स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या पूर्वजांनी आपल्याला स्वतंत्र भारत दिला; आता आपली जबाबदारी आहे की पुढील पिढीला सशक्त, सुरक्षित आणि विकसित भारत देऊया
स्वातंत्र्याचा अभिमान बाळगूया…त्याचा वारसा जपूया…आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने पुढे जाऊया!
जय हिंद! 🇮🇳
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनातून देशभरात राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानात आपणही सहभागी होऊया.
🇮🇳 तिरंगा फडकवूया… राष्ट्राभिमान जागवूया!
🇮🇳 जय हिंद! वंदे मातरम्!
@narendramodi
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
दूरदृष्टी, ठाम नेतृत्व आणि जनकल्याणासाठीची अखंड बांधिलकी यामुळे महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा मिळाली आहे. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@Dev_Fadnavis
घाटकोपरच्या मध्यभागी पुन्हा एकदा निसर्गाचा भव्य उत्सव! 🌿
वन महोत्सव २०२६ निमित्त विविध प्रकारची झाडे, फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती, बागकाम साहित्य आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी
📅 दि. १८ ते २८ जुलै
📍 जनरल अरुणकुमार वैद्य मैदान, घाटकोपर (पूर्व)
सावित्रीबाई फुले नगर, पंतनगर, गली क्रमांक ११ येथे असलेली बावडी पूर्णपणे भरून गेली असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यात उंदीरही मरत असल्याने नागरिकांमध्ये आजार पसरण्याची भीती आहे. @mybmc@mybmcWardN
पाणी साचणे, गटारे किंवा नाले तुंबणे, झाडांच्या फांद्या पडणे, रस्त्यांवरील खड्डे, स्ट्रीट लाईट बंद असणे किंवा इतर कोणतीही नागरी समस्या असल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधा.
अमेय तेली – 98673 71212
रमेश मोरे – 90046 36203
हरीश जाधव – 97022 20833
पंकज पवार – 88501 77695
"उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका." — स्वामी विवेकानंद
राष्ट्रभक्ती, आत्मविश्वास, युवकांना प्रेरणा आणि मानवसेवेचा संदेश देणारे महान विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) अभियानांतर्गत आपल्या परिसरात BLO आपल्या घरी भेट देणार आहेत. त्यांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून द्या, योग्य माहिती द्या आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत नोंदले आहे याची खात्री करा.
'मन की बात'चे प्रेरणादायी विचार एकत्र ऐकण्याचा सुंदर योग! 🇮🇳
आमच्या कार्यालयात मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण आयोजित करण्यात आले. या प्रसंगी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होते
उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
घाटकोपरच्या विकासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा! 🌉
मा. आमदार श्री. परागभाई शाह यांच्या हस्ते लक्ष्मीबाग नाल्यावरील नव्या पुलाचे लोकार्पण संपन्न झाले. या पुलामुळे वाहतूक अधिक सुलभ होऊन नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे.
@BJP4Mumbai
🖤 संविधान हत्या दिवस — २५ जून १९७५ 🖤
२५ जून १९७५ रोजी लागू झालेली आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय आहे. संविधानाचा संकोच करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीची आठवण करून देणारा हा 'संविधान हत्या दिवस' आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १३१ मधील विविध नाल्यांची सफाई व गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या कामादरम्यान नाल्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, थर्माकोल, कचरा, कपडे आणि इतर टाकाऊ वस्तू बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे.
आज पंतनगर, घाटकोपर (पूर्व) येथील परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण संपन्न झाले.
आमदार श्री परागभाई शहा, माजी नगरसेवक श्री भालचंद्र शिरसाट, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्रीमती अनिता अतितकर तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर स्वाभिमान, शौर्य आणि सुशासनाचे युगपुरुष होते. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने असंख्य पिढ्यांना प्रेरणा दिली आहे
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🚩
#शिवराज्याभिषेक_दिन#छत्रपतीशिवाजीमहाराज
🚩 घाटकोपरकरांचा जनआक्रोश रस्त्यावर! 🚩
पंतनगर मनपा शाळा क्र. २ ची जनतेची जागा खासगी हितासाठी लुटू देणार नाही! नियम वाकवून निर्मल एज्यूकेशन सोसायटी (ज. मो. अभ्यंकर) ला गिळंकृत करण्याचा घाट घातला.
✊ घाटकोपरची जागा घाटकोपरकरांसाठीच!
🚩 सभागृहातही… रस्त्यावरही… हक्क मिळवूनच थांबू
आज नवी दिल्ली येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहिती पंतप्रधानांना यावेळी देण्यात आली.
@narendramodi@Dev_Fadnavis