आनं�� दिघे-दिशा सलियान जुने टॉपिक झाले…
मुद्दाम काही जण चघळत बसलेत…
अजित दादा सारखा महाराष्ट्रातील २ नंबरच्या पदावर असलेला नेत्याचा मृत्यू कसा झाला हा विषय काढायला कोण तयार च नाही !!!
प्रभाग क्र.८७ व ८८ मधील विविध सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना भेट दिली व श्री गणरायाचे दर्शन घेतले.
मंडलांच्या कार्यकर्त्यांचा ��त्साह, भक्तीमय वातावरण आणि नागरिकांशी भेटीगाठींमुळे मन प्रसन्न झाले. सोबात स्थानिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
कल्याण व भिवंडी लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर आज दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बै���क घेतली.
या बैठकीला शिवसेना, महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्न या बाबत सविस्तर चर्चा झाली.
येणाऱ्या ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत मशालच पेटणार 🔥
महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणा���ा, न्यायालयीन कार्यवाहीत सादर करण्यात आलेला दस्तऐवज पाहा.
सतीश सालियन यांच्या वकिलांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजीच्या Exhibit ‘A’ मधील पान क्रमांक २३३, मुद्दा क्रमांक २ मध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की:
“कु. दिशा सलियन ह्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून सामूहिक अत्याचार करून नंतर खून करण्यात आल्याबाबतचे आरोप प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मा. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मा. आमदार श्री. नितेश राणे व इतर अनेक लोकांनी केले आहेत.”
ह्याचा सरळ-सरळ अर्थ होतो कि, त्या सामूहिक अत्याचाराचे आणि खुनाचे प्रत्यक्षदर्शी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार श्री. नितेश राणे आहेत.
सतीश सालियन यांच्या वकिलांनी सादर केलेल्या या कागदपत्रातील उल्लेखाच्य��� अनुषंगाने काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात:
१. असा सामूहिक अत्याचार होताना हे प्रत्यक्षदर्शी महाशय शांत राहून अत्याचार का पहात बसले होते? हस्तक्षेप का केला नाही?
२. खून होताना दिसतोय तरी मान्यवर प्रत्यक्षदर्शीने ते रोखण्यासाठी काहीच का केलं नाही?
३. सामूहिक अत्याचार पाहिल्यानंतर पीडितेला तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी कोणती पावले उचलण्यात आली?
४.अशी घटना प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा असल्यास, त्यानंतर तातडीने पोलिसांशी संपर्क का साधण्यात आला नाही?
असा अत्याचार आणि खून पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसांच्या मानसिक स्थितीवर काहीअंशी परिणाम होतो मग प्रत्यक्षदर्शीं इतके नोर्मल कसे?
असेच ह्यांनी किती सामूहिक अत्याचार आणि खून आयुष्यात प्रत्यक्षदर्शी म्हणून पाहिले आहेत?
असा भयंकर अत्याचार आणि खून प्रत्यक्ष पाहिल्यानंतरही एखादी व्यक्ती पूर्णपणे सामान्यपणे वागत असेल, तर अशा वर्तनाला मानसशास्त्रीय भाषेत काय म्हणतात?
असे अनेक गहण प्रश्न महाराष्ट्राला पडणार आहेत. ह्यांचं उत्तर म��ळायलाच हवं. कारण खालील कागदपत्र सोशल मीडिया किंवा मीडिया ट्रायलसाठीचा स्क्रिनशॉट नाही तर कोर्टात धडधडीत न्यायालयीन पुरावा म्हणून दाखल केलेले कागदपत्र आहे.
बाप विवाहबाह्य संबंध ठेवतो म्हणून मुलगी लिव्ह इन मध्ये राहून दारू, पार्टी आणि चंगळ करते.तिच्या मृत्यूनंतर तोच बाप ५०० करोडची अपेक्षा करतो. असा अय्याश आणि नशेडी बाप कुणाला लाभू नये.
आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. आज समाज अती उत्सवप्रिय आणि गोंगाटप्रिय झालेला असताना आणि धर्माच्या नावाखाली कुठल्याही अंधश्रध्दांना श्रद्धा म्हणायचं आणि त्यावर कोणी तार्किक प्रश्न विचारला की त्याला लगेचच हिंदू विरोधी ठरवायचं अशा काळात आमच्या आजोबांची आठवण जास्तच प्रकर्षाने येते.
राजकारण्यांनी खरं तर समाज हा कुप्रथांमध्ये अडकत असेल आणि वाहवत जात असेल तर समाजाला थांबवायला हवं. पण सध्या चित्र उलटंच दिसतंय, स्वतःच्या मतांच्या लाचारीसाठी संधी दिसेल तिकडे झुकायला राजकारणी तयार होत आहेत. आज आमचे आजोबा असते तर त्यांनी या सगळ्यांवर लेखणीचे आसूड कसे ओढले असते हा विचार अनेकदा मनात येतो. असो.
महाराष्ट्राला प्रबोधनाची वाट संतांपासून ते समाजसुधारकांपासून अनेकांनी दाखवली. त्यावर महाराष्ट्र अनेक शतकं चालत आला म्हणून आजचा महाराष्ट्र दिसतोय. महाराष्ट्राकडे कुठल्याही गोष्टीकडे तर्काने बघण्याची जी एक मोठी शक्ती होती आणि आजही आहे, तिचा कधीही लोप होऊ नये हीच इच्छा. आणि ती शक्ती वृद्धिंगत होत राहणे हीच आमच्या आजोबांना खरी श्रद्धांजली ठरेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
राज ठाकरे ।
अफवांचा धुरळा उडवणं बंद करण्यासाठी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त तथ्य सांगतो!
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्��िक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.
कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत.
अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.
परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे.
सत्यासाठी, अन्यायाविरुद्ध, देशवासीयांना सोबत घेऊन आमचा लढा सुरुच राहील!
हिंदीला कडाडून विरोध होता, आहे ���णि राहणार! इतकेच नव्हे, तर वरचेवर वाढत जाणार! उत्तर भारतीय पक्षाला महाराष्ट्रावरील आकसापोटी कितीही वाटले, तरी महाराष्ट्राचे हिंदीकरण कदापी होणार नाही. महाराष्ट्र मराठी होता, आहे आणि राहणार.
आम्ही मराठी भाषिक आहोत आमचा हिंदीचा काही संबंध नाही तरीही
आम्ही भारताचे नागरिक आहोत..
महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य इथे हिंदी दिन वगैरे साजरा करणारे राजकीय हिंदी गुलाम लोक लाचार झाले आहेत..
कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, आई सौ. रश्मी ठाकरे ह्यांच्यासह अत्यंत भक्तीभावाने दर्शन घेतले.
विघ्नहर्ता लालबागच्या राजाची आपल्या सर��वांवर कृपेची सावली सदैव राहो!
श्यामप्रसाद मुखर्जी त्याच मुस्लिम लीग सोबत अर्थ मंत्री होता,
अटलबिहारी ह्यांची सुरवातीची वाटचाल डाव्या विचारसरणीची होती,
लालकृष्ण अडवाणी हे जिन्नांच्या समाधी वर डोके ठेवून आले,
ह्या पुढे भाजपची माकडे ज्या पद्धतीने बाळासाहेबांबद्दल बोलतील तसेच उत्तर मी देणार!
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ७२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पुरस्कार देशाच्या राजधानीच्या दिल्ली शहरातून हलवून गुजरातमध्ये केवाडिया येथे होणार आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचं, मुंबई शहराचं महत्व संपवण्याचा खटाटोप एकीकडे सुरू असताना दुसरीकडे देशाच्या राजधानीचं जे महत्व आहे ते हळूहळू संपवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. मुळात हा पुरस्कार सोहळा हलवण्याचं कारण काय ? स्वतःला काही निर्माण करता आलं नाही की बदल नावं, बदल स्थळं आणि यातून भ्रामक इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे असं दिसतंय. बरं कधी ना कधी आता उरलो गुजरातपुरते अशी आपली गत होणार याची खात्रीच वाटत असल्यामुळे किमान तिकडे तरी माहात्म्य निर्माण करून घेऊ हा अट्टाहास सध्या केंद्रातील २ सत्ताधीशांचा दिसतोय.
बरं समजा पुरस्कार सोहळ्याचं स्थळ हलवायचं होतं तर ते मुंबईत का नाही आणलं? ज्या दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घातला त्या राज्यात का नाही पुरस्कार वितरण ? किंवा देशात सगळ्यात जास्त सिनेमे महाराष्ट्र आणि दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथे घडवले जातात यापैकी कुठल्या राज्यात हा सोहळा का नाही ? दक्षिणेत तर सिनेमांनी तिथल्या राजकारणाला आकार दिला आहे. गुजरातच का ?
या आधी देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले, ज्यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेली राज्य त्यांनी ओढूनताणून मोठी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इथे कॉमनवेल्थ स्पर्धा गुजरातमध्ये, २०२३ च्या क्रिकेट वल्डकपचा अंतिम सामना गुजरातमध्ये, बाहेरून राष्ट्राध्यक्ष आले त्यांना गुजरातमध्ये घेऊन जायचं, गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातमध्ये न्यायची. या सगळ्यातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना काय दाखवायचं आहे की या देशाच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा पाळणा हा गुजरातमध्ये हलला ? आज जो देश उभा आहे तो कित्येक पिढ्यांच्या त्यागातून आणि देशातील प्रत्येक प्रांताच्या योगदानातून उभा आहे. यांना गुजरातपलीकडचा देश फक्त आठवतो त्या त्या राज्यात निवडणुका आल्या की. मग तिकडे जाऊन तिथले कपडे घालून भाषणं करून, माझं कसं या राज्याशी जुनं नातं आहे सांगून मतं मिळवायची एवढंच जमतं का ?
सध्याचे स��्ताधीश ‘कलासक्त’ नाहीत हे माहित आहे. कशाही निवडणुका जिंकायच्या ही एकमेव कला आणि त्यासाठी सगळ्यांवर सक्ती इतकाच यांचा ’कलासक्त’पणाशी संबंध. आणि चित्रपटांशी संबंध म्हणाल तर वाट्टेल ते प्रचारकी सिनेमे बनवून घ्यायचे आणि त्यांना पुरस्कार द्यायला लावायचे इतकाच संबंध. बरं या सगळ्याला दक्षिणेतील इतर सिनेमाप्रेमी राज्य कडाडून विरोध करतील, पण महाराष्ट्रात काहीही घडणार नाही. पण कलाकारांनी या विरोधात आवाज उठवायला हवा. मुद्दा केवाडिया किंवा इतर शहर हा नाही, देशाच्या राजधानीत या पुरस्कराची जी उज्वल परंपरा आहे ती का मोडली जात आहे यावर कलाकारांनी बोललं पाहिजे. नाहीतर उद्या गुजरातमधली स्थळं नसतील तर राष्ट्रीय पुरस्कार नाही असा फतवा पण हे लोकं काढतील. ऑस्कर सोहळा लॉसएंजलिसला होतो . ट्रम्प किंवा बुश किंवा ओबामा यांनी आपल्या राज्यात हा सोहळा नेला नाही.
माझी गुजराती बांधवाना विनंती आहे की तुम्ही यांच्या नादी लागून उगाच वाहवत जाऊ नका. आपल्या भाषिक नेत्यांची सत्ता आहे याच्या ज्या गुदगुल्या होत आहेत, त्या सत्ता गेली की अस्वलाच्या गुदगुल्या होतील. भारतातील इतर प्रांतांचे नागरिक आणि नेते आपल्या राज्यांवर, तिथल्या व्यावसायिकांवर काय अन्याय झाला याचा हिशेब ठेवतील.
या विषयाला आम्ही वाचा फोडूच पण देशातील समस्त कलाकारांनी पण भूमिका घ्यायला हवी. सरकारच्या स्तुतीची गीतं गायला सांगितली की ती लगेच गाय���ा सुरुवात केल्यामुळे आजची ही वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी याविरोधात भूमिका घ्यायलाच हवी. आणि महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांनी जर कणखर भूमिका नाही घेतली तर या दख्खन प्रांताची जी ओळख आणि अस्मिता आहे त्यावरच हे वरवंटा फिरवतील आणि तेंव्हा वेळ निघून गेली असेल.
राज ठाकरे ।
#राष्ट्रीय_चित्रपट_पुरस्कार
#NationalFilmAwards