अंबाजोगाई येथील विवेकानंद क्लासेसच्या गणेश आरतीस उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेतले. तसेच गुरुवारपेठ येथील ओंकार गणेश मंडळाच्या गणेश आरतीस उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी उपस्थित सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आपुलकीने संवाद साधला.
#गणेशोत्सव #गणपतीबाप्पामोरया #अंबाजोगाई #गणेशआरती #शुभेच्छा
दुष्काळी परिस्थितीत नुकसानग्रस्त पिकांची पाहणी!
📍चिंचोलीमाळी | नाव्होली | धोत्रा | नांदुरघाट | सारूळ | सासुरा | जोला | विडा | गप्पेवाडी
मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरील गावांच्या शिवारातील पिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाअभावी पिकांवर झालेला परिणाम तसेच शेतकऱ्यांसमोरील अडचणी जाणून घेतल्या.
दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान व पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी नुकसानीची योग्य नोंद, पंचनामे तसेच आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या.
शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.
#दुष्काळीपरिस्थिती #शेतकरी #पीकनुकसान #पीकविमा #दुष्काळ
📍अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, अंबाजोगाई
केज विधानसभा मतदारसंघातील दुष्काळसदृश्य परिस्थिती, पाणीटंचाई, पीक नुकसान, पीकविमा, चारा-पाणी आणि रोजगाराच्या प्रश्नांबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक पार पडली. पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करणे, पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणे तसेच दुष्काळी परिस्थितीत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशा सूचना यावेळी दिल्या.
या बैठकीला अंबाजोगाईचे नगराध्यक्ष आदरणीय श्री. नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा यांच्यासह महसूल, कृषी, पंचायत समिती, नगरपरिषद, जलसंधारण, महावितरण, पोलीस तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
#ambajogai #दुष्काळ #आढावा_बैठक #बळीराजा
📍 कुरणवाडी | येल्डा | चिचखंडी
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुरणवाडी, येल्डा व चिचखंडी शिवारातील कापूस, सोयाबीन व इतर पिकांची पाहणी करून पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच नुकसानीची योग्य नोंद घेऊन आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.
#कुरणवाडी #येल्डा #चिचखंडी #शेतकरीहित #पीकनुकसान
📍तहसील कार्यालय, केज
केज व बीड तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, पीक नुकसान, पीक विमा, चारा व रोजगाराच्या प्रश्नांबाबत आढावा बैठकीला संबोधित केले. पीक नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करणे, पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणे तसेच टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याचे पाणी, टँकर, चारा-पाणी आणि रोजगाराची कामे प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी दिल्या.
या आढावा बैठकीला अंबाजोगाई शहराचे नगराध्यक्ष आदरणीय श्री. नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा, उपविभागीय अधिकारी मा. श्री. दीपक वजाळे साहेब तसेच महसूल, कृषी, पंचायत समिती व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
#केज #आढावा_बैठक #दुष्काळीपरिस्थिती #शेतकरीहित #पीकविमा #बीड
पाठपुराव्याला यश; नेकनूर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर.!
नेकनूर व परिसरातील नागरिकांना महसूल आणि प्रशासकीय सेवा अधिक सुलभतेने, जलदगतीने आणि जवळच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. नेकनूर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे नेकनूरसह परिसरातील नागरिकांना विविध महसूल व प्रशासकीय कामांसाठी दूरवर जावे लागणार नाही. स्थानिक पातळीवरच आवश्यक सेवा उपलब्ध होऊन नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार, महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि लोकनेत्या, पशुसंवर्धन मंत्री मा. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे मनःपूर्वक आभार!
#नेकनूर #अपरतहसील #बीड #प्रशासकीयसेवा #जनसेवा
📍 अंबाजोगाई शहर
दि. २२ सप्टेंबर २०२६
आज अंबाजोगाई शहरातील विविध गणेश मंडळांच्या आरतीस उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविकांशी संवाद साधला. गणेशोत्सवानिमित्त शहरात पाहायला मिळणारा उत्साह आणि आनंद अनुभवता आला.
यावेळी योगेश्वरी नगरी गणेश मंडळ, योगेश्वरी नगरी, अंबाजोगाईचा राजा गणेश मंडळ, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, तसेच चिंतामणी गणेश मंडळ, मेडिकल परिसर, अंबाजोगाई येथे आरतीस उपस्थित राहून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
#ganapatibappamorya #आरतीदर्शन #अंबाजोगाई #केज
#namitamundada #भेट #संवाद
सेवाव्रती नेतृत्वाला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
परम पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत साहेब यांचा जीवनप्रवास म्हणजे ध्येयनिष्ठा, शिस्त, संघटनकौशल्य आणि राष्ट्रसमर्पणाचा प्रेरणादायी प्रवास.
१९७५ पासून पूर्णवेळ संघकार्याला वाहून घेत त्यांनी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत २००९ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून संघकार्याला व्यापक दिशा दिली.
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि राष्ट्रसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो, हीच प्रार्थना.
#happy_birthday #mohanbhagwat #birthdaywishes #rss
शेतकऱ्याच्या कष्टाला बळ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो.
शिवारात शेतकऱ्याचा खंबीर सोबती बनून राबणाऱ्या या मुक्या जीवाच्या श्रमांचा सन्मान करण्याचा आणि त्याच्याप्रती आपुलकी व्यक्त करण्याचा हा विशेष दिवस आहे.
बैलपोळा सणानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
#बैलपोळा #कृषीसंस्कृती #बळीराजा #शुभेच्छा
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत संघटनात्मक वाटचालीवर महत्त्वपूर्ण विचारमंथन!
📍 गणेश कला क्रीडा मंच, पुणे
🗓️ ३१ ऑगस्ट २०२६
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. पक्षाची संघटनात्मक वाटचाल अधिक मजबूत करणे, आगामी कार्याची दिशा निश्चित करणे आणि जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबत यावेळी सविस्तर विचारमंथन झाले.
पन्नगेश्वर शुगर मिल्सचे चेअरमन श्री. अक्षय मुंदडा यांच्या समवेत या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहिले बैठकीमध्ये पक्षाची संघटनात्मक वाटचाल अधिक मजबूत करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क अधिक वाढवणे, पक्षाचा विस्तार करणे तसेच जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आगामी दिशा ठरविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
मुख्यमंत्री मा. ना. श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष मा. श्री.रवींद्र चव्हाण साहेब यांचे मार्गदर्शन आणि राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी झालेला संवाद आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.
या बैठकीला पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री, लोकनेत्या मा. ना. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब,भाजपाचे इतर सर्व सन्माननीय सदस्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Pune #BJPFamily #BJPCoreCommittee #BJP4Maharashtra #BhartiyaJantaParty
#भारतीयजनतापार्टी #DevendraFadnavis #RavindraChavan
📍बरड
नाव्होली येथील बिक्कड परिवार आणि धोत्रा येथील गित्ते परिवाराच्या विवाह सोहळ्यास महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरण बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री, लोकनेत्या मा. ना. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब, मा. खा. डॉ. प्रितमताई मुंडे आणि पन्नगेश्वर शुगर मिल्सचे चेअरमन श्री. अक्षय मुंदडा यांच्या समवेत उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले.
नवदाम्पत्याच्या सहजीवनाची ही नवी सुरुवात प्रेम, विश्वास, आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण व्हावी, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#शुभविवाह_सोहळा #शुभाशीर्वाद #शुभेच्छा #बरड
📍चनई
केज विधानसभा मतदारसंघाच्या भाग्यविधात्या, माजी मंत्री स्व. डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त आदरणीय श्री. नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा व श्री. अक्षय मुंदडा यांच्यासमवेत चनई येथील त्यांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन पुष्प अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
जनतेच्या प्रश्नांसाठीचा संघर्ष, विकासाची दूरदृष्टी आणि लोकसेवेची तळमळ यांचा आदर्श त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केला. त्यांच्या विचारांचा वारसा सदैव प्रेरणादायी राहील.
यावेळी स्व. विमलताई मुंदडा यांच्यावर प्रेम व आदर असणारे केज विधानसभा मतदारसंघातील अनेक मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते.
#चनई #स्व_विमलताई_मुंदडा #जयंती #विनम्र_अभिवादन
📍 अंबाजोगाई
८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अंबाजोगाई शहरात आयोजित तिरंगा दुचाकी रॅलीत पन्नगेश्वर शुगर मिल्सचे चेअरमन श्री. अक्षय मुंदडा यांच्या समवेत उत्साहाने सहभागी झाले.
हातात तिरंगा, मनात राष्ट्रभक्ती आणि ‘वंदे मातरम्’चा जयघोष… तिरंग्याच्या अभिमानाने आणि राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने संपूर्ण अंबाजोगाई दुमदुमून निघाली!
#जयतु_भारतम् #IndependenceDay #तिरंगारॅली #वंदे_मातरम् #ambajogai
📍अंबाजोगाई
सुपा येथील प्रसिद्ध अमृत बेकरीच्या अंबाजोगाई शहरातील नवीन शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास अंबाजोगाई शहराचे नगराध्यक्ष आदरणीय श्री. नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा यांच्यासमवेत उपस्थित राहिले.
या शुभप्रसंगी श्री. संजयजी केंद्रे आणि श्री. गणेशजी मुंडे यांची भेट घेऊन नव्या व्यवसायाची सुरुवात केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#ambajogai #शुभेच्छा #AmrutBakery #BusinessGrowth #NewBeginnings
📍चनई
केज विधानसभेच्या भाग्यविधात्या स्व. डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त चनई येथील त्यांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
केज विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहून विकासाची दूरदृष्टी आणि लोकसेवेची तळमळ त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केली. जनतेशी असलेली त्यांची नाळ, विकासासाठीची त्यांची धडपड आणि सेवाभावी कार्य आजही समाजकारणाच्या वाटचालीत प्रेरणादायी आहे.
याप्रसंगी अंबागोगआदरणीय नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा, श्री. अक्षय मुंदडा यांच्यासह स्व. विमलताईंवर प्रेम करणारे केज विधानसभा मतदारसंघातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
#चनई #विमलताई_मुंदडा #जयंती #विनम्र_अभिवादन #ambajogai
परळी वैजनाथ (जि. बीड) येथे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचा "कोनशिला समारंभ व भूमिपूजन सोहळा" संपन्न...
📍परळी वैजनाथ (बीड)
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते आणि पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री, लोकनेत्या मा. पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास उपस्थित राहिले.
या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयामुळे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नवी संधी उपलब्ध होणार असून मराठवाड्यातील पशुपालक व शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे.
या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब, माजी मंत्री श्री. बदामराव आबा पंडित साहेब, आमदार श्री. धनंजय मुंडे साहेब, श्री. विवेक जॉन्सन साहेब (जिल्हाधिकारी, बीड), मा. जितीन रहमान (CEO जि.प.) यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
#पशुवैद्यक_महाविद्यालय #परळी_वैजनाथ #बीड #भूमिपूजन #पशुसंवर्धन
📍अंबाजोगाई
केज विधानसभा मतदारसंघाच्या भाग्यविधात्या, माजी मंत्री स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून अंबाजोगाई शहरालगतच्या रिंग रोडवरील स्व. डॉ. विमलताई मुंदडा चौकाचे आज अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास उपस्थित राहून स्व. विमलताईंच्या पावन स्मृतींना अभिवादन केले.
या प्रसंगी अंबाजोगाई शहराचे नगराध्यक्ष आदरणीय श्री. नंदकिशोरजी (काकाजी) मुंदडा, पन्नगेश्वर शुगर मिल्सचे चेअरमन श्री. अक्षय मुंदडा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
#ambajogai #स्वविमलताईमुंदडा #अनावरण