स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा आणि श्रमजीवी बांधवांचा सन्मान!
📍 सोलापूर
थोर स्वातंत्र्यसैनिक, सहकार महर्षी व दिवंगत आमदार कै. वि.गु. शिवदारे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपानिमित्त तसेच ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, बारा बलुतेदार आणि श्रमजीवी बांधवांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास उपस्थित राहून स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांचा तसेच बारा बलुतेदार आणि श्रमजीवी बांधवांचा सन्मान केला.
स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर गावगाड्याची घडी सांभाळणाऱ्या बारा बलुतेदार आणि आपल्या कष्टाने समाजाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या श्रमजीवी बांधवांच्या योगदानाची दखल घेणे, ही देखील अभिमानाची बाब आहे.
यावेळी श्री. राजशेखर शिवदारे, ��ॉ. प्रकाश पवार सर, आमदार श्री. देवेंद्र कोठे, श्री. प्रकाश वाले, श्री. नरेंद्र गंभीरे, श्री. सुभाष मुनाळे, श्री. महेश सिंदगी, श्री. प्रमोद बिराजदार, श्री. केदार विभूते यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, बारा बलुतेदार परिवार आणि श्रमजीवी बांधव उपस्थित होते.
#क्रांतीदिन #बारा_बलुतेदार #Solapur #वि_गु_शिवदारे #जन्मशताब्दी_सोहळा
स्वातंत्र्य मिळविण्याची देशवासीयांची इच्छा ९ ऑगस्ट १९४२ रोजी एका निर्णायक आंदोलनात परिवर्तित झाली. ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या माध्यमातून ब्रिट��श सत्तेला भारतातून निघून जाण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला. या आंदोलनाने देशातील प्रत्येक घटकाला स्वातंत्र्याच्या लढ्याशी जोडले आणि स्वराज्याची भावना अधिक प्रबळ केली.
आपल्या मातृभूमीला पारतंत्र्याच्या बेड्यांतून मुक्त करण्यासाठी असंख्य देशभक्तांनी आपल्या सुखाचा त्याग केला, तुरुंगवास सहन केला आणि अनेकांनी हसत-हसत बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून निर्माण झालेल्या स्वातंत्र्��ाच्या या अमूल्य ठेव्याचे स्मरण ठेवणे हीच त्यांच्याप्रती खरी कृतज्ञता आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना शतशः नमन!
#ऑगस्ट_क्रांतीदिन #भारत_छोडो_आंदोलन #Independence #QuitIndia
शेतकऱ्यांचा विकास, हाच मा. देवाभाऊंचा ध्यास!
मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत ६ लाख २२ हजार २०७ पात्र शेतकऱ्यांना तब्बल ₹५ हजार २९ कोटींचा लाभ थेट वितरित करण्यात आला. महाराष्ट्रातील बळीराजाला कर्जाच��या जाचातून मुक्त करून सन्मानाने जगण्याचे बळ मा. देवाभाऊंनी दिले आहे.
#देवेंद्र_फडणवीस #DevendraFadnavis #कर्जमाफी #BJP
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@BJP4Maharashtra
विधानसभेतील आमचे सहकारी भाजपाचे आमगांव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. संजयजी पुराम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! उत्तम आयु-आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी खूप-खूप सदिच्छा !
#Birthday#संजय_पुराम#Sanjay_Puram#BJP
नोबेल पारितोषिक विजेते, साहित्यातील थोर कवी, भारताचे राष्ट्रगीत निर्माते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !
कवी, नाटककार, चित्रकार आणि संगीतकार अशा विविध रूपांत रवींद्रनाथ टागोरांनी भारतीय संस्कृती समृद्ध केली. 'गीतांजली'साठी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवून त्यांनी भारताचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवला. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ब्रिटिशांचा सन्मान नाकारून त्यांनी राष्ट्रीय अस्मितेचे रक्षण केले. त्यांचे विचार आणि साहित्यातील योगदान भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा सुवर्ण इतिहास आहे.
#रविंद्रनाथ_टागोर #Rabindranath_Tagore #Nobel #राष्ट्रगीत #गुरुदेव
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशवासियांना भारताच्या समृद्ध हातमाग परंपरेचा गौरव करण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या आवडत्या हातमाग उत्पादनांसह GRWM (Get Ready With Me) व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करा आणि #NationalHandloomDay या हॅशटॅगद्वारे स्वदेशी, स्थानिक कारागीर आणि भारतीय हातमाग उद्योगाला अधिक बळ ��्या.
#NationalHandloomDay #VocalForLocal #Handloom #Swadeshi #AtmanirbharBharat
@narendramodi
@PMOIndia
@BJP4India
IIM मुंबई च्या मुख्य प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कमांडर (नि.) निशा सिंह यांची सदिच्छा भेट !
📍 मुंबई
आज भारतातील अग्रगण्य व्यवस्थापन शिक्षणसंस्थांपैकी एक असलेल्या IIM मुंबई च्या मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि ���ेफ्टनंट कमांडर (नि.) निशा सिंह यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी देशातील शिक्षण, व्यवस्थापन आणि कौशल्य विकास क्ष���त्रातील बदलत्या संधी व आव्हानांबाबत त्यांच्याशी सविस्तर संवाद साधण्याची संधी मिळाली.
यावेळी IIM मुंबई ची शैक्षणिक परंपरा, व्यवस्थापन शिक्षणातील उत्कृष्टता, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम तसेच देशासाठी सक्षम नेतृत्व घडविण्यात संस्थेची भूमिका याविषयी सविस्तर चर्चा झाली. देशभरातील गुणवंत विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत असून, संशोधन, नावीन्य आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील नेतृत्व निर्माण करण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
#IIMMumbai #HigherEducation #SkillDevelopment #Leadership #EducationExcellence
भारताचा विकास आता आकडेवारीतच नाही, तर जगाच्या विश्वा��ातही दिसून येत आहे. महामार्गांपासून विमानतळांपर्यंत, डिजिटल अर्थव्यवस्थेपासून संरक्षण उत्पादनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात झालेली प्रगती विकसित भारताच्या दिशेने होत असलेल्या भक्कम वाटचालीची साक्ष देत आहे.
#ViksitBharat #NewIndia #ModiGovt #Infrastructure #IndiaGrowth
@narendramodi
@PMOIndia
@BJP4India
भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री, पद्मविभूषण स्व. सुषमा स्वराज जी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
भारतीय राजकारणात आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्व, कुशल नेतृत्व आणि ध��डसी निर्णयक्षमतेच्या बळावर त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत, संवेदनशील आणि परिणामकारक प्रशासनाचा आदर्श त्यांनी घालून दिला. 'राष्ट्र प्रथम' या विचाराशी अखंड निष्ठा ठेवत त्यांनी केलेले कार्य आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील.
#SushmaSwaraj #Punyatithi #Tributes #IndianPolitics #BJP
कलम ३७० हे देशाच्या एकात्मतेसमोरील एक मोठे अडथळा मानले जात होते. ५ ऑगस्ट २०१९ रोजी आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री मा.श्री. अमितभाई शाह जी त्याच्या नेतृत्वात हे कलम हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरला भारताच्या संविधानिक चौकटीत पूर्णपणे समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला.
#Article370Abrogation
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@BJP4India
विधानसभेतील आमचे सहकारी, भाजपाचे महाराष्ट्र चिटणीस आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. प्रशांतजी ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार���दिक शुभेच्छा! आपणांस निरोगी, समाधानी आणि यशस्वी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रभू श्रीराम चरणी सदिच्छा !
#Birthday #प्रशांत_ठाकूर #Prashant_Thakur #BJP #MLA
@ithakurprashant
भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे खजिनदार आमदार श्री. अरुण लखानी जी यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! उत्तम आयु-आरोग्यासाठी अनेकानेक सदिच्छा !
#Birthday#अरुण_लखानी#Arun_Lakhani#BJP
भारताचा तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्याचा, राष्ट्रीय अस्मितेचा आणि एकात्मतेचा सर्वोच्च मानबिंदू आहे.
'हर घर तिरंगा' अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयाने आपल्या ��रावर अभिमानाने तिरंगा फडकावून राष्ट्राप्रती असलेली निष्ठा व्यक्त करावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आपण सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा फडकवूया. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे स्मरण करत राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करूया.
चला, या राष्ट्रीय अभियानात सामील होऊया आणि भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व समर्पित करणाऱ्��ा स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करूया !
#HarGharTiranga #HGT2026 #VandeMataram150 #SelfieWithTiranga
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू!
महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू झाला आहे. आमिष, फसवणूक, बळजबरी व दबावाखाली होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मनःपूर्वक आभार!
#महाराष्ट्र #धर्मस्वातंत्र्य_कायदा #Mahayuti #BJP4Maharashtra
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RaviDadaChavan@BJP4Maharashtra