आज इतिहास घडणार! 🇮🇳
सचिन तेंडुलकरपेक्षाही लहान वयात (१५ वर्षे ९९ दिवस) पदार्पण करणारा वैभव सूर्यवंशी आज टीम इंडियासाठी मैदानात उतरतोय. संपूर्ण देशाचे प्रेम आणि लक्ष या तरुण खेळाडूवर आहे. एका नव्या वैभवशाली कारकिर्दीची सुरुवात! ✨
#EngvInd#TeamIndia#Cricket#VaibhavSooryavanshi
विम्बल्डन: भारतीय आव्हान 👇
पुरुषांच्या दुहेरी गटात २ 🇮🇳 भारतीय खेळाडू:
🎾 युकी भांब्री - जोडीदार मायकेल व्हीनस.
🎾 श्रीराम बालाजी - जोडीदार मार्सेलो डेमोलिनर.
मिश्र दुहेरीचा ड्रॉ अजून बाकी आहे.
महिला आणि पुरुष एकेरीत भारताकडून कोणाचेही आव्हान नाही
#Wimbledon#Marathi
आनंदाची बातमी 🎉
भारतीय महिला क्रिकेट संघ लॉस एंजलिस ऑलिंपिक २०२८ साठी पात्र.🇮🇳👏
सध्या चालू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत आशिया खंडातून अव्वल स्थान प्राप्त केल्यामुळे भारताला ही पात्रता मिळाली.
T20 क्रिकेटचा पहिल्यांदाच ऑलिंपिक मध्ये समावेश करण्यात आला आहे.
#TeamIndia#LA28
आयओसीने (IOC) लॉस एंजेलिस २०२८ (LA28) ऑलिम्पिकमधील महिला आणि पुरुष क्रिकेटच्या पात्रता निकषांची अधिकृत घोषणा केली आहे.
• महिला आणि पुरुषांचे ६-६ संघ सहभागी होणार
• २२ ते २९ जुलै २०२८ (अंतिम सामना: २९ जुलै)
#LA28#KJCricket#Olympics#CricketInOlympics
♟️इतिहास घडला! 🇮🇳
वैशाली रमेशबाबू बनली #FIDE महिला कॅन्डिडेट्स चॅम्पियन २०२६ 🏆
तिने एकूण ८.५/१४ गुण मिळवले.
➡️ ५ विजय | ७ ड्रॉ | केवळ २ पराभव
अंतिम फेरीत प्रचंड दडपणाखाली वैशालीने 'कॅटरिना लॅग्नो'चा पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली.
आता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी वैशाली विरुद्ध जू वेनजुन असा महामुकाबला रंगणार.
कोनेरू हम्पी (२०११) नंतर या टप्प्यापर्यंत पोहोचणारी वैशाली दुसरी भारतीय महिला ठरली आहे.
अभिनंदन वैशाली! 🇮🇳👏
@chessvaishali
#Vaishali #IndianChess #FIDE #Candidates2026 #Chess #IndiaSport #Marathi #ChessIndia
मीनाक्षी आणि प्रीती ठरल्या आशियाई चॅम्पियन्स! 👑🥊
जागतिक विजेत्या मीनाक्षी हुडाने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात यजमान खेळाडू नोमुंदरी एंख-अमगलनचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले.
प्रीती पवारने मोठा उलटफेर करत ३-वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन हुआंग ह्सियाओ-वेनला ५४ किलो वजनी गटात पराभूत करून आशियाई जेतेपदावर नाव कोरले.
भारतीय महिला बॉक्सिंगसाठी ऐतिहासिक क्षण! 🇮🇳💪
#Boxing #AsianChampionships #TeamIndia #MeenakshiHooda #PreetiPawar #PrideOfIndia
शितल - पायल जोडीची सुवर्णभरारी! 🥇
बँकॉक येथे सुरू असलेल्या 'वर्ल्ड आर्चरी पॅरा सीरिज'मध्ये शितल देवी आणि पायल नाग या जोडीने कझाकस्तानचा १५०-१४७ असा पराभव करत 'कंपाऊंड महिला सांघिक' गटात सुवर्णपदक पटकावले. अभिमानास्पद कामगिरी! 🇮🇳🏹
#SheetalDevi#Archery#GoldMedal#TeamIndia #Marathi
एक झुंजार लढत संपली. 🇮🇳
लक्ष्य सेन 'ऑल इंग्लंड ओपन २०२६' चा उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात त्याला लिन चुन यी कडून पराभव स्वीकारावा लागला.
निकाल: १५–२१, २०–२२
वेळ: ५७ मिनिटे
बर्मिंगहॅममधील या संपूर्ण आठवड्यात लक्ष्यने आपल्या खेळाचा दर्जा सिद्ध करत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. ही खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आहे.
तुझ्या लढवय्या वृत्तीचा आम्हाला अभिमान आहे. हा प्रवास असाच सुरू राहो! 💪
@lakshya_sen #lakshyasen #AllEngland2026 #Badminton
लक्ष्य सेनचा थरारक विजय! 🏸
अॅन्गस एनजी का लाँगविरुद्ध सलग गेम्समध्ये विजय मिळवण्याची संधी असताना, ४ मॅच पॉइंट्स गमावल्यामुळे सामना तिसऱ्या गेममध्ये गेला. मात्र, लक्ष्यने जबरदस्त पुनरागमन करत २१-१९, २१-२३, २१-१० असा विजय मिळवला आणि ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
अॅन्गस विरुद्ध ४ सामन्यांमधील लक्ष्यचा हा पहिलाच विजय! 🔥🇮🇳
#AllEngland2026 #LakshyaSen #Badminton #India
ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये लक्ष्य सेनने केला मोठा उलटफेर 🏸
विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन आणि वर्ल्ड नंबर १ खेळाडू शि युकीचा पराभव करून लक्ष्यने स्पर्धेत खळबळ उडवून दिली.
स्कोअर: २३-२१, १९-२१, २१-१७. 👏
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात लक्ष्यने आपला संयम राखत निर्णायक गेम जिंकला आणि उप उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला.
#BadmintonIndia #AllEngland #LakshyaSen
आज सुपर एट मध्ये दोन सामने..🏏
🕒 दुपारी तीन वाजता..
🇱🇰 श्रीलंका विरुद्ध इंग्लंड 🏴
ठिकाण - पल्लेकेले 🏟️
🕖 संध्याकाळी सात वाजता..
🇮🇳 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 🇿🇦
ठिकाण - अहमदाबाद 🏟️
#T20WorldCup#T20WC#SLvEng#SLvsENG#IndvSA#IndvsSA#teamindia
पुण्याच्या लेकीचा टेनिस विश्वात डंका! 🎾✨
📍 वैष्णवी आडकर: ITF W100 बेंगळुरूच्या फायनलमध्ये!
📍 मोठा विक्रम: सानिया मिर्झानंतर (२००९, पट्टाया) अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय महिला.
📍 विशाल झेप: वर्ल्ड नं. ६९० असूनही टॉप खेळाडूंना धुळ चारली!
१७ वर्षांनंतर भारताला मिळाली नवीन टेनिस स्टार! 🇮🇳💪
#IndianTennis #VaishnaviAdkar #HistoryMaker #Marathi #Tennis #KJTennis
ऑस्ट्रेलियाला धक्का देत झिंबाब्वेने एक मोठा उलटफेर केला आहे.
त्यांनी ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी हरवले.
ऑस्ट्रेलियाची पूर्ण टीम बाद करण्यात ब्लेसिंग मुझरबानीचा सिंहाचा वाटा आहे. त्याने १७ धावात ४ गडी बाद केले. झिम्बाब्वेचे क्षेत्ररक्षण दर्जेदार ठरले.
#T20WorldCup#ausvzim
भारतीय नेमबाजांचा ऐतिहासिक पराक्रम! 🇮🇳🥇🥈🥉
५० मीटर ३पी प्रकारात भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही पदकांवर कब्जा केला. ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकले, तर नीरज कुमारने रौप्य आणि अखिल शेओरानने कांस्यपदक पटकावले.
सांघिक सुवर्ण पण भारताला👏
आफ्रिका आणि अफगाण यांच्यातील सामन्याचा निकाल अखेर दोन सुपर ओव्हर नंतर लागला.
अफगाण जिलेबी त्यात आफ्रिकेचे चोकीन्ग ऍड झाल्यावर एक टेस्टी सामन्याची डिश पब्लिकला ओरपायला मिळाली.
४ चेंडूत २४ हव्या असताना गुरबाजने सलग ३ सिक्स मारून सामना जिवंत ठेवला होता. पण अखेर आफ्रिकेला विजयी.
ब्रेकिंग न्यूज!
डेव्हिस कप टेनिसमध्ये भारताची नेदरलँड्सवर मात! 🇮🇳
दक्षिणेश्वर सुरेश आजच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला.
त्याने निर्णायक एकेरी सामना जिंकून भारताला ३-२ असा विजय मिळवून दिला.
त्यानेच पहिली एकेरी आणि दुहेरी (युकी भांब्री सोबत) सुद्धा जिंकली.
#DavisCup#TeamIndia