She handled huge institutions like Vidya Pratishthan, Baramati textile park etc. As Ajit was always in the limelight, Sunetra Vahini remained as his shadow. But people from Baramati know how she is disciplined and hardworking.
Those underestimating her will realise it soon.
Sunetra Pawar, known as Sunetra Vahini is not new to politics. She is a sister of Dr Padmasinh Patil, former cabinet minister, LS MP and strongman of Marathwada.
She has her style of functioning. Soft yet firm. Her understanding of politics is deep. She knows how things work.
संजयराव, फार मोठं राजकारण बघितलं हो आम्ही. गेले ते दिवस. पण, आता असंय. हे काही सो���ता येत नाही. अखेरच्या क्षणापर्यंत झुंजत राहायचं. तेवढंच आपल्या हातात आहे.”
महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत भल्या सकाळी अजित पवारांशी गप्पा मारत होतो. एवढ्या दिलखुलास गप्पा रंगल्या की दोन तास झ���ले, हे आम्हा दोघांनाही समजलं नाही.
अर्थात, हा अपवाद नव्हता. अजित पवारांशी गप्पा अशाच व्हायच्या लांबरुंद आणि ऐसपैस. काहीही पोटात न ठेवता, थेटपणे बोलणारा माणूस. एवढा उमदा, मनमोकळा आणि दिलखुलास नेता मी दुसरा पाहिला नाही.
अजित पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाच्या तालमीत तयार झालेले, त्या विद्यापीठाचे राजकारणी. सत्ता मिळवायची. टिकवायची. त्यासाठी सगळे अपराध मान्य. मात्र, ही सत्ता लोकांसाठी आहे, हे कधी विसरायचे नाही. अजित पवार हे ‘स्टेट्समन’ होते. संसदीय राजकारणाची शिस्त समजणारे होते. उभा-आडवा महाराष्ट्र त्यांना माहीत होता. प्रशासनातले अधिकारी त्यांना घाबरत, कारण त्यातील ओळ ना ओळ त्यांना ठाऊक असे.
अजित पवारांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही. कधीच धर्माचे राजकारण केले नाही. लोकांचे काम करा आणि निवडून या, हा त्यांचा 'नो नॉनसेन्स' साधा खाक्या होता. अर्ध्या रात्रीही अजित पवार लोकांसाठी उभे असायचे. सतत काम करत असायचे. त्यामुळेच लोकांचे ते प्रचंड लाडके होते. लोकांसोबत दादा मस्त रमत. खुमासदार विनोद करत. त्यांची कामे करत. त्यांना खडसावत. त्यांच्या राजकारणाची एक स्वतंत्र शैली होती.
शरद पवार नावाच्या वटवृक्षाखाली वाढत असताना, एवढी स्वतंत्र उंची मिळवणे, ह�� सोपी गोष्ट नाही. काकांचेच बोट धरून ते राजकारणात आले, हे खरे, पण त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची ओळख तयार केली. ती स्वतःच्या कर्तबगारीने तयार केली. अहोरात्र बेधडक काम करून, काबाडकष्ट करून, बारकाईने अभ्यास करून, लोकांमध्ये जाऊन, स्वतःचे लोक मिळवून ती ओळख त्यांनी तयार केली.
अजित पवारांचा दरारा होता. पण, ती दहशत नव्हती. लोकांनाही त्यांची दादागिरी आवडे. कारण, त्याच्या मुळाशी एक प्रेमळ माणूस होता. अजित पवारांचे अ��्खे राजकारणच काय, संपूर्ण आयुष्य इमोशन ड्रिव्हन होते. अत्यंत भावनाप्रधान होते. त्यांनी कायम त्यांच्या मनाचे ऐकले. फार व्यूहरचना अथवा असे काही करत न बसता, जे वाटले ते केले. त्यामुळेच कार्यकर्त्यांवर त्यांचा जीव होता.
कोणताही माणूस हा त्या काळाचे अपत्य असतो. अजित पवार काही महापुरूष नव्हते. या काळाचे नेते होते. या काळाच्या, या माणसांच्या मर्यादा त्यांना होत्या. त्यांच्या राजकारणाला होत्��ा. पण, एक खरे की, हा सेंद्रीय, ऑर्गॅनिक नेता होता. इथल्या मातीत उगवलेला होता. राजकारणाला धर्म मानणारा आणि त्यासाठी सच्चा असणारा असा नेता. खराखुरा लोकनेता. नरेश अरोरा वगैरे त्यांनी नंतर नियुक्त केले खरे आणि गुलाबी जाकीटही घातले, पण तो काही त्यांचा स्वभाव नव्हता. जे आहे ते आहे, अशा प्रकारच्या नेत्याचा राजकारणात जन्म झाला, तेव्हा तो यशवंतराव- शंकरराव- वसंतदादा- शरद पवारांचा महाराष्ट्र होता. अजित पवार साठी उलटत असताना मात्र त्या राजकारणाचा आकार उकार पार बदलून गेला होता. त्या राजकारणाशी जुळवून घेण्याची आणि खंबीरपणे या वादळात उभे राहाण्याची धीरोदात्त कसरत ते अखेरच्या क्षणापर्यंत तडफेने करत राहिले. संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग शोधून, हुशारीने आपल्या कार्यकर्त्यांनाही सांभाळत राहिले!
सत्तरी जवळ आलीय, असे वाटूच नये, असे व्यक्तिमत्त्व होते अजित पवारांचे. एकदम फिट. मोजका आहार. कमाल स्वच्छता. उत्तम व्यायाम. भल्या सकाळी कामाला सुरूवात. अखंड आणि शिस्तीत काम. शांत झोप. ही माझ्या प्रकृतीची गुपिते आहेत, असे त्यांनी एकदा मला सांगितले होते. त्यामुळे दादा सहज शतायुषी झाले असते!
पण दादा,
हे बरोबर नाही केले.
तुम्हाला घाई होतीच. पण, एवढी घाई बरोबर नाही.
आजवर तुम्ही अनेकदा भल्या सकाळी उठवले. “संजयराव, सकाळी सहा वाजता मुंबईतल्या बंगल्यावर या. गप्पा मारू”, असा निरो�� आला की सकाळची झोप गेलीच. पहाटे शपथ घेऊनही तुम्ही झोपेतून जागे केले होते. पहाटे म्हटलेले तुम्हाला आवडायचे नाही. सकाळी आठ होते ते संजयराव, असे तुम्ही जाहीर मुलाखतीत जरबयुक्त आवाजात म्हणाला होतात. परवा अशीच भल्या सकाळी तुम्ही वेळ दिलीत आणि आंघोळ न करताच आलो. आजही असेच सकाळी सकाळी जागे केलेत, दादा. पण, ही बातमी द्यायला नको होती.
सगळ्या धामधुमीत तुमच्यावर मी खूप जाहीर टीका केली. विनोद केले. तु���्ही हसत हसत ते झेललेही.
पण दादा, एक सांगायचं राहून गेलं.
तुम्ही मला आवडत होतात.
तुम्ही मलाही हक्काचे वाटत होतात.
हे सांगायचं राहून गेलं. आणि, आता तुम्ही गेलात!
हा धक्का पचवणं कठीण आहे!
- संजय आवटे
वकिलांनी कोर्ट रूममध्ये काय बोलायचं, याचा निर्णय न्यायाधीशांना घेऊ द्या. देशाची न्यायव्यवस्था पुरावे आणि फॅक्ट्स यावर चालते. संवेदनशीलता हा सामाजिक विषय असतो. अशा खटल्यांमध्ये वकीलपत्र घेणाऱ्यांच�� बदनामी होऊ लागली तर न्यायव्यवस्था कोलमडेल. लोकं वकीलपत्र घेणार नाहीत. 1/2
मुलीच्या बापाने दिलेल्या हुंड्याच्या जीवावर जगणारी जमात ही स्वतःमध्ये हिंमत नसलेले षंढ, बांडगुळ आणि एक नंबरचे भिकारी असतात. हुंडा मागणाऱ्याला हुंडा तर नाहीच पण यापुढं कोणत्याही आई-वडीलांनी आपली मुलगीही दिली नाही पाहिजे. तसंच ‘हुंडामुक्त महाराष्ट्र’ ही राज्य सरकारने सुरु केलेली मोहिम थंडावली असून ती पुन्हा अधिक जोमाने राबवून लोकांपर्यंत पोचवली तर भविष्यात अनेक ‘वैष्णवीं’चा जीव वाचेल…
#VaishnaviHagawane
#JusticeForVaishnavi
Everyone in Maharashtra should know Marathi, sure. Bt why target only the poor? Why bash the pizza delivery guy? Have guts to question elite schools where marathi is not even taught. Top businessmen, actors don’t speak Marathi either. Oh wait, they’re too rich to be corrected.
Terrorists launched an attack that killed dozens of Indian citizens. India had every right to retaliate and defend itself.
Pakistan does not get to play the victim. No country gets a pass for supporting terrorist activity.
After Pulwama, we crossed a certain rubicon in terms of retaliation.
This time it has to be firm, clear, without any vagueness of satellite images.
Hit them, and hit them so hard that they turn into a rubble.
बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी..!
बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनवण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनींग’ अर्थात (सीआयआयआयटी) स्थापनेच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं जात आहे. बीडचा पालकमंत्री या नात्यानं मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीनं जिल्ह्यासाठी १९१ कोटी रुपये खर्चून नवीन सीआयआयआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन सेंटरमधून दरवर्षी ७ हजार युवकांना जागतिक दर्जाचं औद्योगिक, तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यातून बीड जिल्ह्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.