजेता ऐबेक ओरलबेकडून त्याला पराभव पत्करावा लागला.
नरेंद्र बेरवालचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
#AsianGames2026 #India #Boxing #BronzeMedal #Cheer4Bharat
भारताच्या नीरू धांडाने आशियाई विक्रमासह महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावले...
आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरू धांडाने नेमबाजी खेळातील महिला ट्रॅप विभागात पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले...
सांघिक विभागात देखील रौप्यपदक पटकावत आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरूचे दुसरे पदक...
तब्बल ४७ वर्षांनंतर या विभागात भारताला पदक मिळवत नीरूने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.
नीरूच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल देशवासीयांना नक्कीच सार्थ अभिमान आहे. अचूकता, एकाग्रता आणि संयम यांची उत्तम सांगड घालत नेत्रदीपक कामगिरी बजावणाऱ्या नीरू धांडा हिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
#AsianGames2026 #India #Shooting #GoldMedal #Cheer4Bharat
भारतीय भालाफेकपटूंची ऐतिहासिक कामगिरी...
पुरुषांच्या भालाफेक प्रकारात यशवीर सिंग आणि रोहित यादव यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदके पटकावली...
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेक प्रकारात यशवीर सिंग आणि रोहित यादव यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदके पटकावत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.
यशवीर सिंग आणि रोहित यादव यांनी बजावलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
#AsianGames2026 #India #Athletics #JevelinThrow #SilverMedal #BronzeMedal #Cheer4Bharat
आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये रौप्यपदक पटकावून कोल्हापूरचा गौरव वाढविणाऱ्या कु. सोनम उत्तम मस्कर यांच्या स्वागत व सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहून तिचे अभिनंदन केले.
सोनम, तुझ्या या यशाचा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान आहे. त��झ्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳🥈
#prakashabitkar #sonammaskar #asiangames2026 #rifleshooting #silvermadel🥈
आमचे सहकारी आणि ��ोल्डन फ्युचरचे सीईओ मा. सर्जेराव पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या ‘श्री हरी प्युअर व्हेज’ हॉटेलला सदिच्छा भेट दिली.
हॉटेलची आकर्षक व सुबक रचना, प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण तसेच उत्तम नियोजन मनापासून भावले. याप्रसंगी ��ेथील चविष्ट आणि दर्जेदार अशा शाकाहारी भोजनाचाही आस्वाद घेतला. उत्तम आदरातिथ्य आणि सेवेमुळे हा अनुभव अधिक आनंददायी झाला.
नवीन व्यवसायाची सुरुवात करून आपल्या कल्पकतेला आणि मेहनतीला व्यावसायिक यशाची जोड देणाऱ्या मा. सर्जेराव पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! ‘श्री हरी प्युअर व्हेज’ला निश्चितच ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.
याप���रसंगी पंचायत समिती सदस्य मा. विलास भोसले, लोकनियुक्त सरपंच कांचनवाडी मा. सुभाष भोसले, माजी सरपंच मा. विष्णुपंत पाटील, चेअरमन मा. तानाजी पाटील, एसटी कामगार नेते मा. उत्तम पाटील, लोकशाहीर मा. रणजीत आशा अंबाजी कांबळे, मा. विशाल पाटील, मा. सुनील दळवी, मा. अनंत गोसावी, मा. अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
#PrakashAbitkar #Kolhapur
#PublicHealthandFamilyWelfareMinistry
भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देत देशभक्ती, त्याग आणि शौर्याचा आदर्श घालून देणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची निर्भीड वृत्ती आणि मातृभूमीसाठी केलेले सर्वोच्च बलिदान देशातील प्रत्येक पिढीला सदैव प्रेरणा देत राहील. क्रांतीच्या या तेजस्वी ज्यो���ीला शतशः नमन! 🇮🇳
#PrakashAbitkar #PublicHealth #FamilyWelfare #GuardianMinisterofKolhapur #BhagatSingh #ShaheedBhagatSingh #भारतमाता
भारतीय संगीतविश्वाला आपल्या स्वरांनी अजरामर करणाऱ्या भारतरत्न, गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
आपल्या अद्वितीय स्वरांनी त्यांनी भारतीय संगीताला जगभरात एक वेगळी ओळख मिळवून दिली. अनेक पिढ्यांच्या भाववि���्वाचा अविभाज्य भाग बनलेला त्यांचा स्वर आणि संगीत क्षेत्रातील त्यांचे अतुलनीय योगदान सदैव स्मरणात राहील. स्वररूपाने प्रत्येक भारतीयाच्या मनात अजरामर असलेल्या लतादीदींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
#PrakashAbitkar #PublicHealth #FamilyWelfare #GuardianMinisterofKolhapur #LataMangeshkar #BharatRatna #लतादीदी
अभिमानाचा क्षण! 🇮🇳
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या २०० म���टर धावण्याच्या शर्यतीत भारतीय धावपटू हरिता भद्रा हिने दमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.
तिच्या या शानदार यशाबद्दल हरिताचे मनःपूर्वक अभिनंदन! तिची जिद्द, मेहनत आणि उत्कृष्ट कामगिरी देशातील युवा खेळाडूंना नक्कीच प्रेरणा देणारी आहे.
हरिता, पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#PrakashAbitkar #Kolhapur
#PublicHealthandFamilyWelfareMinistry
#AsianGames2026 #HaritaBhadra #India #Athletics #BronzeMedal #Cheer4Bharat
स्क्वॅशमध्ये भारताच्या खात्यात एक रौ��्यपदक...
अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अभय सिंगने केली रुपेरी कामगिरी...
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ स्क्वॅश खेळातील पुरुष एकेरी गटात अभय सिंगने उत्तम लढत देत रौप्यपदकावर मोहोर उमटवली आहे.
अभय सिंगचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
#PrakashAbitkar #Kolhapur
#PublicHealthandFamilyWelfareMinistry
#AsianGames2026 #India #Squash #SilverMedal #Cheer4Bharat
महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्राची चौधरीने पटकावले कांस्यपदक...
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्राची चौधरी या भारतीय धावपटूने कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली आहे.
प्राची चौधरीचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
#AsianGames2026 #India #Athletics #BronzeMedal #Cheer4Bharat
भारतीय महिला कबड्डी संघाचे घवघवीत सुवर्ण यश...
अटीतटीच्या अंतिम सामन्यात इराणच्या संघांचा धुव्वा उडवून कोरले सुवर्णपदकावर आपले नाव...
जपानमध्ये डौलाने फडकला तिरंगा...
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील महिला कबड्डी सांघिक विभागाच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाने इराणी संघावर ३७-३४ विजय मिळवत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली आहे.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या अंतिम फेरीच्या लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या इराणी संघावर मात करणाऱ्या भारतीय महिला कबड्डी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
#AsianGames2026 #India #Kabaddi #GoldMedal #Cheer4Bharat
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीचा ‘Trigger-1 (प्रथम कळ)’ लागू करून पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बाधित क्षेत्रातील पिकांची स्थिती, छायाचित्रे आणि GPS माहितीच्या आधारे नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळावी आणि विविध उपाययोजना व सवलतींचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे.
#PrakashAbitkar #PublicHealth #FamilyWelfare #GuardianMinisterofKolhapur #MaharashtraFarmers #FarmerRelief #Kharif2026
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील महिला कबड्डीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इराणवर ३७-३४ असा विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. अटीतटीच्या लढतीत दाखवलेली जिद्द, सांघिक खेळ आणि शेवटच्या क्षणापर्यंतची लढाऊ वृत्ती कौतुकास्पद आहे.
या शानदार सुवर्ण यशाबद्दल संपूर्ण भारतीय महिला कबड्डी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
#PrakashAbitkar #PublicHealth #FamilyWelfare #GuardianMinisterofKolhapur #AsianGames2026 #IndianKabaddi #Cheer4Bharat