#KamlaMills कंपाऊंड मधील बळी हे #BMC च्या भ्रष्ट कारभाराचे पाप असल्याची प्रतिक्रिया @NCPspeaks मुंबई अध्यक्ष @AhirsachinAhir यांनी दिली. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, तसेच बळी पडलेल्या लोकांना जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणीही अहिर यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर केली. @PTI_News
कमला मिलमधील वन अबोव पबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला मालका एवढेच महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत. या अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यानंतर पुन्हा ते सुरू झाल्यानंतर त्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे नोटिसच्या आडून एकप्रकारे संरक्षण देण्याचे काम झाले आहे...
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना २७ रू. प्रति लिटर दर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र सहकारी दूध संघांना हा दर परवडत नाही. (1/2) #हिवाळी_अधिवेशन#नागपूर
शेलसुरा येथील #हल्लाबोल चौक सभेत विरोधी पक्षनेते @dhananjay_munde
यांनी लोकांशी संवाद साधला. सत्ताधारी भाजपने केलेला विश्वासघात समजावून सांगितला. शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणाऱ्या या सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही हा एल्गार पुकारलाय, हे मुंडे यांनी अधोरेखित केले.
महात्मा गांधीजीं मिठाचा सत्याग्रहासाठी साबरमतीहुन सेवाग्राम आले. त्याच ऐतिहासिक सेवाग्रामकडे जाणेसाठी आज 5 व्या दिवशी हल्लाबोल पदयाञा देवळी जि. वर्धा येथुन सुरवात झाली ..#हल्लाबोल
सरकार नाही भानावर .. राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर ...
सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस कूच करत आहे नागपूर कडे .. #हल्लाबोल पदयात्रेचा आजचा पाचवा दिवस ...
#हल्लाबोल पदयात्रेत ठिकठिकाणी भेटणारे शेतकरी, गृहिणी, विद्यार्थी #खोटारड्या सरकारविरोधात असलेल्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत असल्याचे चित्र अनुभवते आहे. आज हिरापूर चौक, सालोड इथल्या चौक सभेत एक महिला उत्स्फूर्तपणे पुढे येऊन आपले मनोगत व्यक्त करत आहे.
पाचव्या दिवशी #हल्लाबोल यात्रेत प्रदेशाध्यक्ष मा. @SunilTatkare विधिमंडळ नेते मा. @AjitPawarSpeaks यांनी आज वर्धा जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेतल्या. तसेच सरकारविरोधी या पदयात्रेचे प्रयोजनही त्यांना समजावून सांगितले.
देवळीहून #हल्लाबोल पदयात्रेतून वाटचाल करताना खा. @supriya_sule यांनी स्थानिक महिलांशी संवाद साधला. राज्याचा कारभार चालवणाऱ्या सत्ताधारी भाजपाविरोधात आपल्या मनातला रोष या महिलांनी सुप्रियाताईंजवळ व्यक्त केला.
'ताई, महागाई, गॅसच्या वाढलेल्या किंमती यात जगणंच मुश्किल होऊन बसलंय. तुमच्या या #हल्लाबोल ने तरी या सरकारला जाग यावी.!'या भावना आहे सेलूसरा गावातल्या महिलांच्या. गावागावात मला भेटलेल्या महिलांची हीच व्यथा आहे. त्यांचे म्हणणे या #खोटारड्या सरकारपर्यंत मी हल्लाबोलद्वारे पोचवते आहे.